विभाग प्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ई- मेल |
---|---|---|
श्री दिनेश कानगुडे | ९५९९५१३२२२ | vehicle@mbmc.gov.in |
मिरा भाईंदर महानगरपालिकेची एकुण 68 वाहने आहेत. सदर वाहने अग्निशमन, सामान्य, आरोग्य, वैदयकिय आरोग्य, उदयान व वृक्षप्राधिकरण विभागात कार, टेम्पो, ट्रॅक्टर, मोबाईल जीप, महिंद्रा मॅक्सिमो, रुग्णवाहिका, शववाहिनी तसेच अग्निशमन सेवेत रेक्यु व्हॅन, वॉटर टेंडर, टॅकर इ. वाहने सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, वैदयकिय आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, उदयान व वृक्षप्राधिकरण विभाग, पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत. सदर वाहनाची आवश्यकतेनुसार दरपत्रके प्रसिध्दी देऊन दुरुस्ती केली जाते.
महापालिकेकडे असलेली वाहने पदाधिकारी व अधिकारी यांच्या तुलनेत अपुरी असल्याने वाहन विभागामार्फत वाहने वाहनचालकास इंधनासह (संपुर्ण सेवा) भाडयाने घेणे कामी वार्षिक निविदा मंजुर करून ठेका वाहने पुरवठा करण्यात येतात. तसेच महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेत अग्निशमन विभाग, वैदयकिय आरोग्य विभाग, उदयान व वृक्षप्राधिकरण विभागात तीन पाळीमध्ये वाहने कार्यरत असल्याने महापालिकेकडे असलेले कायम वाहन चालकांची संख्या अपुरी असल्याने मनपाच्या विविध विभागातील वाहनांवर ठेका पध्दतीने वाहनचालक पुरवठा करणे वार्षिक निविदा प्रसिध्द करून निविदेतील मंजुर दरानुसार किमान वेतनानुसार ठेका वाहनचालक पुरवठा करण्यात येतो. मिरा भाईंदर महापालिकेचे जे पदाधिकारी व अधिकारी मनपाच्या कार्यालयीन कामकाजाकरिता महापालिकेच्या वाहनाऐवजी स्वत:चे वाहन वापरतात अशा पदाधिकारी व अधिकाऱ्यांना मा. स्थायी समितीच्या ठरावाच्या अनुषंगाने पदाधिकारी / अधिकारी / वैदयकिय अधिकारी / कनिष्ठ अभियंता यांना वाहन प्रतिपुर्ती भत्ता अदा केला जातो.
अ.क्र. | पदनाम | कर्तव्ये व कामकाज |
1 | उप-आयुक्त (वाहन) |
|
2 | सहा.आयुक्त (वाहन) |
|
3 | लिपीक |
|
आयुक्त
|
उप-आयुक्त (वाहन)
|
सहा.आयुक्त (वाहन)
|
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (रिक्त)
|
लिपीक
|
वाहन चालक
|
संगणकचालक (ठेक्यावर)
|
शिपाई
|
सफाई कामगार
1) निविदा प्रक्रिया करुन दरकरार करणे
2) आवश्यकतेनुसार खरेदी करणे
3) वाहनांचे वाटप करणे.
4) स्टॉक रजिस्टरला नोंदी घेणे.
5) नमुना नं.127 (लॉगबुक) व नमुना नं.126 (इंधनबुक) नोंद वही मध्ये नोंद घेणे.
6) देयक अदा करणे
7) इतर अनुषंगिक कामे.
अ.क्र. | पदनाम | सोपविण्यात आलेली काम |
1. | उप-आयुक्त (वाहन) | उप-आयुक्तांकडे सोपविलेल्या विभागातील विविध कामासाठी प्रत्येक कामाच्या प्रकरणी निविदा मागविणे, निविदा मंजुर करणे, विविध कामाच्या मंजुर निविदा धारकासोबत करारनामा करणे, कामाचे आदेश देणे, वेळोवेळी कामास मुदतवाढ देणे इ. |
2. | सहा.आयुक्त (वाहन) | महानगरपालिकेच्या विविध वाहनांवर देखरेख ठेवुन वाहनांचे नियोजन करणे, वाहनांमध्ये उत्पन्न होणारी दुरुस्ती वेळोवेळी करणे, पदाधिकारी / अधिकारी यांना वाहन भत्ता अदा करणे तसेच विभागाच्या मागणीनुसार मा.आयुक्त साो. / मा. उप-आयुक्तांच्या मान्यतेने निविदेतील मंजुर दरानुसार ठेका वाहन पुरवठा करणे, तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागात अत्यावश्यक सेवा आपत्तकालीन परिस्थितीत ठेका पध्दतीने वाहने व ठेका वाहनचालक पुरवठा करणे इ. |
3. | कनिष्ठ अभियंता | पद रिक्त आहे. |
4. | लिपीक | ठेका पध्दतीने वाहनचालक पुरवठा करणे तसेच ठेका वाहन पुरवठा करणे कामाच्या निविदांचे व दरपत्रकाचे दस्तऐवज, आवक/जावक रजिस्टर, स्टॉक रजिस्टर, प्रस्ताव रजिस्टर, तरतुद रजिस्टर, नमुना नं.126, नमुना 127, मोटार वाहन विषयक माहिती व दुरुस्ती अभिलेख इतिहास बुक अदयावत करणे तसेच माहिती अधिकार व पदाधिकारी नागरिकांच्या पत्रांना उत्तर देणे, पदाधिकारी व अधिकारी वाहन प्रतिपुर्ती भत्ता तयार करणे इ. |
5. | वाहनचालक | पदाधिकारी / अधिकारी यांच्या वाहनांवर मनपाच्या विविध विभागातील वाहनचालक म्हणुन काम करणे व वाहनाची निगा राखणे. |
6. | संगणक चालक | कार्यालयीन पत्रव्यवहार, माहिती अधिकार पत्रव्यवहार व कार्यालयीन कामकाज. |
7. | शिपाई | वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे, विविध कार्यालयात जाऊन देयकांवर स्वाक्षरी घेणे, इतर कार्यालयीन कामकाज. |
8. | सफाई कामगार | वाहने धुलाई करून स्वच्छ ठेवणे. |
9. | सफाई कामगार | वाहने धुलाई करून स्वच्छ ठेवणे. |
अ.क्र. | लेखाशिर्षक | कोड नंबर | सन 2022-23 करिता लागणारी तरतुद (लाखात) |
अस्थायी आस्थापना ठेका वाहनचालक खर्च | 2120 | 175.00 | |
सामान्य प्रशासन पेट्रोल इंधन/वाहन दुरुस्ती | 2260 | 50.00 | |
अस्थायी आस्था / सुरक्षा रक्षक / वाहनचालक | – | 550.00 | |
आरोग्य पेट्रोल इंधन/वाहन दुरुस्ती | 2460 | 12.00 | |
रुग्णालये पेट्रोल इंधन/वाहन दुरुस्ती | 2460 | 20.00 | |
खाजगी गाडया भाडे | 2560 | 175.00 | |
पदाधिकारी / अधिकारी वाहन प्रतिपुर्ती भत्ता | 2149 | 150.00 | |
वाहन विमा रक्कम | 2217 | 20.00 |