1 | उप-आयुक्त (समाजविकास विभाग) | - क्रीडा विभागाचे प्रमुख
- क्रीडा विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण व नियोजन
- मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 49 मध्ये विहित केलेल्या अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणे.
- क्रीडा विभाग प्रमुख म्हणून अधिनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे
- शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा. आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे.
- महानगरपालिका सर्वसाधारण सभा/स्थायी समिती समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे.
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अपिलीय अधिकारी म्हणुन काम पाहणे.
- विभागाकडे सोपविण्यात आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासून मा. आयुक्त यांच्या प्रस्तावित करणे.
- विविध न्यायालयीन प्रकरणे/विधानसभा तांराकित प्रश्न महत्वाच्या शासकीय माहितीसंबंधी पाठपुरावा व पुर्तता करणे. मा. आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे.
- मा. महापौर, आयुक्त व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहणे.
- क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम/उपक्रम राबविणे.
|
2 | क्रीडा अधिकारी | - जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे.
- जिल्हास्तरावरील विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करुन संपुर्ण स्पर्धेचे सविस्तर अहवाल मा. उपसंचालक क्रीडा व युवक युवा संचालनालय, मुंबई विभाग व मा. जिल्हाअधिकारी ठाणे यांचेकडे पाठविणे.
- जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन करुन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचे प्रमाणपत्र तयार करुन त्यांना वाटप करणे.
- राज्यशासनाच्या क्रीडा धोरणास अनुसरुन क्रीडा विषयक प्रशासकीय प्रस्ताव तयार करणे.
- क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्दीष्टय पुर्ततेबाबत कारवाई करुन नियोजन करणे.
- माहिती अधिकार 2005 अन्वये प्राप्त अर्जावर जनमाहिती अधिकारी म्हणुन कारवाई करणे व प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मासिक अहवाल प्रशासन विभागाकडे सादर करणे.
- मिरा भाईंदर महानगरपालिका महापौर चषक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
- मा. महासभेच्या धोरणानुसार खेळाडुंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करणे.
- क्रीडा संकुल मैदानाची देखभाल व दुरुस्तीविषयी कामावर नियंत्रण ठेवणे.
- क्रीडा विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबीची पुर्तता करणे.
- स्पर्धेसाठी लागणाऱ्या खेळाचे साहित्य पुरवठा करणेकामी लागणारी प्रशासकीय मंजुरी व प्रस्ताव सादर करणे.
- विभागीय स्तरावर पाठविण्यात येणाऱ्या संघाचे प्रवेश अर्ज तयार करणे.
- जिल्हास्तीय स्पर्धाचे आयोजन करुन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचे प्रमाणपत्र तयार करुन त्यांना वाटप करणे.
- महापालिका आंतरविभाग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
- महापालिका क्षेत्रातुन उत्कृष्ठ खेळाडू तयार होतील या दृष्टीने कामे करणे.
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करणे.
- शहरामध्ये इतर विभागातसुध्दा विविध खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे.
|
3 | लिपिक क्रीडा विभाग | - क्रीडा विभाग पत्रव्यवहाराच्या आवक जावक नोंदी ठेवणे.
- स्पोटर्स कॉम्पलेक्स देखभाल व दुरूस्तीवर नियंत्रण ठेवणे.
- क्रीडा अधिकारी यांनी नेमुन दिलेली कामे करणे.
- क्रीडा स्पर्धेविषयी महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना कळविणे.
- क्रीडा विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे
- दैनदिंन ई-मेल चेक करुन संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांकडे पत्र/परिपत्रक सादर करणे.
- वरिष्ठांनी सोपविलेली कामे वेळोवेळी पार पाडणे.
- दैनंदिन ई-मेल चेक करुन संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांकडे पत्र/परिपत्रक सादर करणे.
- क्रीडा विभागाकडील विविध निविदा संदर्भातील सर्व कामकाज हाताळणे.
- प्रशासकीय व आस्थापना विषयक सर्व कामकाज हाताळणे.
|