1.
मनपा क्षेत्रातील (प्रभाग क्र. १
ते ६ मधील) दुकाने आस्थापना वरिल जाहिरात फ़लकांचा वर्षनिहाय सर्वेक्षण करणे व
जाहिरात फीची आकारणी करुन वसुली करणे.
2.
जाहिरात विभागातील प्रस्ताव,
निविदा, करारनामे इत्यादी कामे मुदतीत वरीष्ठांना सादर करणे.
3.
ठेक्याने /खाजगी होर्डिंग्ज/ प्रदुषण व
वातावरण नियंत्रण दर्शक फलक व जाहिरात फलक तसेच इतर जाहिरात स्रोत यांचे
निविदा/प्रस्ताव/परवानगी विषयक आवश्यक कामे पार पाडणे. तसेच परवानगी/ नुतणीकरण
व शुल्क वसुली करीता संबंधित
व्यक्ती/संस्था यांचेशी पत्रव्यवहार करणे.
4.
केंद्रशासनाचा माहिती अधिकार
अधिनियम 2005 अन्वये सहा. जनमाहिती अधिकारी म्हणून काम करणे. तसेच
मा.खासदार/आमदार/ नगरसेवक यांचे पत्र,
लोकशाही दिन, जनता दरबार, शासन पत्रव्यवहार न्यायालयीन प्रकरणे विषयी पत्रव्यवहार
करणे व माहिती उपलब्ध करुन देणे.
5.
वार्षिक जमेच्या अंदाजपत्रकारीता
माहिती तयार करणे.
6.
लेखापरिक्षणा मधिल आक्षेपांची
पुर्तता करणे.
7.
आपले सरकार, प्रधानमंत्री
पोर्टल, टोल फ्री क्रमांक इ. ई-ऑफिस वरील तक्रारी पहाणे, व यांचेशी पत्रव्यवहार
करणे.
8.
मा. उच्च न्यायालयाच्या वेळोवेळी
पारित होणाऱ्या आदेशानूसार विनापरवानगी लागणाऱ्या स्थायी होर्डींग /प्रदुषण व
वातावरण नियंत्रण दर्शक फलक व जाहिरात फलकावरील जाहिराती काढण्याची कारवाई करणे.
9.
मा. उच्च न्यायालयाच्या वेळोवॆळी
पारित होणा-या आदेशा नुसार अनधिकृत जाहिराती बाबत नोडल आफिसर तथा प्रभाग आधिकारी
यांचेशी समन्वय साधुन माहिती प्राप्त करणे.
10.
मा.खासदार/आमदार/ नगरसेवक यांचे पत्र, लोकशाही दिन, जनता दरबार, शासन पत्रव्यवहार न्यायालयीन प्रकरणे विषयी
पत्रव्यवहार करणे व माहिती उपलब्ध करुन देणे.
11. लेखापरिक्षणा मधिल आक्षेपांची पुर्तता करणे.
|