· महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयाच्या माध्यमातुन आरोग्य सेवा पूरविल्या जातात. · बालकांचे नियमित लसीकरण (सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम) · राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मुलन कार्यक्रम · सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) · राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम · राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम · सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम यशस्वीपणे राबविणे. · हत्तीरोग कार्यक्रम राबविणे · कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे. · महाराष्ट्र शासनाचे माता व बाल प्रजनन (आरसीएच) कार्यक्रम राबविणे. · राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) महानगरपालिका क्षेत्रात राबविणे. · महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत 10 आरोग्य केंद्रे, 2 उपकेंद्र व 1 रुग्णालयांमार्फत सामाजिक व आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जातात. · रुग्णालयाच्या प्रसुतिगृहांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच बालरोग तज्ज्ञांमार्फत स्वाभाविक व गरज पडल्यास शस्त्रक्रियेद्वारे प्रसुति केल्या जातात. · वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आरसीएच प्रकल्प टप्पा – 2 कार्यक्रमाद्वांरे माता व बाल संगोपन विषयक सेवा पुरविल्या जात आहेत. · मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालये व नर्सिंग होम यांची महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 अन्वये नोंदणी करण्यात येते. · 1 / 2 मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याऱ्या जोडप्यांच्या मुलींच्या नावे रक्कम रु. 20,000/- बचत प्रमाणपत्र 18 वर्षाकरीता देण्यात येत आहेत. |