ग्रंथालय व अभ्यासिका
मिरा भाईंदर परिसरातील वाचनाची व अभ्यासाची आवड असणा-या नागरिकांसाठी व विदयार्थ्यांसाठी महानगरपालिकेतर्फे खालील प्रमाणे वाचनालय व अभ्यासिकेची सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
// भाईंदर (प.) //
1. नगरवाचनालय व अभ्यासिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन
(नगरभवन), दुसरा मजला, मांडली तलाव समोर, भाईंदर (प.)
नगरवाचनालयाची स्थापना 13 फेब्रुवारी 1994 रोजी करण्यात आली आहे. सध्या नगरभवन येथील वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 27,202 ग्रंथांचा समावेश आहे. नगरवाचनालयात एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. नगरवाचनालयात संदर्भ विभाग समृध्द असून वाचक वाचनालयात ब्रिटानिका, वर्ल्ड बुक इत्यादी नावाजलेल्या संदर्भ ग्रंथांचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे ग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहेत. नगरवाचनालयात मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. शहरातील नागरिकांना वाचनालयात दररोज 34 वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सोय केलेली आहे.
2. आरक्षण क्रमांक 100 विरंगुळा केंद्र अभ्यासिका, फ्लायओव्हर ब्रिज जवळील आय.डी.बी.आय. बँके जवळ भाईंदर (प.)
आरक्षण क्र.100, विरंगुळा केंद्र या इमारतीतील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर
विदयार्थ्यांकरीता मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
3. गणेश देवल नगर, शिवसेना गल्ली, भाईंदर (प.)
गणेश देवल
नगर, शिवसेना गल्ली, तळ मजला व
पहिल्या विदयार्थ्यांकरीता मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
// भाईंदर (पू.) //
1. प्रभाग समिती कार्यालय
क्रमांक 3 वाचनालय व अभ्यासिका, तलाव रोड, भाईंदर (पू.)
प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 भाईंदर (पु.) येथील इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व पहिल्या / तिसऱ्या मजल्यावर अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. प्रभाग समिती कार्यालय
क्रमांक 3 वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 6451 ग्रंथ आहेत. तसेच या वाचनालयात एकूण 37 नियतकालिके (20 मासिके, 7 पाक्षिके, 10 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 73 ते 100 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. दररोज 13 वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
3. जैसलपार्क समाजमंदीर, अभ्यासिका, भाईंदर (प.)
जैसलपार्क समाजमंदीर, अभ्यासिका, भाईंदर (पु.) येथे ईमारतीमधील पहिल्या मजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
2. हनुमान नगर वाचनालय व अभ्यासिका, गोडदेव-फाटक रोड भाईदर (पू.)
हनुमान नगर वाचनालय, भाईदर (पू.) येथे तळमजल्यावर वाचनालय व पहिल्या मजल्यावर अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 5,200 ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच वरील ठिकाणी 06 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
3. सावित्रीबाई फुले
अभ्यासिका, यशवंत गार्डन जवळ, नवघर रोड भाईंदर (पू.)
सावित्रीबाई फुले अभ्यासिका, यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू.) ईमारतीमधील तळमजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
// मिरा रोड (पू.) //
1.राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका, इंदिरा गांधी रुग्णालय, पुनमसागर कॉम्प्लेक्स मिरारोड (पू.)
राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पु.) येथे दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 20,000 ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय येथे एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. वरील ठिकाण 30 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
2. ॲमेनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पुनम गार्डन, मिरा रोड (पू.)
ॲमेनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पुनम गार्डन, मिरा रोड (पू.) ईमारतीमधील पहिल्या मजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ग्रंथालयीन सेवा :
·
ग्रंथालय : 1) नगरवाचनालय डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन) भाईंदर (प.) 2) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 भाईंदर (पू.) 3) राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पू.)
- अभ्यासिका : 1)
नगरवाचनालय, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन) भाईंदर (प.) 2) आरक्षण क्र.100 विरंगुळा
केंद्र, फ्लायओव्हर ब्रिज, आय.डी.बी.आय. बँके जवळ भाईंदर (प.), 3) गणेश
देवल नगर अभ्यासिका भाईंदर (प.) 4) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 भाईंदर (पू.) 5)
हनुमान नगर, गोडदेव-फाटक रोड, भाईंदर (पू.) 6)
सावित्रीबाई फुले अभ्यासिका,
यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू.) 7) राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय,
मिरारोड (पू.) 8)
ॲमेनिटी ओपन स्पेस अभ्यासिका,
पुनम गार्डन, मिरा रोड (पू.)
- संदर्भ सेवा : 1)
नगरवाचनालय डॉ. बाबासाहेब
आंबेडकर भवन (नगरभवन) भाईंदर (प.) 2) प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 भाईंदर
(पू.) 3) राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालय
मिरारोड (पू.) येथील वाचनालयात विश्वकोष, ब्रिटानिका, वर्ल्ड बुक इ. बरेचसे संदर्भग्रंथ असुन परिसरातील बरेचसे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचा लाभ घेतात.
- मोफत वृत्तपत्र वाचन सेवा : 1) नगरवाचनालय, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन) भाईंदर (प.) 2) प्रभाग समिती
कार्यालय क्रमांक 3 भाईंदर (पू.) 3)
हनुमाननगर, गोडदेव-फाटक रोड, भाईंदर (पू.) 4) राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय
मिरारोड (पू.) येथे मिरा-भाईंदर मधील नागरिकांसाठी मोफत वृत्तपत्रे वाचनकक्ष असुन बरेचसे नागरीक त्याचा लाभ घेतात.
- पुस्तके देवाण-घेवाण सेवा : वाचनालयांमार्फत सभासदांना मागणीनुसार ग्रंथ वाचावयास दिले जातात.