विभाग प्रमुख | सुनिल यादव |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ०२२-२२८१९२८२८ विस्तारीत क्रमांक १३६ |
ई- मेल | gad@mbmc.gov.in |
प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षण करणे. अधिकारी कर्मचारी यांचे आस्थापना विषयक सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे. कोकण विभागीय आयुक्त यांचेकडील लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे.
माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्राप्त झालेल्या अर्जावर विहित मुदतीत कार्यवाही करणे. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांना विहित मुदतीत उत्तर देणे. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांबाबत सर्व विभागाचा आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुख यांना कार्यवाही बाबत पत्र व्यवहार करणे. माहितीच्या अधिकारासंदर्भात जिल्हा लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय ग्रुप विमा योजनेबाबतची कार्यवाही करणे. सामान्य प्रशासन विभागाकडील निविदाबाबतची कार्यवाही करणे. सामान्य प्रशासन विभागाकडील अर्थसंकल्पाबाबत कार्यवाही करणे व लेखापरिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. विभागानूसार जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करणे वार्षिक प्रशासन अहवाल बाबत कार्यवाही करणे. आर्थिक गणनेचे काम पाहणे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या राष्ट्रीय सणांचे ध्वजरोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे व अधिकारी / कर्मचाऱ्यांना सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या बाबत मा. उपायुक्त (मु.) यांच्या मंजूरीने आदेश देणे. सहा. आयुक्त यांच्याकडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे. मा. उपायुक्त, (मु.), सहा. आयुक्त (सा.प्र.) यांनी वेळोवेळी सोपवलेली कामे करणे आर्थिक गणनेचे काम पाहणे.
महानगरपालिका लोकशाही दिनी प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी देऊन कार्यवाही बाबतची गोषवारा तयार करणे व लोकशाही दिनी मा. आयुक्त सो. / उपायुक्त (मु.) यांना सादर करणे. माहितीच्या अधिकारासंदर्भात प्रत्येक महिन्याच्या जिल्हा लोकशाही दिनाच्या आढावा बैठकीकरिता सर्व विभागाची नमुना प्र-पत्रामध्ये माहिती संकलीत करून बैठकी करिता गोषवारा तयार करणे. माहितीच्या अधिकारातील प्र-पत्राबाबत वार्षिक अहवाल शासनास पाठविणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. लेखापरिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे. सहा. आयुक्त, (सा.प्र.) यांचे कडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे. दैनंदिन पत्रव्यवहार आवक नोंदीनूसार संबंधित विभागास देणे. आवक-जावक रजिस्टर अद्यावत ठेवणे. माहिती अधिकार खालील प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागास कार्यवाहीसाठी देणे. माहितीच्या अधिकाराचे नोंदणी आवक रजिस्टर अद्यावत ठेवणे. कार्यालयीन आदेश / परिपत्रक, शासन निर्णयची नस्ती अद्यावत ठेवणे. सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित शासकिय, महापौर, नगरसेवक, नागरीक यांच्या पत्रांना उत्तरे देणे. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.
अ.क्र | पदनाम | कायदेशीर तरतूद | जबाबदारी व कर्तव्ये |
---|---|---|---|
1 | उपायुक्त | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४९, ९४ |
|
2 | सहा. आयुक्त | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४९, ९४ |
|
3 | लिपीक |
| |
4 | दुरध्वनी सहाय्यक |
| |
5 | शिपाई | विभाग प्रमुख/वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे. | |
6 | सफाई कामगार | विभाग प्रमुख/वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे. | |
7 | ठेका संगणक चालक | संगणकावरील कार्यालयीन सर्व कामकाज करणे. तसेच ऑनलाईन बजेट एन्ट्री करणे. |
परिपत्रक- माहे मार्च 2024 जयंतीबाबत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत |
कार्यालयीन कामकाज करणेकरीता उपस्थित राहणे बाबत
माहे फेब्रुवारी २०२४ जयंतीबाबत.
परिपत्रक - शुक्रवार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम
ठेका कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करणेबाबत परिपत्रक दि.27-12-2023
विभाग प्रमुख | सुनिल यादव |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ८४२२८११५०७ |
ई- मेल | establishment@ mbmc.gov.in |
मिरा भाईंदर महानगरपालिकेमधील आस्थापना विभागाद्वारे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, महाराष्ट्र शासन नियम/निर्णय/ परिपत्रके/अधिसूचना व महानगरपालिकेतील संविधानिक समित्याद्वारे पारित ठराव इ. विचारात घेऊन नियमानुसार खालीलप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येते.
स्थायी अधिकारी/कर्मचारी देयक | ||
महिना | अधिकारी/कर्मचारी संख्या | रक्कम |
ऑगस्ट-2021 | 1300 | रु.6,13,20,929/- |
वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2021 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
वर्ग-01 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
वर्ग-02 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2022 ची अंतिम सेवा जेष्ठता यादी
वर्ग-01 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी_0001
वर्ग-02 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम सेवाजेष्ठता यादी_0001
वर्ग-03 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी
वर्ग-04 संवर्गातील अधिकारी यांची दि.01-01-2023 रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी_0001
सेवाजेष्ठता यादी ३०/०१/२०२४ |