विभाग प्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ई- मेल |
---|---|---|
नरेंद्र चव्हाण | controller.encroachment@mbmc.gov.in |
मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रांतील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनासाठी करण्यांसाठी मुख्य कार्यालय व प्रभाग कार्यालय असे दोन क्षेत्रांत मध्ये विभागणी करण्यांत आलेली आहे. कार्यालयातुन आलेल्या सर्व तक्रारी प्राधान्यांने प्रभाग अधिकारी यांच्याकडे पाठवुन शहानिशा करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रभाग अधिकारी यांच्याकडुन घेवुन मा. उपायुक्त(मु.) व मा. आयुक्त साो. यांचेकडे सादर करण्यांत येत आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेचे भौगोलिक क्षेत्र ७९.४० चौ.कि.मी. इतके आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रांतील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनासाठी करण्यांसाठी मुख्य कार्यालय व प्रभाग समिती कार्यालय असे दोन भागात विभागणी करण्यांत आलेली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकुण ६ प्रभाग समिती कार्यालय कार्यरत असून, प्रत्येक प्रभाग समितीसाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे सहा. आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी नियुक्त केलेले आहेत. मुख्य कार्यालयात प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी प्राधान्यांने संबंधित प्रभाग समिती कार्यालयात सहा.आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे पाठविल्या जातात. प्रभाग समिती कार्यालयातून सदर तक्रारींची शहानिशा करुन, कायदेशिर प्रक्रियेचा अवलंब करुन त्याच्यावर कारवाई करुन केलेल्या कारवाईचा अहवाल मा. उपायुक्त (अतिक्रमण नियंत्रण) यांचेकडे वेळोवेळी सादर करण्यांत येत असतो.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामास आळा घालण्याच्या दृष्टीने खाली नमूद केल्याप्रमाणे कार्यपद्धती व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकुण ६ प्रभाग कार्यालय समित्या कार्यरत असून, प्रत्येक समितीसाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे सहा. आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी नियुक्त केलेले आहेत. शहरातील अतिक्रमणे तथा अनाधिकृत बांधकामावर प्रभावी पणे कार्यवाही करणेकामी प्रभाग समिती कार्यालय अंतर्गत पथके नेमलेली आहेत. या पथकात सहा.आयुक्त, कनिष्ठ् अभियंता व मजुर वर्ग अशा प्रकारे १० ते १२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच या ६ प्रभाग समिती कार्यालयात कर विभागाचे लिपीक कर्मचारी यांचे ४० बीट मध्ये विभाजन करुन त्यांना बीट निरीक्षक म्हणून त्यांचे कार्यक्षेत्रामधील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना “पदनिदैशित अधिकारी” म्हणून संबोधले असून त्यांना विशिष्ट् अधिकार देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या मार्फत अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याच्या विहित केलेल्या कार्यपध्दती नुसार नियमित कार्यवाही करण्यात येते.
मिरा–भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामास आळा घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६० (१), २६१, २६४, २६७, ४७८ नुसार कार्यवाही करणेकरीता पदनिर्देशित अधिकाऱ्यांना निश्चित अधिकार दिले आहेत. पदनिर्देशित अधिकाऱ्यांन मार्फत अनाधिकृत बांधकामास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६० (१ क), २६४, २६७ व ४७८ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३, ५४ व ५५ प्रमाणे नोटीस देऊन नोटीसची मुदत संपल्या नंतर कायदेशिर प्रक्रियेचा अवलंब करुन कागदपत्राची छाणणी/ पडताळणी करुन पुढील कार्यवाही केली जाते. याप्रमाणे पदनिर्देशित अधिकाऱ्याची कार्यपध्दती व जबाबदारी निश्चित करुन अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई कायद्यानुसार विहीत केलेल्या कार्यपध्दती नुसार करण्यात येत आहे.
मा. आयुक्त महोदय यांचे जा.क्र.मनपा/आयुक्त/056/2020-21 दि.24/12/2020 रोजीच्या आदेशान्वये मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक / मोडकळीस आलेल्या किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणेची कार्यपध्दती (SOP) विहीत करण्यात आलेली असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 264 च्या प्रयोजनाकरीता संबधित प्रभाग समिती क्षेत्राचे प्रभाग अधिकारी यांना राजपत्राद्वारे पदनिर्देशित अधिकारी यांना अधिकार प्रदान केलेले आहे. तरी विहीत केलेल्या मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure) नुसार कार्यवाही करण्यात येते.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात प्रसिध्द् होणारे अनधिकृत बोर्ड/ बॅनर दैनंदिन रित्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाकडून काढून टाकण्यात येतात.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ना फेरीवाला क्षेत्रात बसणारे फेरीवाले यांचेवर कारवाई करणेकरीता प्रभाग समितीचे सहा.आयुक्त यांचे अधिनिस्त फेरीवाला पथक प्रमुख व मजुर वर्ग तसेच सुरक्षा रक्षक नियुक्त केले असून सदर पथकामार्फत दैनंदिनरित्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत असते.
अ.क्र | अधिकारी यांचे पदनाम | कार्य |
1) | उपायुक्त (अतिक्रमण) | 1. सर्व प्रभाग समिती कार्यालयाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 2. अतिक्रमण/अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवणे संदर्भात सहा.आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेकडून कार्यवाही करणेबाबत सूचना देवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागविणे व आढावा घेणे. 3. माहिती अधिकार अर्जा अंतर्गत अपिलिय अधिकारी म्हणून कामकाज पाहणे. |
2) | विभागप्रमुख (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, मुख्य कार्यालय)
| 1. मुख्य कार्यालयात अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम, अनधिकृत फेरीवाले, धोकादायक इमारती इत्यादी संदर्भात नागरीकांचे किंवा लोकप्रतिनिधींचे प्राप्त अर्ज उचित कार्यवाही करीता प्रभाग समिती कार्यलयास वेळोवेळी वर्ग करणे. 2. मा. उप-आयुक्त व प्रभाग समितीचे सहा.आयुक्त यांचेमधील कामकाजाचे समन्वय साधणे. तसेच अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बोर्ड/बॅनर, धोकादयक इमारती या विषयक कामकाजांचे नियोजन करणे. 3. मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, फेरीवाले, होर्डींग्ज, पोस्टर्स,बेनर्स,मोबाईल टॉवर याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित सहा. आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांना कळवून सदर तक्रारीवर उचित कार्यवाही करणेकरीता सूचित करणे. जर कारवाई मोठ्या प्रमाणात किंवा संवेदनशिल असेल तर सर्व प्रभागातील मनुष्यबळ एकत्रित करुन कारवाई करणे. 4. माहीती अधिकार अर्ज संबंधित प्रभाग समितीस वर्ग करणे. 5. अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम संबंधी मुख्य् कार्यालयातील प्रशासकीय कामकाज पाहणे. 6. शासकीय पत्रव्यवहार करणे. |
3) | लिपिक (मुख्य कार्यालय) | 1. अतिक्रमण विभागात आलेल्या टपाल /तक्रार अर्जाची नोंद घेणे. 2. टपाल प्रभाग निहाय वाटप कारणे. 3. प्रभाग निहाय आलेले अहवाल एकत्रित करणे. 4. वरिष्ठांनी वेळो वेळी दिलेले कामकाज पाहणे. 5. अतिक्रमण व अनधिक्रत बांधकाम नियंत्रण विभागातील कामकाजाचे देयके बनविणे. 6. माहीती अधिकार अर्ज प्रभागवार करणे/ पाठविणे |
पत्ता :- मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालय, इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर पश्चिम, मिरा भाईंदर , ठाणे महाराष्ट्र ४०१ १०१
कार्यालयीन दूरध्वनी :- ०२२- २८१९२८२८ विस्तार क्रमांक 246
सन 2020-21
अ.क्र. | अंदाज पत्रकिय शिर्ष | लेखाशिर्ष कोड | मंजुर रक्कम (तरतुद) (रु. लाखांत) |
1) | अतिक्रमण सुरक्षा रक्षक/पोलिस बंदोबस्त (आस्थापना संबंधीत) | 2572 | 405.00 (आस्थापना संबंधीत) |
2) | आकस्मित खर्च/ अतिक्रमण सर्वेक्षण | 2229 | 5.00 |
3) | जे.सी.बी., गॅसकटर्स, ट्रक इत्यादी भाडयाने घेणे. | 2560 | 150 |
4) | मुख्य रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले हटविणेकामी येणारा खर्च् | 2560 | 75 |
सन 2021-22
अ.क्र. | अंदाज पत्रकिय शिर्ष | लेखाशिर्ष कोड | मंजुर रक्कम (तरतुद) (रु. लाखांत) |
1) | अतिक्रमण सुरक्षा रक्षक/पोलिस बंदोबस्त (आस्थापना संबंधीत) | 2572 | 350.00 (आस्थापना संबंधीत) |
2) | आकस्मित खर्च/ अतिक्रमण सर्वेक्षण | 2229 | 5.00 |
3) | जे.सी.बी., गॅसकटर्स, ट्रक इत्यादी भाडयाने घेणे. | 2560 | 150 |
4) | मुख्य रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले हटविणेकामी येणारा खर्च् | 2560 | 10 |
सन 2022-23
अ.क्र. | अंदाजपत्रकिय शिर्षक | लेखाशिर्ष कोड | मंजुर रक्कम (तरतुद) (रु. लाखांत) |
1) | अतिक्रमण पोलिस बंदोबस्त/ सुरक्षा रक्षक खर्च (आस्थापना संबंधीत) | 2572 | 200.00 (आस्थापना संबंधीत) |
2) | आकस्मित खर्च/ अतिक्रमण सर्वेक्षण | 2229 | 5.00 |
3) | जे.सी.बी., गॅसकटर्स, ट्रक खरेदी/ भाडयाने घेणे. | 2560 | 300.00 |
4) | मुख्य रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले हटविणेकामी येणारा खर्च् | 2560 | 200.00 |
नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. कडोंमपा-1006/प्र.क्र.192/2006/ नवि-28 दि.02 मार्च, 2009: राज्यातील नागरी भागात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण/ निर्मूलनासाठी उपाययोजना
मा. आयुक्त महोदय यांचे जा.क्र.मनपा/आयुक्त/124/2017-18 दि.06/01/2018 रोजीचे कार्यालयीन आदेश.
नगर विकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : विसआ-2015/प्र.क्र.349/ नवि-20 दिनांक: 05 नोव्हेंबर, 2015: ज्युन्या/ मोडकळीस आलेल्या इमारतीबाबत पावसाळ्यापुर्वी करावयाची कार्यवाही.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम हटविणेकामी वापरण्यात आलेले मनुष्य बळ व साहित्य पुरवठा करणे कामी मागील प्रलंबित देयकांचा रक्कम रु.4,13,91,930/- इतका सन 2021-22 या वर्षात खर्च झालेला आहे.
नागरिकांनकडून कार्यालयास प्राप्त तक्रारी संबंधीत प्रभाग समिती कार्यालयास पुढील उचित कार्यवाही करीता वर्ग करण्यात येत असतात.
माहिती अधिकार अधिनियम |
---|
मंडप पेंडॉल तपासणी बाबत गठित पथकाची यादी |
मनपा /अतिक्रमण /२८१ जाहीर आव्हान |
* प्रभाग क्र. 03 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबतची माहिती मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत २०१८ ते २०२३
* प्रभाग समिती क्र.3 च्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत माहिती सन २०१८ ते २०२२