विभाग प्रमुख | दुरध्वनी क्रमांक | ई मेल |
विक्रम निराटले | 9819544642 | animalhusbandary@mbmc.gov.in |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिकेच्या कर्तव्याचा खालीलप्रमाणे अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
पदनाम | सोपविण्यात आलेले काम |
उप-आयुक्त पशुसंवर्धन | 1. पशुसंवर्धन विभागास नेमून दिलेल्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे. 2. पशुसंवर्धन विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 3. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये पशुसंवर्धन विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे. 4. मा. आयुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे. |
पशुवैदयकीय अधिकारी (ठोक मानधन) | 1. शहरातील मोकाट कुत्रे पकडून निर्बिजीकरण करुन लसीकरण करणे, यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदाराची नियुक्ती करणे. 2. जैन धर्मिंयाचे पर्युषण पर्वानिमित्त श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुध्द ४ या दोन दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवणेबाबतची कार्यवाही करणे. 3. दरवर्षी “महावीर जयंती” या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही करणे. 4. दर वर्षी बकरी ईदनिमित्त महानगरपालिका क्षेत्रात बकरा मंडी उभारण्यास व जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देणेची कार्यवाही करणे. 5. शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यामध्ये बंदिस्त करण्याची कार्यवाही करणे. 6. पशुसंवर्धन विभागाचे जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे. 7. मा. आयुक्त व मा. उप-आयुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे. |
लिपिक | 1. विभागाचे कार्यालयीन दैनंदिन पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे. 2. शहरातील भटके / पिसाळलेल्या कुत्र्यासंबंधी तसेच मोकाट जनावरांसंबंधी येणा-या तक्रारीवर कारवाई करणे. 3. मोकाट जनावरे बंदिस्त करुन जनावर मालकाकडून दंडात्मक कारवाई करणे. 4. निविदा प्रक्रियेचे कामकाज करणे. 5. वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसा कामकाज करणे. 6. पशुसंवर्धन विभागाचे सहा. जन माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे. |
अस्थायी संगणक चालक | पशुसंवर्धन विभागातील कार्यालयातील गोषवारे, ठराव, टिप्पणी इ. संगणकाचे काम करणे |
शिपाई | वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे. |
शिपाई | वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे. |
स.का. | १) मिरा भाईंदर शहरातील रोडवरील मोकाट जनावरे पकडून त्यांना महानगरपालिकेच्या कोंडवाड्यात बंदिस्त करणे. २) बंदिस्त केलेल्या जनावरांना चारा-पाणी देणे. ३) बंदिस्त केलेल्या जनावरांच्या मालकाने दंड भरल्यानंतर त्यांना जनावरे ताब्यात देणे. ४) वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे |
स.का. |
अर्थसंकल्पिय तरतुद सन 2022-23 पशुसंवर्धन विभाग
लेखाशिर्षकाचे नाव | उपलब्ध तरतूद |
---|---|
मोकाट कुत्रयांचा / इतर प्राण्यांचा बंदोबस्त् / निर्बिजीकरण | रु. 75 लाख |
सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव | पशूसंवर्धन विभाग |
संपुर्ण पत्ता | मुख्य कार्यालय, भाईंदर पश्चिम. |
कार्यालय प्रमुख | उप-आयुक्त (पशूसंवर्धन) |
कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे? | पशूसंवर्धन विभाग |
कार्यकक्षा : भौगोलिक | सुमारे 79 चौ. कि.मी. |
अंगीकृत व्रत (Mission) | सक्षम, तत्पर प्रशासन |
ध्येय धोरण (Vision) | अंतर्गत व बाह्य प्रशासनात पारदर्शकता |
साध्ये | नागरी सुविधा |
जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल |
|
कार्यालयाची वेळ आणि दुरध्वनी क्रमांक (सर्व दुरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन काळानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही क्रमांक द्यावा) | सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत कार्यालयीन दुरध्वनी – 28192828/ 28193028 |