मिरा भाईंदर महानगरपालिकेविरुध्द मा. दिवाणी न्यायालय, ठाणे, मा. औद्योगिक न्यायालय, ठाणे, ग्राहक तक्रार निवारण न्यायालय, ठाणे, मा. उच्च न्यायालय, मुंबई व मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे दाखल होणारे दिवाणी दावे, खटले, रिट याचिका व इत्यादी न्यायालयीन प्रकरणातील कामकाज विधी विभागामार्फत केले जाते. स्वतंत्र विधी विभागाची स्थापना साधारणत: सन 2005 मध्ये करण्यात आलेली आहे.
विधी विभागातील कामकाज सुरळीत होण्याकरिता विधी विभागात संगणकीय आज्ञाप्रणाली विकसित करण्यात आली असून विधी विभागातील सन 2000 ते आत्तापर्यंत मा. दिवाणी न्यायालय, ठाणे येथे महानगरपालिकेविरुध्द दाखल झालेल्या दाव्यांचा अभिलेख (Updated) अद्यावत चालू आहे. तसेच सदरची आज्ञाप्रणाली मनपाच्या www.mbmcrti.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
महापालिकेचा नोंदणीकृत लोगो वापरासंदर्भात मा. महासभेमध्ये धोरण निश्चित करण्यात आले आहे.
तसेच मनपाच्या नियोजीत विकास योजनेतील काही महत्वपूर्ण कामाबाबत न्यायप्रविष्ठ झालेली प्रकरणे मनपाच्या बाजूने निकाली काढण्यात आले आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबत मा. न्यायालयातील दाव्यांमध्ये महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय लावून बहुतांशी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.
मनपा विरुध्द दाखल झालेल्या बरेचशा दाव्यात मनपा अभियोक्त्यास वेळेत माहिती पुरविल्यामुळे लेखी कथन दाखल करण्यात आले नव्हते सदर प्रलंबित दाव्यात, संबधीत विभागाकडून माहिती मागवून लेखी कथन दाखल करण्यात आले आहेत.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या पॅनलवरील अभियोक्त्यांना देण्यात येणाऱ्या बिलांची नोंद विधी विभागाच्या संकेतस्थळावर अद्यावत करण्यात येत आहे.
रस्ता रुंदीकरणात बाधीत बांधकामाबाबत दाखल झालेल्या दाव्यांमध्ये मनपाच्यावतीने Undertaking दाखल करून बहुतांश दावे निकाली करून घेण्यात आली.
अनधिकृत बांधकामाबाबत मनपामार्फत कायदेशीर कारवाई करून बांधकाम तोडण्यात येईल असे Undertaking दाखल करून बहुतांशी दावे निकाली काढण्यासाठी मा. न्यायालयात अर्ज करण्यात आले आहे.
सन 2015-16 व 2016-17 च्या कालावधीतील सेवा कर रु. 7,53,93,500/- करीता बजाविण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसासंदर्भात मा. आयुक्त सी.जी.एस.टी. ठाणे यांच्याकडे मनपाच्यावतीने बाजू मांडली असता दि. 29/05/2020 रोजी मा. आयुक्त यांनी 7,53,93,500/- ऐवजी रु. 19,23,991/- सेवा कर भरणा करण्यास मनपास आदेशित केले आहे.
सन 2020-21 मध्ये मा. दिवाणी न्यायालय ठाणे येथील न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये महानगरपालिकेच्या बाजूने 20 दावे निकाली काढलेले आहेत.
सन 2020-21 मध्ये मा. उच्च न्यायालय मुंबई येथील न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये महानगरपालिकेच्या बाजूने 23 याचिका/अपील निकाली काढलेले आहेत.