विभाग प्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्र. | ई-मेल | कार्यालयाची वेळ | साप्ताहिक सुट्टी आणि विशेष सेवांचा कालावधी |
सोनाली मतिकर | 28149042/28044959 | education@mbmc.gov.in | सकाळी १०:०० ते ५:४५ | दुसरा, चौथा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी |
प्रस्तावनादि. 22/02/1994 रोजी जिल्हा परिषदेकडुन मिरा भाईंदर महानगरपालिकेकडे 04 माध्यमाच्या 28 शाळा (मराठी, हिंदी, उर्दु व गुजराती) इमारती व 202 शिक्षकांसह हस्तांतरण झाल्या आहेत. त्यानंतर दि. 28/02/2002 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका स्थापन झाल्याने दि. 21/04/2006 रोजी शासन राजपत्रात शिक्षण विभाग अस्तित्वात आला. आजमितीस मनपाच्या 36 शाळा (मराठी-21, हिंदी-5, उर्दू-5 गुजराती-5) असुन त्यात इ. 1 ली ते इ.10 वी चे माहे जुलै 2023 नुसार 8845 विदयार्थी शिक्षण घेतात व 151 शिक्षक कार्यरत आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळेत शिक्षण घेणारे विदयार्थी हे तळागळातील गोरगरीब व गरजु समाजातील जीवन जगणाऱ्या पालकांची असल्याने त्यांचा शैक्षणिक व गुणात्मक विकास होणे करिता शिक्षण विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभाग हा मिरा भाईंदर कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांवर नियंत्रण व देखरेखीचे काम करतो. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिव्यांग (अंध, मतीमंद, मुकबधिर इ.) मुलांचे सर्वेक्षण करून जे विदयार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत अशा विदयार्थ्यांना घरोघरी जाऊन मोबाईल टिचरांमार्फत शिक्षण दिले जाते. अशा प्रकारे मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही विदयार्थी शिक्षणापासुन वंचित राहणार नाही याची दक्षता शिक्षण विभागामार्फत घेतली जाते. |
शालेय पोषण आहार योजनेची
माहिती शालेय पोषण आहार (Mid- Day Meal) ही योजना इ. 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत इ. 1 ली ते 5 वी या प्राथमिक वर्गातील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ. 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडुन प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च्ा प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदुळ पुरविण्यात येतो. मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेल्या महानगरपालिकेच्या 36 शाळा आणि खाजगी अनुदानित 17 शाळा अशा एकुण 53 शाळांमध्ये योजना प्राथमिक व उच्च प्राथमिक मध्ये राबविली जाते. इ. 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना 100 ग्रॅम आणि इ. 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम तांदुळ प्रती दिन प्रति विद्यार्थी वाटप केला जातो. शहरी भागामध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शासनाकडुन तांदुळ प्राप्त होत असुन विद्यार्थ्यांना तयार अन्नाचा पुरवठा केला जातो. तयार अन्नाचा पुरवठा करणाऱ्यांना पुरवठादारांना प्रति दिन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीप्रमाणे शासनाने अद्यावत केलेल्या ऑनलाईन प्रणालीमध्ये मुख्याध्यापकांमार्फत इ. 1 ली ते 5 वी साठी 4.48 आणि इ.6 वी ते 8 वी साठी 6.71 या दरानुसार प्रति दिन लाभार्थी विद्यार्थ्यांची एम. डी. एम. ॲपद्वारे नोंद करुन ऑनलाईन प्रणालीद्वारे मानधन प्राप्त होते. शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसार शाळेच्या खात्यावर मा. शिक्षण संचालक, पुणे यांच्यामार्फत ऑनलाईन प्रणालीद्वारे मानधन जमा होते. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण राज्यभर दिनांक 23 मार्च, 2020 पासुन लॉकडाऊन होते. सदर कालावधीमध्ये राज्यातील सर्व शाळा बंद असल्यामुळे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शिल्लक असलेला तांदुळे विद्यार्थी/पालकांना वितरीत करणेबाबत शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या पत्रातील मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांना धान्याचे (तांदुळ, मुगडाळ, हरभरा, मसुरडाळ) वाटप करण्यात आलेले आहे. |
शिक्षण विभाग प्राप्त अनुदान तपशील
|
अनुदान प्राप्त तपशील – मनपा (50 टक्के) व शासन 50 टक्के
मिरा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभाग आस्थापनेवरील शिक्षक, सेवानिवृत्तधारक व
कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांचे वेतनासाठी 50% मनपा अनुदान व 50% शासनअनुदान प्राप्त होते. शिक्षण विभागांतर्गत
मनपाच्या एकुण 36 शाळा असुन सदयस्थितीत 157 शिक्षक कार्यरत असुन 01 शिक्षक कायम गैरहजर आहेत. तसेच 22 कुटुंबनिवृत्तीधारक असुन 147 सेवानिवृत्तीधारक आहेत. |
मनपा शिक्षण विभाग अंतर्गत समग्र शिक्षा उपक्रमांतर्गत कर्मचारी
|