• मिरा भाईंदर महानगरपालिके मध्ये स्वागत आहे

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगररचना

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ई- मेल
पुरुषोत्तम शिंदे  

022-28108165/28121455 / 9766198000

tp@mbmc.gov.in

 

टिप्पणी

पद  संख्या 
सहाय्यक संचालक, नगररचना 01
नगररचनाकार 01
सहायक नगररचनाकार 01
शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता    03
मुख्य सर्व्हेअर 01
अनुरेखक  01
लिपीक 07
संगणक चालक 02
शिपाई 03
सफाई कामगार 03
मोकळया जागा कर आकारणी –  लिपीक 01

नगररचना विभागाकडील कामाचे स्वरुप :-

विकास योजना अंमलबजावणी, आरक्षणाखालील जागेचे भुसंपादन करणे, बांधकाम परवानगी प्रकरणी छाननी करणे तसेच विकास नियंत्रण नियमावलीनुसार इतर अनुषंगीक कामे करणे, अनधिकृत बांधकामा संदर्भात आवश्यक माहिती सह तांत्रिक सहकार्य / मार्गदर्शन करणे तसेच विभागाकडील न्याप्रविष्ठ प्रकरणात कार्यवाही करणे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये प्रकरणात कार्यवाही करणे.मिरा भाईंदर शहराची विकास योजना (वगळलेला भागसोडून) ही दि.14/05/1997 रोजी मंजूर झालेली असून, ती दि.15/07/1997 पासून अंमलात आलेली आहे. वगळलेल्या भागाची विकास योजना ही दि.25/08/2000 रोजी मंजूर झालेली असून ती दि.15/10/2000 पासून अंमलात आलेली आहे. तसेच प्रारुप सुधारीत विकास योजना – 2022-37 ही हरकती / सूचना मागविण्या संदर्भात प्रारुप सुधारीत विकास योजना क्र. मिभावि/प्रासुवियो मिरा-भाईंदर/कलम-26 प्रसिद्धी/2587 दि.27/10/2022, अन्वये दि.28/10/2022 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

शहरची विकास योजना :-

मिरा भाईंदर शहराचे क्षेत्र 79.40 चौ.कि.मी.असुन 19 महसुली गावांचा समावेश आहे.मिरा भाईंदर शहरासाठीची विकास योजना वगळलेला भाग सोडुन दि.14/5/97 अन्वये मंजुर होवून दि.15/07/97 पासुन अंमलात आलेली आहे. तसेच वगळलेल्या भागाची विकास योजना दि.25/08/2000 रोजी मंजूर होवून दि.15/10/2000 पासून अंमलात आलेली आहे. तसेच मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत शासन निर्णय क्र. टिपीएस-1208/1346/प्र.क्र.267/08/नवि-12, दि.29/08/2009 अन्वये फेरबदल मंजूर झाले आहेत. तद्नंतर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 अन्वये एकत्रिकृत विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली लागू करणेस दि.02/12/2020 अन्वये मंजूरी दिलेली आहे.

मिरा भाईंदर शहराची प्रारुप सुधारीत विकास योजना नियुक्त अधिकारी तथा सहाय्यक संचालक नगररचना ठाणे शाखा कार्यालय यांनी कलम-26 अन्वये दि.28/10/2022 रोजी प्रसिद्ध करुन ती कलम 30 अन्वये दि.25/10/2023 रोजी शासनास मंजुरीसाठी सादर केली असुन सदर विकास योजना अद्याप मंजुर झालेली नाही.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामधील मौजे उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी मोरवा या 06 महसूली गावासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून M.M.R.D.A. यांची शासनाने नेमणूक केलेली असून सदर भागासाठी M.M.R.D.A. यांचेमार्फत स्वतंत्र विकास योजना पत्र क्र. IPB-4312/323/CR-23/2013/UD-11 दि. 13/05/2013 अन्वये पत्र क्र. टिपीबी 4316/ प्र.क्र.257/2016/ नवि-11 दि.16/03/2017 तयार केलेली आहे. तसेच सदर गावासाठी पत्र क्र. IPB-4312/323/CR-23/2013/UD-11 दि. 13/05/2013 अन्वये विकास नियंत्रण नियमावली लागू केलेली आहे.

नगर विकास विभागाकडील क्र. टिपीबी-4316/प्र.क्र.257/2016/नवि-11, दि.16/03/2017 रोजीच्या अधिसूचनेप्रमाणे उपरल्लोखित अधिसूचित क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून केलेली MMRDA ची केलेली नियुक्ती रद्द करुन सदर क्षेत्र अधिसूचित क्षेत्रामधून वगळून संबंधित मनपा हद्दीत अंतर्भूत करण्यात आलेले आहे शासनाने दि.13/05/2013 दि.03/06/2016 रोजी मंजूर केलेल्या विकास योजनेची अंमलबजावणी त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये संबंधित मनपाने करावयाची आहे.

सदर 06 गावांची सुधारीत विकास योजना तयार करणे कामी अधिनियमातील कलम 23 अन्वये दि.26/12/2024 उद्देश घोषीत करुन सदर क्षेत्राच्या अस्तित्वातील जमिनवापर नकाशा तयार करण्यात आलेला आहे

भाडेतत्वावरील गृहनिर्माण योजना :-

मिरा भाईंदर शहरासाठी भाडे तत्त्वावरील गृहनिर्माण योजना तरतुदी शासनाने लागु झालेल्या असुन याप्रमाणे M.M.R.D.Aकडुन 13 प्रकरणात Location Clearance प्राप्त असून त्या प्रकरणांना बांधकाम मंजूरी देण्यात आलेली आहेसदर प्रकल्पामधुन 4562 सदनिका हस्तांतरित झालेल्या असून 5177 सदनिका M.M.R.D.A.यांचेकडे हस्तांतरित होणार आहेत.

म्हाडा :-

म्हाडाच्या मालकीच्या क्षेत्रासाठी 2.50 चटई क्षेत्र निर्देशांकानुसार गृहबांधणी योजना तरतुद लागु आहे. यानुसार म्हाडाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली असुन सदर प्रस्तावाचे काम सुरु आहे. या प्रकल्पामधुन म्हाडास 2279 सदनिका प्राप्त झाल्या आहेत

नागरी सुविधा क्षेत्र :-

महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास प्रस्तावांच्या भुखंडामधुन प्राप्त होणा-या सुविधा क्षेत्राच्या एकूण 27 भुखंडापैकी 09 ठिकाणांची कामे पूर्ण झालेले असून 05 कामे प्रगतीपथावर आहेत. 01 जागेवर मा. उच्च न्यायालयाची स्थगिती असून 11 नागरी सुविधा जागा अविकसीत आहेत

परवडणा-यां घरांची योजना (Affordable Housing Scheme) :-

शासन निर्णयाप्रमाणे परवडणा­या घरांची योजना (Affordable Housing Scheme) या योजनेअंतर्गत 4 जागांसाठी रेखांकन मंजुरीसह इरादापत्र (Location Clearance) देण्यात आलेले असून यापैकी 02 प्रस्तावास बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. सदर प्रस्तावांमधून Affordable Housing Unit मधील हस्तांतरीत होणा-या सदनिकांची संख्या 390 इतकी आहे. यापैकी मौजे-महाजनवाडी येथील 203 सदनिका महानगरपालिकेस हस्तांतरीत झाल्या आहेत.

फेरबदल प्रस्ताव :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राच्या विकास योजनेत महाराष्ट्र प्रांतिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37(1) अन्वये प्रस्तावासाठी फेरबदलाची कार्यवाही करणेत येते

सि. आर. झेड :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रासाठी सेस (CESS) या संस्थेने तयार केलेले सी.आर.झेड. च्या वर्गीकरणाचे नकाशे दि.30/06/2005 रोजी महानगरपालिकेस प्राप्त झालेले होते. तद्नंतर केंद्र शासनाच्या कोस्टल रेग्युलेशन झोन अधिनियम 2011 नुसार महानगरपालिका क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करुन कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान (CESS) या संस्थेने तयार करण्यात आले होते. तथापी केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन जलवायु  परिवर्तन मंत्रालयाचे F.No.12/10/2021-IA. III (E-153021) दि.25/08/2023 अन्वये मंजुर केलेल्या CRZ अधिसुचना – 2019 अन्वयेच्या किनारा क्षेत्र व्यवस्थापन आरखडा (CZMP) महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (MCZMA) संकेतस्थळावर (https:\\mczma.gov.in) उपलब्ध आहे.

बांधकाम परवानगी साठीचे प्रस्ताव :-

दि.01/06/12 पासून बांधकाम परवानगीची नविन प्रकरणे Auto-DCR या प्रणाली द्वारे Online कार्यवाही करणेत येत आहे. BPMS प्रणाली सन 2020 पासुन कार्यान्वित झाली आहे. ऑनलाईन पध्दतीने बांधकाम परवानगी / सुधारीत बांधकाम परवानगी प्रस्तावास मंजूरी देण्यात येते, सद्यस्थितीत दि.02/12/2020 रोजीच्या एकत्रिकृत विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नुसार बांधकाम परवानगी देण्याची कार्यवाही सुरु आहे.


विकास हक्क प्रमाणपत्र (TDR) –

मिरा भाईंदर शहराच्या मंजुर विकास योजनेतील आरक्षणाखालील जागा विकास हक्क प्रमाणपत्राद्वारे संपादीत केल्या आहेत.संपादनातील एकुण क्षेत्र 1242269.94 चौ.मी. असुन विकास येाजना रस्त्याखालील क्षेत्र 441681.70  चौ.मी. आरक्षणातील क्षेत्र 800588.24  चौ.मी. आहे.वरीलप्रमाणे मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील मोकळया जागेचे सरासरी शीघ्रशीघ गणक दर रुपये 27,000 प्रति चौ.मी. असून त्यानुसार वरीलप्रमाणे संपादित आरक्षणाखालील / विकास योजना रस्त्याखालील जमिनीचे आजमितीस मुल्यांकन सुमारे हजार कोटी याप्रमाणे आहे. सदरच्या जमिनी मिरा भार्इंदर महानगरपालिकेस विनामुल्य हस्तांतरीत झालेल्या आहेत.

सुधारित विकास योजना –

मिरा भार्इंदर शहरासाठीच्या मंजूर विकास योजनेची मुदत 2017 मध्ये संपुष्टात येत असल्यामुळे सदर विकास योजना सुधारित करणेबाबत मा. महासभेने इरादा जाहिर केलेला आहे. त्याप्रमाणे विद्यमान भूवापर (E.L.U.) दर्शविणारा नकाशा बनविण्याचे काम शासनाच्या निर्देशामाणे मा. सहा. संचालक, नगररचना ठाणे शाखा यांच्यामार्फत सुरु आहे.

नाट्यगृह -

मौजे महाजनवाडी स.क्र.(जुना) 92 पैकी (नविन) 13/1 या जागेमधील नागरी सुविधा क्षेत्रासाठीच्या भुखंडाचे (Amenity Open Space) एकूण 5255 चौ.मी. क्षेत्रामध्ये तळ अ 3 मजले स्वरुपाचे नाट्यगृह प्रस्तावित असून सदरच्या नाट्यगृहाचे बांधकाम क्षेत्र 3674.93 चौ.मी. असून चौथ्या मजल्यावरील कला दालनाचे (Amenity Open Space) क्षेत्र 785.19 चौ.मी. आहे. याप्रमाणे एकूण बांधकाम क्षेत्र 4460.12 चौ.मी. आहे. सदरच्या जागेवर भूमीपुजन दि.30/08/2015 रोजी मा.श्री. उद्धवजी ठाकरे यांचे हस्ते व मा.ना.श्री. विनोदजी तावडे (शिक्षण व सांस्कृतिक मंत्री) यांचे अध्यक्षतेखाली झालेले आहे.आ.क्र. 221 (बगीचा) हे आरक्षण विकसीत करुन मा.श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे.

प्रस्तावित प्रशासकीय इमारत –

मौजे भार्इंदर.क्र. 487/पै.,पै., 478/पै.,पै.,पै. (जुना), 114/1,2, 113/1,2,4  (नविन) या जागेमध्ये जवळपास 1.5 लाख चौ.फुटाची महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत विकासकाकडून विनामुल्य हस्तांतरीत होणार असून सदर इमारतीचे भूमिपुजन राज्याचे मा. मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते मा.ना.श्री. गिरीशजी महाजनजलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.24/10/2015 रोजी पार पडलेले आहे. सदर जागेत सद्य:स्थितीत जागेच्या मालकीचा वाद असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी ठाणे यांच्या निर्देशानुसार सद्य:स्थितीत जागेतील बांधकाम परवानगीस मिरा भार्इंदर महानगरपालिकेने स्थगिती दिलेली आहे

घोडबंदर किल्ला –

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रीतील घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभिकरणाचे काम सुरु करणेसाठी मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे पाठपुरावा करुन शासकीय मालकीची 1000 चौ.मी. जागा हस्तांतरीत करुन घेतलेली असून उर्वरीत जागा हस्तांतरीत होणेसाठी पाठपुरावा सुरु आहे. सदरची जागा हस्तांतरीत होताच किल्याच्या सुशोभिकरणाचे काम करणेत येणार आहे

Scanning -

नगररचना विभागाच्या अभिलेख कक्षातील अभिलेख अद्यावत होणेसाठी व अभिलेखाचे जतन होण्याच्या दृष्टीकोनातून त्याचे Scanning करुन व जनतेला गृहप्रकल्पाची माहिती सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून सदरचे अभिलेख महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशीत करणेची कार्यवाही सुरु केलेली आहे. तसेच बांधकाम परवानगी बरोबर जोत्याचा दाखला, भोगवटा दाखला, भाग नकाशा व झोन दाखला हे देखील Online पध्दतीने देण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही सुरु केलेली आहे.

माहितीचा अधिकार –

केंद्रिय माहिती अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे नगररचना विभागासाठी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून नगररचनाकार व जनहमाहिती अधिकारी म्हणून सहाय्यक नगररचनाकार यांची नेमणूक करणेत आलेली असून या विभागाकडे प्रतिमहिना सरासरी 200 माहिती अधिकारान्वये अर्ज व जवळपास 30 प्रथम अपिल अर्ज दाखल होतात.सदर अपिलाबाबत व माहिती अधिकारान्वयेच्या अर्जाबाबत विहीत मुदतीमध्ये कार्यवाही करणेत येते.

नगरभूमापन

मिरा भार्इदर महानगरपालिका क्षेत्राचे नगरभूमापन खाजगी संस्थेद्वारे करुन घेणेबाबत शासनाने दि.30/01/2007 अन्वये मंजूरी दिलेली असून त्याप्रमाणे विहीत कार्यपध्दतीनुसार निविदा प्रक्रिया पुर्ण करुन तीन (मे. राणे मॅनेजमेंट कन्सलटंट प्रा.लि.भार्इंदरमे. मोनार्च सव्र्हेअर अॅन्ड कन्सलटंट प्रा.लि.पुणे मे. पी.एन.शिदोरे अॅन्ड कंपनीकल्याण) संस्थेची नियुक्ती करुन दि.25/01/2007 रोजी कार्यादेश देण्यात आलेले आहेत.सदर संस्थांनी 14 महसूली गावांचे सव्र्हेक्षणाचे काम पुर्ण करुन त्याबाबतचा अहवाल तालुका निरीक्षक भूमि अभिलेखठाणे यांचे कार्यालयात सादर केलेला असून महानगरपालिका क्षेत्रातील मौजे उत्तनडोंगरीपालीतारोडीचौक या पांच महसूली गावांमधील स्थानिक जनतेच्या विरोधामुळे सव्र्हेक्षणाचे काम झालेले नाही.सर्व्हेक्ष्ण झालेल्या भागासाठी माजमाबंदीआयुक्त आणि संचालकभूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेमार्फत पुढील कार्यवाही सुरु आहे.

जमिनीच्या रुपांतरीत कर दाखल्याबाबत –

महानगरपालिका हद्दीमधील जमिनीची विकास योजना झोन निहाय रुपांतरीत कर दाखला मिळणेबाबत मे. अपर तहसीलदारमिरा भाईंदर यांचेमार्फत दाखला दिला जातो. तद्नंतरच महानगरपालिकेमार्फत बांधकाम परवानगी दिली जाते

प्रस्तावासाठीची कालमर्यादा –

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 प्रमाणे नगररचना विभागामधील खालीलप्रमाणेच्या पाच सेवासाठी त्यासमोर दर्शविल्याप्रमाणे कालमर्यादा निश्चित करणेत आलेली आहे
अ.क्र. लोकसेवांचे वर्णन नियत कालमर्यादा
1 बांधकाम परवानगी / सुधारीत बांधकाम परवानगी 60 दिवस
2 जोत्याचा दाखला 07 दिवस
3 भोगवटा दाखला 21 दिवस
4 झोन दाखला 07 दिवस
5 भाग नकाशा 03 दिवस

अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप :- 

अ.क्र.पदनामनेमून दिलेले क्षेत्रकामाचे स्वरुप
1.

सहाय्यक संचालक नगररचना

मिरा भाईंदर महानगरपालिका संपूर्ण क्षेत्रविकासयोजनाअंमलबजावणी, महाराष्ट्र प्रादेशिकवनगररचनाअधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये विकास योजना फेरबदल, महाराष्ट्र प्रादेक व नगररचना अधिनियमाद्वारे खरेदी सुचना, विकास योजनाआरक्षणाचेभुसंपादन, विकासहक्क प्रमाणपत्राद्वारे, भूसंपादन, विकास योजना अंमलबजावणी करिता अर्थसंकल्प तयार करणे, बांधकाम परवानगी, जोत्याचा दाखला, भोगवटा दाखला, शासकीय पत्रव्यवहार, इ. मान्यतेसाठीमा.सहा.संचालक, नगररचना यांना अहवाल सादर करणे,
2.नगररचनाकार विकास योजना अंमलबजावणी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये विकास योजना फेरबदल, महाराष्ट्र प्रादेक व नगररचना अधिनियमाद्वारे खरेदी सुचना, विकास योजना आरक्षणाचे भुसंपादन, विकासहक्क प्रमाणपत्राद्वारे, भूसंपादन, विकास योजना अंमलबजावणी करिता अर्थसंकल्प तयार करणे, बांधकाम परवानगी, जोत्याचा दाखला, भोगवटा दाखला, शासकीय पत्रव्यवहार, इ. मान्यतेसाठी मा. सहा. संचालक, नगररचना यांना अहवाल सादर करणे, जनमाहिती अधिकारी म्हणून पत्रांना उत्तरे देणे. प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून माहिती अधिकारात प्राप्त अपिलांचा विहित मुदतीत निपटारा करणे.
3.सहायक नगररचनाकार

भाईंदर, गोडदेव, काशी, खारी, तारोडी, राई, मुर्धे, मोर्वा, चौक, 

पेणकरपाडा, महाजनवाडी व चेणे

1.   नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांना त्यांचे सर्व कामकाजात तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करणे.

2.   जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे

3.   शासकीय पत्रव्यवहाराबाबत सविस्तर अहवाल नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेकडे सादर करणे. तसेच मा. न्यायालय, ठाणे येथे महानगरपालिकेचे वतीने लेखी कथन, हमीपत्र दाखल करणेसह साक्षी पुराव्यासाठी हजर रहाणे

4.   पर्यावरणाच्या नाहरकत दाखल्यासाठी प्राप्त होणा-या प्रस्तावाबाबत उचित कार्यवाही करुन अहवाल बैठकीत सादर करणेसह प्राप्त प्रस्तावाची एक प्रत संबंधित सदस्यांना देणे व सभेचे इतिवृत्तांतासहसादर करणे.

5.   मंजूरी व्यतिरिक्तच्या वाढीव बांधकामाबाबत उचित कार्यवाही करणेसह त्याबाबत नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांच्या मंजूरीने संबंधित प्रभाग अधिकारी यांना मार्गदर्शन करणे.

6.   झोन दाखला व भाग नकाशा निर्गमीत करणे. विभागामार्फत सत्यप्रती स्वाक्षांकित करुन देणे.

7.   प्रभाग समिती व मालमत्ता कराच्या शास्ती विषयक बैठकीस हजर रहाणे व नगररचना विभागाशी संबंधित अभिप्राय / माहिती देणे.

8.   विज कनेक्शन, पाणी कनेक्शन व मालमत्ता कराच्या प्रकरणांबाबत अभिप्राय देणे.

9.   विकास योजनेने बाधीत जागेच्या भूसंपादनाबाबत व शासकीय जागा हस्तांतरीत करुन घेणेबाबत प्रस्ताव तयार करुन नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेकडे सादर करणे.

10.  संबंधीत शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचेकडून छाननी होवून प्राप्त सर्व विकास प्रस्ताव जोता प्रमाणपत्र, इमारत पुर्णत्वाचा दाखला व भोगवटा दाखला प्रमाणपत्र तसेच सर्व विकास हक्क प्रमाणपत्राबाबतचे प्रस्तावाबाबत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेमार्फत सादर करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.
4.सहायक नगररचनाकारनवघर, घोडबंदर, मिरा, वरसावे, डोंगरी, उत्तन व पाली

1.   नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांना त्यांचे सर्व कामकाजात तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करणे.

2.   जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे

3.   शासकीय पत्रव्यवहाराबाबत सविस्तर अहवाल नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेकडे सादर करणे. तसेच मा. न्यायालय, ठाणे येथे महानगरपालिकेचे वतीने लेखी कथन, हमीपत्र दाखल करणेसह साक्षी पुराव्यासाठी हजर रहाणे

4.   पर्यावरणाच्या नाहरकत दाखल्यासाठी प्राप्त होणा-या प्रस्तावाबाबत उचित कार्यवाही करुन अहवाल बैठकीत सादर करणेसह प्राप्त प्रस्तावाची एक प्रत संबंधित सदस्यांना देणे व सभेचे इतिवृत्तांतासहसादर करणे.

5.   मंजूरी व्यतिरिक्तच्या वाढीव बांधकामाबाबत उचित कार्यवाही करणेसह त्याबाबत नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांच्या मंजूरीने संबंधित प्रभाग अधिकारी यांना मार्गदर्शन करणे.

6.   झोन दाखला व भाग नकाशा निर्गमीत करणे. विभागामार्फत सत्यप्रती स्वाक्षांकित करुन देणे.

7.   प्रभाग समिती व मालमत्ता कराच्या शास्ती विषयक बैठकीस हजर रहाणे व नगररचना विभागाशी संबंधित अभिप्राय / माहिती देणे.

8.   विज कनेक्शन, पाणी कनेक्शन व मालमत्ता कराच्या प्रकरणांबाबत अभिप्राय देणे.

9.   विकास योजनेने बाधीत जागेच्या भूसंपादनाबाबत व शासकीय जागा हस्तांतरीत करुन घेणेबाबत प्रस्ताव तयार करुन नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेकडे सादर करणे.

10.  संबंधीत शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांचेकडून छाननी होवून प्राप्त सर्व विकास प्रस्ताव जोता प्रमाणपत्र, इमारत पुर्णत्वाचा दाखला व भोगवटा दाखला प्रमाणपत्र तसेच सर्व विकास हक्क प्रमाणपत्राबाबतचे प्रस्तावाबाबत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह नगररचनाकार व सहाय्यक संचालक, नगररचना यांचेमार्फत सादर करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.
5शाखा अभियंतानवघर, मिरा, व वरसावे

1.  प्रस्तावित बांधकाम नकाशे, सुधारीत बांधकाम नकाशेसह प्रस्तावाची विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवालासह जागा पाहणी करुन प्रकरण सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

2.  इमारत पूर्णत्वाःचा दाखला, भोगवटा दाखलासाठी स्थळ पाहणी करुन तसेच मंजूर आदेशातील अटींची पूर्तता करुन अहवाल सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

3.  मंजुर रेखांकनामधील अनाधिकृत बांधकामाबाबत आवश्यकता असेल तिथे अतिक्रमण विभागास मदत करणे.

4.  वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेले कामकाज पार पाडणे.

5.  वास्तु विशारद, विकासक यांना काळया यादीत टाकणेबाबत सहाय्यक नगरचनाकार यांच्येकडे अहवाल सादर करणे.

6.  मा. न्यायालयीन प्रकरणी नगररचनाकार व सहाय्यक नगररचनाकार यांना आवश्यक ते सहकार्य करणे.

7.  विकास हक्क प्रमाणपत्रा साठीच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे.

8.  केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार प्राप्त अर्जाबाबत सहायक जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती देणे.
6शाखा अभियंताभाईंदर, डोंगरी, उत्तन व पाली

1.  प्रस्तावित बांधकाम नकाशे, सुधारीत बांधकाम नकाशेसह प्रस्तावाची विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवालासह जागा पाहणी करुन प्रकरण सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

2.  इमारत पूर्णत्वाःचा दाखला, भोगवटा दाखलासाठी स्थळ पाहणी करुन तसेच मंजूर आदेशातील अटींची पूर्तता करुन अहवाल सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

3.  मंजुर रेखांकनामधील अनाधिकृत बांधकामाबाबत आवश्यकता असेल तिथे अतिक्रमण विभागास मदत करणे.

4.  वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेले कामकाज पार पाडणे.

5.  वास्तु विशारद, विकासक यांना काळया यादीत टाकणेबाबत सहाय्यक नगरचनाकार यांच्येकडे अहवाल सादर करणे.

6.  मा. न्यायालयीन प्रकरणी नगररचनाकार व सहाय्यक नगररचनाकार यांना आवश्यक ते सहकार्य करणे.

7.  विकास हक्क प्रमाणपत्रा साठीच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे.

8.  केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार प्राप्त अर्जाबाबत सहायक जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती देणे.
7कनिष्ठ अभियंताघोडबंदर, पेणकरपाडा, महाजनवाडी व चेणे

1.  प्रस्तावित बांधकाम नकाशे, सुधारीत बांधकाम नकाशेसह प्रस्तावाची विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवालासह जागा पाहणी करुन प्रकरण सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

2.  इमारत पूर्णत्वाःचा दाखला, भोगवटा दाखलासाठी स्थळ पाहणी करुन तसेच मंजूर आदेशातील अटींची पूर्तता करुन अहवाल सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

3.  मंजुर रेखांकनामधील अनाधिकृत बांधकामाबाबत आवश्यकता असेल तिथे अतिक्रमण विभागास मदत करणे.

4.  वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेले कामकाज पार पाडणे.

5.  वास्तु विशारद, विकासक यांना काळया यादीत टाकणेबाबत सहाय्यक नगरचनाकार यांच्येकडे अहवाल सादर करणे.

6.  मा. न्यायालयीन प्रकरणी नगररचनाकार व सहाय्यक नगररचनाकार यांना आवश्यक ते सहकार्य करणे.

7.  विकास हक्क प्रमाणपत्रा साठीच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे.

8.  केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार प्राप्त अर्जाबाबत सहायक जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती देणे.
8शाखा अभियंतागोडदेव, काशी, खारी,तारोडी, राई, मुर्धा, मोर्वा व चौक

1.  प्रस्तावित बांधकाम नकाशे, सुधारीत बांधकाम नकाशेसह प्रस्तावाची विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवालासह जागा पाहणी करुन प्रकरण सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

2.  इमारत पूर्णत्वाःचा दाखला, भोगवटा दाखलासाठी स्थळ पाहणी करुन तसेच मंजूर आदेशातील अटींची पूर्तता करुन अहवाल सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

3.  मंजुर रेखांकनामधील अनाधिकृत बांधकामाबाबत आवश्यकता असेल तिथे अतिक्रमण विभागास मदत करणे.

4.  वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेले कामकाज पार पाडणे.

5.  वास्तु विशारद, विकासक यांना काळया यादीत टाकणेबाबत सहाय्यक नगरचनाकार यांच्येकडे अहवाल सादर करणे.

6.  मा. न्यायालयीन प्रकरणी नगररचनाकार व सहाय्यक नगररचनाकार यांना आवश्यक ते सहकार्य करणे.

7.  विकास हक्क प्रमाणपत्रा साठीच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे.

8.  केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार प्राप्त अर्जाबाबत सहायक जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती देणे.
9 शाखा अभियंता 

1.  प्रस्तावित बांधकाम नकाशे, सुधारीत बांधकाम नकाशेसह प्रस्तावाची विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवालासह जागा पाहणी करुन प्रकरण सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

2.  इमारत पूर्णत्वाःचा दाखला, भोगवटा दाखलासाठी स्थळ पाहणी करुन तसेच मंजूर आदेशातील अटींची पूर्तता करुन अहवाल सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

3.  मंजुर रेखांकनामधील अनाधिकृत बांधकामाबाबत आवश्यकता असेल तिथे अतिक्रमण विभागास मदत करणे.

4.  वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेले कामकाज पार पाडणे.

5.  वास्तु विशारद, विकासक यांना काळया यादीत टाकणेबाबत सहाय्यक नगरचनाकार यांच्येकडे अहवाल सादर करणे.

6.  मा. न्यायालयीन प्रकरणी नगररचनाकार व सहाय्यक नगररचनाकार यांना आवश्यक ते सहकार्य करणे.

7.  विकास हक्क प्रमाणपत्रा साठीच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे.

8.  केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार प्राप्त अर्जाबाबत सहायक जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती देणे.
10मुख्य सर्व्हेअर

गोडदेव, भार्इंदर, खारी, घोडबंदर, डोंगरी, चेणे, वरसावे, मोरवा

1.  प्राप्त नवीन बांधकाम प्रस्ताव व जोत्याचा दाखला व विकास हक्क प्रमाणपत्रासाठी विषयांकित जागेची पाहणी करुन विकास योजनेप्रमाणेच्या अहवालासह जागेची सद्यस्थिती नमुद करुन स्वयंस्पष्ट अहवालासह प्रकरण संबंधित कनिष्ठ अभियंत्यांकडे वर्ग करणे.

2.  झोन दाखले, दुरुस्ती परवानगी व ईतर नाहरकत दाखले देणेबाबत पाहणी व मोजणी करुन    स्वयंस्पष्ट शिफारसीसह सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे.

3.  विकास योजनेशी संलग्न कामकाज सहाय्यक नगररचनाकार यांचे मार्गदर्शनाखाली करणे.

4.  वेळोवेळी वरिष्ठांनी नेमून दिलेले कामकाज पाहणे.

5.  विकास योजना रस्ते, आरक्षणे यांच्या विद्यमानस्थितीप्रमाणेच्या आखण्या अंतिम करुन मंजूरीसाठी सहा. नगररचनाकार यांचे मार्फत सादर करणे.

6.  भुसंपादनासाठीच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही करणे.

7. शासकीय जागा हस्तांतरणाबाबत प्रस्ताव तयार करुन सादर करणे व पाठपुरावा करणे.
11मुख्य सर्व्हेअर

नवघर, काशी, मिरा, पेणकरपाडा, महाजनवाडी, राई, मुर्धे, 

तारोडी, उत्तन, पाली, चौक

अ.क्र. 1 ते 7 प्रमाणे

8. मोबाईल मनो-यासाठी परवानगी, मुदतवाढ देणेसाठीचा प्रस्ताव सहाय्यक नगररचनाकार यांचेकडे सादर करणे व याबाबतची माहिती अद्यावत करुन ठेवणे.
12अनुरेखकइलेक्ट्रीक कनेक्शनसाठी, दुरुस्ती परवानगीसाठी, इतर नाहरकत दाखल्यासाठी पाहणी करुन अहवाल सादर करणे

1. भाग नकाशे तयार करणे.

2. नकाशाच्या सत्यप्रती तयार करणे.

3. नकाशांच्या झेरॉक्स प्रती काढुन आणणे.

4. नकाशा एनलार्ज करणे.

5. रंगकाम, ट्रेसिंग करणे.

6. नागरीकांच्या व माहितीच्या अधिकारा अन्वयेच्या मुदतीत उत्तरे देणे (आवश्यक असेल तेथे संबंधित कनिष्ठ अभियंता यांची मदत घेवुन)

7. शासकीय जागा हस्तांतरण व भुसंपादन प्रस्तावाबाबत पत्रव्यवहार.
13लिपीकअभिलेख कक्ष

1.  अभिलेख कक्ष सांभाळणे,

2.  नमुना 45 नोंदी घेवून नस्ती सांभाळणे,

3.  विकास आकार नोंदी लेखा विभागाकडून घेवून मासिक अहवाल तयार करणे

4.  लोकसेवा हक्क आदेश मासिक अहवाल पाठविणे

5.  वरिष्ठांनी वेळोवेळी नेमूनदिलेले कामकाज करणे.
14लिपीकमोकळया कर आकारणी विभाग संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीना मोकळया जागा कर आकारणीची वसूल करणे.

1. मोकळया जागा कर आकारणी देयक बनावणे.

2. मोकळया जागा कर आकारणी वसूल करणे.
 ठोक मानधनमोकळया कर आकारणी विभाग संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीना मोकळया जागा कर आकारणीची वसूल करणे.

1. मोकळया जागा कर आकारणी देयक बनावणे.

2. मोकळया जागा कर आकारणी वसूल करणे.
15लिपीकआवक-जावक सांभाळणे

1. आवक जावक नोंदी घेणे, ऑनलाईन प्रस्ताव स्विकारणे, झोन दाखला, वेदरशेड, कम्पाऊंड वॉल, जमिन मोजणी, विद्युत जोडणी, परवानग्या व नामंजूर फाईल नोंदी घेवून नस्ती सुस्थितीत ठेवणे

2. लोक सेवा हक्क अध्यादेश 2015 नुसार मासिक अहवाल तयार करणे

3. शासन पत्रव्यवहार नोंदी घेऊन संचिकेत दाखल करणे.

4. आवक जावक पत्राचा मासिक गोषवारा तयार करणे

5. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे
16लिपीकआवक-जावक सांभाळणे

1. आवक जावक नोंद, नोंदी घेवून रजिस्टर अद्यावत करणे.

2. शासन पत्रव्यवहार नोंदी घेऊन संचिकेत दाखल करणे.

3. सांख्यिकी मासिक माहिती तयार करणे, नमुना 45 नोंदी पुर्ण करुन घेणेस मदत करणे.

4. शासनास सादर केलेल्या फेरबदलाच्या प्रस्तावाचे अभिलेख अद्यावत ठेवणे.

5. आवक जावक पत्राचा मासिक गोषवारा तयार करणे

6. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.

7. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 नुसारच्या कार्यवाहीचे अभिलेख तयार करुन अद्यावत ठेवणे.
17लिपीकमाहिती अधिकार

1. माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्राच्या नोंदी घेवून त्याच दिवशी जन माहिती अधिकारी यांचेकडे देणे, प्राप्त पत्राबाबत माहिती अधिका-यांकडून तयार पत्राची नोंद घेऊन विहिती मुदतीत माहिती पुरविणे.

2. पत्र पोष्टाद्वारे पोंच करणे, अपिल अर्जावर नोंदी घेवून सुनावणी लावणे

3. पारित निर्णय पोंच करणे, माहिती देणे, मासिक गोषवारा तयार करुन सामान्य प्रशासन विभागात पाठविणे

4. माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त होणा­या संचिकेमधुन अर्जदारास आवश्यक लागणा­या कागदपत्रांच्या छायाप्रती उपलब्ध करुन देणे.

5. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.
18वरिष्ठ लिपिकमाहिती अधिकार

1. माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्राच्या नोंदी घेवून त्याच दिवशी जन माहिती अधिकारी यांचेकडे देणे, प्राप्त पत्राबाबत माहिती अधिका-यांकडून तयार पत्राची नोंद घेऊन विहिती मुदतीत माहिती पुरविणे.

2. पत्र पोष्टाद्वारे पोंच करणे, अपिल अर्जावर नोंदी घेवून सुनावणी लावणे

3. पारित निर्णय पोंच करणे, माहिती देणे, मासिक गोषवारा तयार करुन सामान्य प्रशासन विभागात पाठविणे

4. माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त होणा­या संचिकेमधुन अर्जदारास आवश्यक लागणा­या कागदपत्रांच्या छायाप्रती उपलब्ध करुन देणे.

5. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामकाज करणे.

विकास आकार वसूली :-

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर विकास योजनेतील विकास प्रस्तावांना दिलेल्या मंजूरीप्रमाणे जमा झालेला सन 2016-17 पासून तुलनात्मक वर्षनिहाय विकास आकाराचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

सन

तरतुद (कोटी)

वसुली (कोटी)

2016-17

143

60.13

2017-18

104

28.27

2018-19

50

108.87

2019-20

50

81.81

2020-21

40

40.93

2021-22

125

336.34

2022-23

250

303.69      [203.41 (मनपा) + 100.28 (शासन)]

2023-24

250

233.70         [128.88 (मनपा) + 104.82 (शासन)]

2024-25

150

346.25       [159.33 (मनपा) + 186.92 (शासन)]

2025-26

150

265.27        [119.35 (मनपा) + 145.91 (शासन)]               दि.31 जानेवारी 2026 पर्यंत

सदरचा विकास आकार शासनाकडील दि.01/03/2011 रोजीच्या निर्णयाप्रमाणे वसूल करणेत येत आहे.सन 2016-17 साली इमारत प्रस्तावासंबंधी दिलेल्या परवानग्यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

सन

प्राथमिक परवानगी

बांधकाम परवानगी

सुधारीत बांधकाम परवानगी

जोत्याचा दाखला

भोगवटा दाखला

एकुण

2016-17

----

11

51

27

48

137

2017-18

2

13

35

34

57

141

2018-19

1

48

97

44

81

271

2019-20

1

35

68

28

47

179

2020-21

1

30

23

32

42

128

2021-22

----

43

87

15

41

186

2022-23

----

61

96

13

68

238

2023-24

----

37

43

03

55

138

2024-25

----

18

73

03

61

155

2025-26

----

09

54

08

43

114

मंजूर विकास योजना अंमलबजावणी तपशील :- 

मिरा शहराची विकास योजना (वगळलेला भाग सोडून) दि.14/05/1997 रोजी मंजूर झालेली असून दि.15/07/1997 पासून अंमलात आलेले आहे. वगळलेल्या भागाची विकास योजना दि.25/08/2000 रोजी मंजूर झालेली असून दि.15/10/2000 पासून अंमलात आलेली आहे. मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत शासन निर्णय क्र. टिपीएस-1208/1346/प्र.क्र.267/08/नवि-12, दि.29/08/2009 अन्वये फेरबदल मंजूर झाले आहेत. तद्नंतर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अन्वये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू करणेस दि.02/12/2020 अन्वये मंजूरी दिलेली आहे.

मौजे-उत्तन,डोंगरी,चौक,पाली,तारोडी या 5 महसुली गावांसाठी शासनाने दि.01/12/2007 रोजीच्या आदेशान्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची (MMRDA) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नियुक्ती केलेली आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेचे क्षेत्र 79.40 चौ.कि.मी. असुन 19 महसुली गावांचा समावेश आहे.

विकास योजनेतील एकुण आरक्षणाची संख्या

386

विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्त गावांतील आरक्षणाची संख्या

52

महानगरपालिका क्षेत्रातील उर्वरित आरक्षणांची संख्या

334

मौजे-उत्तन,डोंगरी,चौक,पाली,तारोडी व मोरवा या  महसुली गावांसाठी एमएमआरडीएने तयार केलेल्या विकास योजने नुसार आरक्षणे

39

एकूण आरक्षणे

373

विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्त 5 गावांतील आरक्षणे वगळून एकूण आरक्षणे

331

सि.आर.झेडने बाधीत आरक्षणाची संख्या

123

विकसीत; भागश: विकसित व प्रगतीपथावर (56अ25अ15)

96

मिरा भार्इंदर महानगरपालिकेकडे विकासकाने विकास हक्क प्रमाणपत्राव्दारे भागश:  हस्तांतरीत केलेली आरक्षणे

98

शासकीय जागेवरील आरक्षणांची संख्या

14

विभागाकडून करण्यात येणारे कामे :-

नवीन / सुधारित/ पुर्न:विकास बांधकाम प्रस्ताव छाननी

2)  भोगवटा दाखला छाननी

3)  विकास योजनेतील आरक्षणातील जागा विकास हक्क प्रमाणपत्र देऊन ताब्यात घेणे.

4)  विकास योजनेतील आरक्षणाखाली जागा, भुसंपादन करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.

5)  महानगरपालिका विभागातील जागेचा झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, जमीन मोजणी साठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, विकास योजनेबाबत अभिप्राय देणे.

6)  जागेवर कुंपणभिंत लावणेसाठी परवानगी देणे.

7)  निवासी इमारतीवर पावसाळा कालावधीसाठी वेदरशेड परवानगी देणे.

8)  शासकीय जागा मागणी प्रस्ताव तयार करणे.

9)  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 नुसार करावयाची इतर विविध कामे.

10) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार करावयाची विविध कामे.

11) महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत प्रभाग अधिकारी यांना बांधकामाची माहिती / तपशिल देणे व मार्गदर्शन करणे.

12) न्यायालयीन प्रकरणात विधी विभागास माहिती पुरविणे व आवश्यक असलेल्या न्यायालयीन प्रकरणात पाठपुरावा करणे.

13) मा. स्थायी समिती, मा. महासभा, इत्यादी विषय निहाय गोषवारा तयार करणे व त्या अनुषंगाने पुढील कामे करणे.

14) माहिती अधिकार, अपिलीय अधिकारातील कामे.

15) महानगरपालिकेतील इतर विभागातील आलेल्या संदर्भावर अभिप्राय देणे.

16) मा. आयुक्त सो., यांनी निर्देशित केलेले इतर कामे

प्राथमिक परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे :-

1) मंजूर विकास नियंत्रण नियमावली बाब क्र. 5 नुसार परिशिष्ठ सहा मधील विहीत तक्त्यातील अर्ज.

2) 7/12 उतारा मुळप्रत चालू महिन्याचे व फेरफार

3) प्रस्तावाखालील जागेचा गटस्केच व मोजणी नकाशा/सि.टी.एस. नकाशा मुळप्रत.

4) फिजीकल सव्र्हे प्लान.

5) प्रॉपर्टी कार्डचा उतारा

6) अधिकार पत्र / भाडे पत्र / खरेदी पत्र (नोंदणीकृत)

7) प्रस्तावाखालील जागा शासकीय/स्थानिक संस्था व इतर संस्थाने लिजवर दिलेली असल्यास संस्थाचे नाहरकत प्रमाणपत्र

8) प्रस्तावाखालील जागेत विद्यमान इमारत असल्यास इमारतीचा तपशील दर्शविणारे विस्तृत बांधकाम नकाशे.

9) यु.एल.सी. विभागाकडील आदेशाची प्रत/नागरी जमिन कमाल धारणा अन्वयेची कार्यवाही झालेली नसलेबाबतचे रु.300/- च्या स्टँम्प पेपरवरिल शपथपत्र.

10)   पाणीपुरवठा संदर्भीत हमीपत्र

11)   वास्तुविशारद व विकासक यांचे संयुक्त हमीपत्र

12)   जमिन ताबा पावती

13)   रस्ता रुंदीकरणातून बाधीत होणारे क्षेत्र हस्तांतर करण्याचा करारनामा

14)   Declaration of Structural Engineer (स्टँम्प पेपरवरिल)

15)   वास्तुविशारद नियुक्ती पत्र.

16)   दी इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि. यांचेकडील नाहरकत दाखला

17)   अग्निशमन विभागाकडील तात्पूरता नाहरकत दाखला

18)   पर्यवेक्षक अभियंता यांचे नियुक्ती पत्र.

19)   विषयांकित जागेबाबत कराची बाकी नसलेबाबतचे कर विभागाकडील प्रमाणपत्र

बांधकाम परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे :- 

1) मंजूर विकास नियंत्रण नियमावली बाब क्र. 5 नुसार परिशिष्ठ सहा मधील विहीत तक्त्यातील अर्ज.

2) प्राथमिक नकाशे मंजूरी व परवानगीची सत्यप्रत.

3) मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडील अकृषिक परवानगी किंवा जमिनीच्या विनिश्चितीबाबतच्या आदेशाची सत्यप्रत

4) अग्निशमन विभागाकडील तात्पूरता नाहरकत दाखला.

सुधारीत बांधकाम परवानगी परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे :-

1)  वास्तुविशारद यांचा विहीत नमुन्यातील अर्ज.

2)  बांधकाम नकाशे मंजूरी व परवानगीची सत्यप्रत.

3)  गाव नमुना मुळ प्रत (परिशिष्ठ 2)

4)  मोकळ्या जागेच्या कराचा भरणा केल्याची पावती

जोत्याच्या दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे :- 

1) Appendix XII, Reg 6(4) नुसार विहीत नमुन्यात अर्ज.

2) इमारत जोत्याचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे पूर्ण झाल्याबाबतचा दाखला.

3) जोत्याचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्यतेबाबतचा दाखला.

4) बांधकाम नकाशे मंजूरी व परवानगीची सत्यप्रत.

5) मोकळ्या जागेच्या कराचा भरणा केल्याची पावती.

भोगवटा दाखला मिळणेकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

1)  मंजूर विकास नियंत्रण नियमावली AppendixXVIII Appendix XIX, Reg 6(8) नुसार विहीत नमुन्यात अर्ज.

2)  वास्तुविशारद यांचा भोगवटा दाखला मिळणेकरिता अर्ज.

3)  नागरी जमीन कमाल धारणा कायद्याच्या कलम 20 अंतर्गत असल्यास नागरी संकुलन ठाणे यांचेकडील नाहरकत दाखला

4)  मे. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडील अकृषीक मंजूरीचे आदेशाची सत्यप्रत.

5)  मिरा भार्इंदर महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या जोत्याचा दाखल्याची

6)  मंजूर नकाशे व बांधकाम प्रारंभपत्राची सत्यप्रत.

7)  वास्तुविशारदाकडील इमारत महानगरपालिकेने मंजूर केलेल्या बांधकाम नकाशाप्रमाणे पूर्ण झाल्याचा दाखला.

8)  स्ट्रक्चरल इंजिनिअरकडील इमारतीचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य झालेबाबतचा दाखला. (रु.100/- च्या स्टँम्प पेपरवर)

9)  इमारतीचे प्लंबींगचे काम पूर्ण झाल्याचा दाखला.

10) अग्निशमन विभागाकडील अंतिम नाहरकत दाखला.

11) उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडील नाहरकत दाखला.

12) सोलार वॉटर सिस्टीम कार्यान्वीत केल्याबाबतचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील प्रमाणपत्र.

13) रेन वॉटर हार्वेस्टींग कार्यान्वीत केल्याबाबतचा पाणीपुरवठा विभागाकडील प्रमाणपत्र.

14) मोकळ्या जागेच्या कराचा भरणा केल्याची पावती. (सुरु असलेल्या आर्थिक वर्षाची)

15) पर्यवेक्षक अभियंत्याचे बांधकाम योग्य झालेबाबतचे प्रमाणपत्र. (रु.100/- च्या स्टँम्प पेपरवर)

16) जागेच्या मालकीहक्क व मा. न्यायालयात वाद नसल्याबाबत विकासकाचे हमीपत्र. (रु.100/- च्या स्टँम्प पेपरवर)

17) जागेत गटार/Storm water/सांडपाणी यांची व्यवस्था केल्याबाबत विकासकाचे हमीपत्र (रु.100/- च्या स्टँम्प पेपरवर)

18) जागेत अद्यावत 7/12 उतारे व फेरफार.

19) जागा विकास योजना रस्त्याने/आरक्षणाने/नागरी सुविधा क्षेत्राने बाधीत होत असल्यास सदर जागा नोंदणीकृत करारनाम्याद्वारे महानगरपालिकेस हस्तांतरीत करुन त्यांची नोंद महसूल अभिलेखी 7/12 उता-यावर आणून त्याप्रमाणेचे अद्यावत 7/12 उतारे.

विकास हक्क प्रमाणपत्र प्राप्त करणेसाठी लागणारी कागदपत्रे :-

1)   Appendix XIV, Reg 6(7) नुसार विहीत नमुन्यात अर्ज.

2)   गटबुक, मोजणी नकाशा, तालुका निरीक्षक भूमि अभिलेख, ठाणे यांचेकडील नकाशा (मुळ प्रत)

3)   7/12 उतारा व फेरफार (मुळ प्रत)

(अ) जमीनमालकाचे नावाचा

(ब) महानगरपालिकेचे नावाचा

4)   कुलमुखत्यारपत्र (नोंदणीकृत)

5)   यु.एल.सी. च्या आदेशाची प्रत

6)   टायटल रिपोर्ट

7)   सर्च रिपोर्ट

8)   करारनामा (नोंदणीकृत)

9)   ताबा पावती

10)  प्रतिज्ञापत्र

11)  Indemenity Bond

12)  शपथपत्र

13)  Appendix – IV of D.C. Requirement

14) Compliance Report of the Owner

15)  दी इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि.

16)  वास्तुविशारद नियुक्ती पत्र

17)  कॉऊसिल ऑफ आर्किटेक्टकडील प्रमाणपत्र.

18)  सर्व्हे नकाशा

प्राप्त प्रकरणांवर कार्यवाहीचा तपशील :-

मिरा भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास प्रस्तावास परवानगी देतांना प्रस्तावाची खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत येते.

1) महानगरपालिका क्षेत्रातील विकास प्रस्ताव / पूर्नःबांधणी बांधकाम प्रस्ताव.

2) महानगरपालिका क्षेत्रातील विकास योजनेतील आरक्षणातील जागा विकास हक्क प्रमाणपत्र घेवून ताब्यात घेणे.

मुख्य सर्व्हेअर/सर्व्हेअर

|
शाखा  अभियंता/कनिष्ठ अभियंता

|
सहाय्यक नगररचनाकार

|
नगररचनाकार

|
सहा. संचालक नगररचना

|

मा. आयुक्त

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मोबाईल टॉवर्स बाबत :-

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्र.मातंसं065प्र.क्र.7/2022 से4/39 दि.04/11/2022 अन्वये राज्यातील दुरसंचार धोरण निश्चित केले

असुनसदर धोरण्याच्या अनुषंगाने शासन नगर विकास विभाग यांनी क्र.संकीर्ण-2021/प्र.क्र.242/.वि.20 दि.19/12/2022 अन्वये मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या असून त्याअनुषंगाने महानगरपालिकेमार्फत मोबाईल टॉवर बाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.

शासन निर्णय :-

>> महानगर पालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकासाठी विशेष तरतूद बाबत   
>> एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) मंजूर नियमावली मधील विनियम क्र. १४.७.१ संदर्भात स्पष्टीकरण देणे बाबत

परिपत्रके:-

>>  महाराष्ट्र राज्यासाठी युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल आणि प्रमोशन रेग्युलेशन्स (UNIFIED DEVELOPMENT CONTROL AND PROMOTION REGULATIONS FOR MAHARASHTRA STATE.)

विभागीय इतर माहिती / निविदा / परवानगी /सूचना :-

>> विकास योजना - मिरा भाईंदर महाराष्ट्रप्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 37(1) अन्वयेप्रस्तावित फेरबदला बाबतची सुचना_633
>> विकास योजना - मिरा भाईंदर महाराष्ट्रप्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 37(1) अन्वयेप्रस्तावित फेरबदला बाबतची सुचना_636

>> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगर व मोरवा या गावांच्या हद्दीतील "विशेष नियोजन प्राधिकरण" म्हणून MMRDA ची नियुक्ती रद्द करून संबंधित महानगरपालिकेची (MBMC) "नियोजनप्राधिकरण" म्हणून नियुक्ती करण्याबाबत जाहीर सूचना_4093

>> महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 26(1) अन्वयेमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामधील माजे-उत्तन, पाली,चौक, तारोदी, डोंगरी व मोरा या 06 गावांची विकास योजना प्रसिद्धीकरण करण्याबाबत_2061

>>  प्रारुप सुधारीत विकास योजना नकाशे - कलम 28 (4)नुसार
>>  इंग्रजी फेरबदल सुची
>>  परवानगीबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्दी करणेबाबत.(सन 2021-22 व सन 2022-23 (दि.22.04.2022 रोजीपर्यत)
>>  विकास हक्क प्रमाणपत्र क्र.1 ते 649
>>  परवानगीबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्दी करणेबाबत.
>>  परवानगी तपशील – 01 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022
>>  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल १
>>  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल १
>>  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल १
>>  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल २
>>  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल २
>>  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल २
>>  मिरा भाईंदर महानगरपालिका सुधारीत विकास योजना महाराष्ट्रप्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 28(4)अन्वयेमिरा भाईंदर शहराच्या प्रारुप सुधारित विकास योजना प्रसिद्धीबाबत. आरेखकीय व तत्समशुध्दीपत्रक (Corrigendum) काढणेबाबत.

मान्यता प्राप्त बांधकाम :-

>> मिरा भाईंदर  महानगरपालिका क्षेत्रातील मौजे नवघर येथील स.क्र(जुना)272 (नवीन) 84 हि .क्र 3 पै,4 या जागेस दिलेल्या बांधकाम परवानगी बाबत खुलासा_409 

>>  सन (२०२१-२२) १ एप्रिल २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ बांधकाम परवानगीचा तपशील
>>  दि.01 एप्रिल 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत – मंजूर परवानगी यादी (1)
>>  सन 2021-22 – बांधकाम परवानगी तपशील
>>  मिरा भाईंदर शहराच्या मंजूर विकास योजनामध्ये फेरबदल करणेबाबत
>>  नगररचना विभागाची माहिती वेबसाईटवर प्रसिध्द करणेबाबत. 2021
>>  Z(1)-Permission (Final-2021)
>>  Z(2)-D.R.C.(Final-2021) – हस्तांतरणीय विकासहक्काद्वारे संपादन केलेल्या आरक्षणाची माहिती
>>  नागरी सुविधा केंद्र – विभागाची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणेबाबत
>>  महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम 37 अन्वये सादर फेरबदल प्रस्ताव (Land) – जानेवारी 2021 पर्यंत
>>  Z (2)-D.R.C.(Final) हस्तांतरण विकासहक्काद्वा
>>  Z (1)-प्राथमिक परवानगी (Final) – जानेवारी 2021 पर्यंत रे संपादन केलेल्या आरक्षणाची माहिती – जानेवारी 2021 पर्यंत
>>  Z (3)-D.R.C. Reservation – 2021 पर्यंत ताब्यात आलेली आरक्षणाची आ यादी
>>  बांधकाम परवानगीचा तपशील – 1 जानेवारी 2021 ते 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत
>>  सन 2003-04 ते सन 2020-21 (31 जानेवारी, 2021) पर्यंत परवानगींची माहिती
>>  MBMC Town Planning – D.R C. (Final) Till January 2021
>>  MBMC Town Planning – 2003 TO Dec 2020
>>  MBMC-T.P. – 2003 TO Sept. 2020 – DRC
>>  MBMC-T.P. – 2003 TO Sept. 2020 – Santion
>>  MBMC-T.P. – 2003 TO MAY 2019
>>  MBMC-T.P. – 2003 TO DECEMBER 2019
>>  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण आरक्षणे
>>  मिरा भाईंदर शहर च्या मंजुर विकास योजनेमध्ये फेरबदल करणेबाबत

थकबाकीदार विकासकांची यादी :-

  मोकळ्या जागेवरील कराची थकबाकी यादी 

  यादी ०१

  यादी ०६

  यादी ०२

  यादी ०७

  यादी ०३

  यादी ०८

  यादी ०४

  यादी ०९

  यादी ०५

  यादी १०


* बांधकाम प्रारंभ पत्र व सुधारित बांधकाम परवाना सन २३-२४ * भोगवटा दाखला व भाग भोगवटा दाखला सन २३-२४ * RTI
>> बांधकाम प्रारंभ पत्र व सुधारित बांधकाम परवाना सन २३-२४
>> भोगवटा दाखला व भाग भोगवटा दाखला सन २३-२४

ऑनलाईन बांधकाम परवानगी तपशील :- 
>> ऑनलाईन बांधकाम परवानगी तपशिल सन 2025-26  
>> ऑनलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2025-26 
>> ऑनलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2025-26 (3)
>> ऑनलाईन परवानगी तपशील - 2025-26
>> ऑनलाईन बांधकाम परवानगी तपशिल -सन 2025-26 (1) 
>> ऑनलाईन- बांधकाम परवानगी तपशील-2025-26 
>> ऑनलाईन- बांधकाम परवानगी तपशील-2024-25 ( )
>> बांधकाम ऑनलाईन परवानगी तपशील-2024-25
>> बांधकाम ऑनलाईन परवानगी तपशील- 2023-24
>> बांधकाम ऑनलाईन परवानगी तपशील - 2022-23
 

ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशील :- 
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल सन 2026-27 

>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2025-26 
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2025-26 (3)
>> ऑफलाईन परवानगी तपशील - 2025-26
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2025-26 (1)
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशील - सन 2025-26
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशील - सन 2024-25 (1)
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशील - सन 2024-25  
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशील - सन 2023-24
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2022-23
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2021-22
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2020-21
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2019-20
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2018-19
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2017-18
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2016-17
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2015-16
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2014-15
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2013-14
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2012-13
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2011-12
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2010-11
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2009-10
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2008-09
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2007-08
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2006-07
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2005-06
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2004-05
>> ऑफलाईन बांधकाम परवानगी तपशिल - सन 2003-04

विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल (DRC) :- 

>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल - क्रमांक  - 1 ते 100
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल - क्रमांक  - 101 ते 200
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल - क्रमांक  - 201 ते 300
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल - क्रमांक  - 301 ते 400
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल - क्रमांक  - 401 ते 500
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल - क्रमांक  - 501 ते 600
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल - क्रमांक  - 601 ते 690
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल - क्रमांक  - 601 ते 691
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल - क्रमांक - 692 ते क्र.694
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल - क्रमांक 695
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल क्र.696 ते 699
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल क्र.700 ते 702
>> विकास हक्क प्रमाणपत्र तपशिल क्र.703 ते 704 

अनधिकृत रचना नियमितकरण :-

>> अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांची यादी .
>> जाहीर प्रकटन
>> finale GR compounded structure
माहिती अधिकार अधिनियम :-

>> मा.महासभा प्रकरण क्र 08 ठराव क्र .11 दि.06.05.26
>> 31 जानेवारी 2021 पर्यंत ताब्यात आलेल्या आरक्षणाची माहिती.
>> महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वयेच्या फेरबदलाची माहिती.
>> प्राथमिक परवानगी
>> बांधकाम परवानगी
>> भोगवटा दाखला
>> बांधकाम ऑनलाईन परवानगी तपशील-2024-25
>> बांधकाम ऑनलाईन परवानगी तपशील- 2023-24
>> बांधकाम ऑनलाईन परवानगी तपशील - 2022-23
>> परवानगी तपशील - 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2024
>> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील निश्चित केलेल्या बेंचमार्क पॉईंटनुसार ऑनलाईन प्रसिध्द करणेबाबत
>> शुद्धी पत्रक - जाहिर सुचना प्रसिद्धी करणेबाबत.
>> विकास हक्क प्रमाणपत्र संकेतस्थळावर अद्यावत करणेबाबत. (कृपया प्रसिध्दीसाठी)
>> Nagar rachana Vibhag - 2022-23 (Uni) - Mangal - संकेतस्थळ प्रसिध्दी - मराठी
>> सन 2022-23 - माहे एप्रिल 2022 ते माहे मार्च 2023 - परवानगी तपशील
>> विकास हक्क प्रमाणपत्र क्र.664 ते क्र.667
>> प्रमाणपत्रे प्रसिध्द करणेबाबत.
>> 1 एप्रिल 2023 ते 30 जुन 2023
 

* प्रारूप सुधारित विकास योजना * (सहा गाव - मोर्वा,उत्तन ,पाली,चौक,तारोडी,डोंगरी ) :- 

COMPREHENSIVE MAPDP REPORTGRID 1GRID 2GRID 3GRID 4GRID 5GRID 6GRID 7GRID 8
GRID 9GRID 10GRID 11GRID 12GRID 13GRID 14GRID 15GRID 16GRID 17GRID 18
GRID 19GRID 20GRID 21GRID 22GRID 23GRID 24GRID 25GRID 26GRID 27GRID 28
GRID 29GRID 30GRID 31






परिशिष्ट – अ कलम 28(4) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारणा अनुसूची बाबत 

* प्रारुप सुधारीत विकास योजना नकाशे – 28(4) नुसार *

GRID NO.01GRID NO.02GRID NO.03GRID NO.04GRID NO.05GRID NO.06GRID NO.07GRID NO.08GRID NO.09GRID NO.10
GRID NO.11GRID NO.12GRID NO.13GRID NO.14GRID NO.15GRID NO.16GRID NO.17GRID NO.18GRID NO.19GRID NO.20
GRID NO.21GRID NO.22GRID NO.23GRID NO.24GRID NO.25GRID NO.26GRID NO.27GRID NO.28GRID NO.29GRID NO.30
GRID NO.31GRID NO.32GRID NO.33GRID NO.34GRID NO.35GRID NO.36GRID NO.37GRID NO.38GRID NO.39GRID NO.40
GRID NO.41GRID NO.42GRID NO.43GRID NO.44GRID NO.45GRID NO.46GRID NO.47GRID NO.48GRID NO.49GRID NO.50
GRID NO.51GRID NO.52GRID NO.53GRID NO.54GRID NO.55GRID NO.56GRID NO.57GRID NO.58GRID NO.59GRID NO.60
GRID NO.61GRID NO.62GRID NO.63GRID NO.64GRID NO.65GRID NO.66GRID NO.67




महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 31(1) अन्वये भागशः मंजूर विकास योजना नकाशे व वगळलेल्या भागाचे विकास योजना नकाशे बाबत

SM NO.01


SM NO.02

SM NO.03

SM NO.04

SM NO.05

SM NO.06

SM NO.07

SM NO.08

SM NO.09

SM NO.10

SM NO.11


SM NO.12

SM NO.13

SM NO.14

SM NO.15

SM NO.16

SM NO.17

SM NO.18

SM NO.19

SM NO.20

SM NO.21


SM NO.22

SM NO.23

SM NO.24

SM NO.25

SM NO.26

SM NO.27

SM NO.28

SM NO.29

SM NO.30

SM NO.31


SM NO.32

SM NO.33

SM NO.34

SM NO.35

SM NO.36

SM NO.37

SM NO.38

SM NO.39

SM NO.40

SM NO.41


SM NO.42

SM NO.43

SM NO.44

SM NO.45

SM NO.46

SM NO.47

SM NO.48

SM NO.49

SM NO.50

SM NO.51


SM NO.52

SM NO.53

SM NO.54

SM NO.55

SM NO.56

SM NO.57

SM NO.58

SM NO.59

SM NO.60

SM NO.61


SM NO.62

SM NO.63

SM NO.64

SM NO.65

SM NO.66

SM NO.67

 

 

 

 

EP NO.01


EP NO.02

EP NO.03

EP NO.04

EP NO.05

EP NO.06

EP NO.07

EP NO.08

EP NO.09

EP NO.10

EP NO.11


EP NO.12

EP NO.13

EP NO.14

EP NO.15

EP NO.16

EP NO.17

EP NO.18

EP NO.19

EP NO.20

EP NO.21


EP NO.22

EP NO.23

EP NO.24

EP NO.25

EP NO.26

EP NO.27

EP NO.28

EP NO.29

EP NO.30

EP NO.31


EP NO.32

EP NO.33

EP NO.34

EP NO.35

EP NO.36

EP NO.37

EP NO.38

EP NO.39

EP NO.40

EP NO.41


EP NO.42

EP NO.43

EP NO.44

EP NO.45

EP NO.46

EP NO.47

EP NO.48

EP NO.49

EP NO.50

EP NO.51


EP NO.52

EP NO.53

EP NO.54

EP NO.55

EP NO.56

EP NO.57

EP NO.58

EP NO.59

EP NO.60

EP NO.61


EP NO.62

EP NO.63

EP NO.64

EP NO.65

EP NO.66

EP NO.67