मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामास आळा घालण्याच्या दृष्टीने खाली नमूद केल्याप्रमाणे कार्यपद्धती व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकूण सहा प्रभाग समिती स्थापन करण्यात आलेले आहेत. या सहा प्रभागांचा समिती कार्यालयाचा कार्यभार सहा सहा.आयुक्त यांच्याकडे आहे. प्रत्येक प्रभागात प्रभाग
स्तरावर अनधिकृत बांधकाम /अतिक्रमण नियंत्रण /निर्मुलन पथक स्थापन करण्यात आलेले आहे. प्रत्येक सहा.आयुक्त यांचे अधिनस्त कनिष्ठ अभियंता व मजूर वर्ग असे पथक तयार करण्यात आलेले आहे.
प्रभागा अंतर्गत होणाऱ्या अतिक्रमण व पुर्णत: अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी संबधित सहा.आयुक्त यांची आहे.
मा. प्रधान सचिव , नगरविकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. ठामपा/2008/प्र.क्र.05/2008/नवि-23/दि .28/02/2008 अन्वये मा.आयुक्त यांचेकडील कार्यालयीन आदेश क्र.
मनपा/आयुक्त /05/2008-09 दि . 01/04/2008 अन्वये बीट निरीक्षक म्हणुन कर विभागाच्या 38 लिपिकांची नेमणुक करण्यात आलेली आहे. कर विभागाकडील बीट निरीक्षक सुरू असलेल्या अनधिकृत
बांधकाम / अतिक्रमणाबाबतीत लेखी अहवाल सहा.आयुक्त यांना देवून त्याची एक प्रत मुख्य कार्याकायास सादर करतात.
सर्व सहा. आयुक्त यांना अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवणेकरीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६०(१)(क) २६१, २६४, २६७, ४७८ तसेच महाराष्ट्र महानगरपिलिका अधिनियम
१९४९ चे कलम २६० (१), ४७८, २६७ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३, ५४ व ५५ नुसार
पदनिर्देशित अधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. सहा.आयुक्त यांनी अनधिकृत बांधकामाची उपलब्ध असलेल्या अभिलेखाची तपासणी केल्यानंतर ते समाधानकारक न आढळल्यास
नियमानुसार संबधितांना महाराष्टू महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम २६० अन्वये नोटीस बजावुन नियमानुसार पुढील कार्यवाही सहा.आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेमार्फत करण्यात येते.
|