वृक्ष प्राधिकरण विभाग :-
- महानगरपालिकेच्या संपुर्ण
क्षेत्रात वृक्षारोपण करुन मिरा-भाईंदर “हरित शहर” करण्याचे काम करण्यात
येते. नविन विकसीत केलेले रस्ते, मैदाने, उद्याने, व इतर महापालिकेच्या जागेमध्ये वृक्ष लागवड करुन
त्यांची निगा व देखभाल करण्यात येते.
- मिरा भाईंदर महानगरपालिका
प्रतीवर्षी “५ जुन ’जागतीक पर्यावरण दिन” व १६ जुन “वटवृक्ष दिन” साजरा केला
जातो. भारताच्या एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त
असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अमृतवने विकसीत केलेली आहेत. मियावॉकी
पध्दतीने भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. त्याकरीता
पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक
आहे. त्यासाठी वृक्षदिंडी, वृक्षारोपण इ. उपक्रम
राबविण्यात येत असतात. प्रदुषणामुळे होणाऱ्या अनेक समस्यांवर एकमेव उपाय
म्हणजे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हा आहे. त्यादृष्टीने उद्यान व वृक्ष
प्राधिकरण विभागामार्फत वृक्ष लागवड केली जाते.
- सन 2021 मध्ये पावसाळ्याच्या
कालावधीमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय प्रजातीच्या 3000 रोपांची लागवड करण्यात
येणार आहे.
- प्रदुषणमुक्त शहर
ठेवण्याच्या दृष्टीकोनातून तसेच पर्यावरणात वाढ होऊन शहर प्रदुषणमुक्त
होणेसाठी वृक्षतोडीवर कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र (नागरी
क्षेत्र) झाडांचे संरक्षण जतन अधिनियम १९७५ चे प्रकरण ८ कलम २१ (१) अन्वये
वृक्ष तोड करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे विभागाकडून दाखल करण्यात येतात.
- खाजगी जागेतील
धोकादायक/विकासकामातील झाडे काढणेकामी या विभागामार्फत पाहणी करुन परवानगी
देण्यात येते.
- मिरा-भाईंदर महानगरपालिका
क्षेत्रात फुले, फळे, औषधी वनस्पती यांचे भव्य
प्रदर्शन भरविण्यात येते.
- वृक्ष प्राधिकरण समितीवर
तज्ञ व्यक्तींची सदस्य म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेचे
लोक जैव विविधता रजिस्टर (PBR) तयार करण्यात आलेले आहे
|
|