मिरा भाईंदर महानगरपालिकेची एकुण 94 वाहने आहेत. सदर वाहने अग्निशमन, सामान्य, आरोग्य, वैदयकिय आरोग्य, उदयान व वृक्षप्राधिकरण
विभागात कार, टेम्पो, ट्रॅक्टर, मोबाईल जीप, महिंद्रा मॅक्सिमो, रुग्णवाहिका, शववाहिनी तसेच अग्निशमन सेवेत
रेक्यु व्हॅन, वॉटर टेंडर, टॅकर इ. वाहने सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, वैदयकिय आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, उदयान व वृक्षप्राधिकरण विभाग, पाणी पुरवठा विभागात कार्यरत
आहेत. सदर वाहनाची आवश्यकतेनुसार
दरपत्रके प्रसिध्दी देऊन दुरुस्ती केली जाते.
महापालिकेकडे असलेली वाहने पदाधिकारी व
अधिकारी यांच्या तुलनेत अपुरी असल्याने वाहन विभागामार्फत वाहने वाहनचालकास
इंधनासह (संपुर्ण
सेवा) भाडयाने घेणे कामी वार्षिक
निविदा मंजुर करून ठेका वाहने पुरवठा करण्यात येतात. तसेच महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेत अग्निशमन विभाग, वैदयकिय आरोग्य विभाग, उदयान व वृक्षप्राधिकरण
विभागात तीन पाळीमध्ये वाहने कार्यरत असल्याने महापालिकेकडे असलेले कायम वाहन
चालकांची संख्या अपुरी असल्याने मनपाच्या विविध विभागातील वाहनांवर ठेका पध्दतीने
वाहनचालक पुरवठा करणे वार्षिक निविदा प्रसिध्द करून निविदेतील मंजुर दरानुसार
किमान वेतनानुसार ठेका वाहनचालक पुरवठा करण्यात येतो. मिरा भाईंदर महापालिकेचे जे
पदाधिकारी व अधिकारी मनपाच्या कार्यालयीन कामकाजाकरिता महापालिकेच्या वाहनाऐवजी
स्वत:चे वाहन वापरतात अशा
पदाधिकारी व अधिकाऱ्यांना मा. स्थायी समितीच्या ठरावाच्या अनुषंगाने पदाधिकारी / अधिकारी / वैदयकिय अधिकारी / कनिष्ठ अभियंता यांना वाहन
प्रतिपुर्ती भत्ता अदा केला जातो. |