|
प्रस्तावना |
कोणत्याही देशात संरक्षणाची चौथी फळी “अग्निशमन सेवा” असे मानण्यात येते. इतर तीन म्हणजे संरक्षण दलाची तीन दले आहेत. अग्निशमन सेवेचे महत्व फक्त युध्दाच्या वेळेसच नव्हे तर नेहमीच्या शांततेच्या वेळी सुध्दा सिध्द झालेले आहे आणि ते नागरी वस्तीचे दिवसेंदिवस वाढत असलेले क्षेत्र, औद्योगीक विकास आणि लोकसंख्येच्या प्रमाणात कायम वाढत असते. अग्निशमन सेवेचे कर्तव्य, फक्त आगीपासुन जीवन आणि मालमत्ता वाचविणे आणि त्यापासूनचा दुष्परिणाम कमीत कमी करणे एवढेच नसुन बंद गटारे, विहीरी, उद्वाहन यंत्रे किंवा इतर यंत्रसामुग्री यात अडकून पडलेल्या नागरिकांसह इतर प्राणी मात्र यांची सुटका करणे हेही आहे. थोडक्यात, अडचणींच्या किंवा आपतकालीन प्रसंगात अग्निशमन सेवा, कर्मचा-यांचे धैर्य आणि खास सामुग्री हाताळण्याचे खास प्रशिक्षण हे लोकांना सहाय्य करण्याकरिता उपयोगी पडते. अग्निशमन सेवेचे कार्य सामान्यपणे, आगीपासून संरक्षण करणे, आगीचा प्रतिबंध करणे व सेवेचा परिणामकारकरित्या वापर करुन जिवीत व वित्त हानी टाळणे हे असल्याने सर्व पातळीवर स्थिर, प्रबल, परिणामकारक आणि आदर्श संघटन असणे गरजेचे आहे. अग्निशमन सेवेचे कामकाज ही महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 या नियमपुस्तिकेच्या आधारे केले जाते. |
![]() |
![]() |
![]() |
अग्निशमनाबाबत जनजागृती कार्यक्रम |
अग्निशमन विभागामार्फत मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात जनजागृती करणेकरीता अग्निशमन प्रात्यक्षिके दाखविण्यात येतात. तसेच मिरा भाईंदर मनपा क्षेत्रातील शाळा, कॉलेज, रहिवाशी इमारती औदयोगिक इमारती येथे अग्निशमनबाबत माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात येतात. आगप्रतिबंधक व जिवसंरक्षणाच्या दृष्टीकोनातुन नागरींकांमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृतीकरीता रहिवासी ,औद्योगीक क्षेत्रात , शाळा, कॉलेज, इस्पितळे येथे अनेक प्रकारचे अग्निशमन विषयक प्रात्यक्षिक Demonstration / Mock drill दाखविण्यात आले आहे. अग्निशमन सुरक्षिततेकरीता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हॉस्पिटलमधील कर्मचारी यांना अग्निशमन साहित्य हाताळण्याचे प्रशिक्षण तसेच आपातकालीन परिस्थीतीत कश्या रितीने Evacuation करावे याबाबत माहिती देण्यात आली आहे. |
अग्निशमन स्थानकाचे नाव व पत्ता | |||||||||||||||||||||||||||
|
अग्निशमन स्थानकाचे नाव व पत्ता | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अग्निशमन दलात उपलब्ध एकूण वाहने | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अग्निशमन दलात उपलब्ध एकूण वाहने | ||||||||||||||||||||||||||||||
|
विभागाची कर्तव्य / कामकाज | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
सार्वजनीक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल | ||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अंदाजपत्रक महानगरपालिका निधीचा तपशील म्हणजेच मागील वर्षामध्ये पुढील बाबीद्वारे मिळालेले उत्पन्न (जमा बाजु) लाखात |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
मिरा भाईदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील नियतवाटप केलेली वार्षिक अर्थसंकल्पीय तरतुद (खर्च बाजु) लाखात | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अ.क्र. |
अधिकाऱ्याचे नाव |
पदनाम |
अधिकार |
1 |
डॉ. सचिन बांगर उप-आयुक्त (अग्निशमन) |
अपिलीय अधिकारी |
अर्जदारास माहीती अधीकारा अंतर्गत प्राप्त झालेल्या माहीतीचे समाधान न झाल्यास अपील केलेल्या प्रकरणावर योग्य तो निर्णय देणे. |
2 |
डॉ. प्रकाश बोराडे प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी |
जन माहिती अधिकारी | माहीती अधीकार अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जदारास आवश्यक असलेली माहीती उपलब्ध करून देणे. |
3 |
अल्पेश जगन्नाथ संखे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी |
सहाय्यक माहिती अधिकारी | माहीती अधीकार अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जदारास आवश्यक असलेली माहीती उपलब्ध करून देणे व अहवाल तयार करणे. |