Skip to main content
logo
logo

आपत्ती व्यवस्थापन विभाग

विभागाचे नांव
आपत्ती व्यवस्थापन विभाग
उप–आयुक्तांचे नांव
-
विभागप्रमुख आणि पद
नरेंद्र चव्हाण , सहा आयुक्त
ई-मेल
controller.encroachment@mbmc.gov.in
आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा २०२४

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा २०२३

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा २०२०-२१ 

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा २०२०

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा २०१९-१

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा २०१९-२

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा २०१८

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा २०१७

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा २०१६












प्रस्तावना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २९०० मिली मिटर आहे. महानगरपालिका हद्दीत साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवडयातच पर्जन्यवृष्टीस सुरूवात होते व माहे सप्टेंबर पर्यंत सुरू राहतो.

संभाव्य आपत्ती व व्यवस्थापन

1)  अतिवृष्टी व पूर परिस्थिती

2)  पाणी तुंबणे

3)  धोकादायक इमारती

4)  झाडे कोसळणे

5)  विज पडणे व विजेचा धक्का लागणे

6)  रोगराई

7)  त्सुनामी

8)  भूकंप

9)  दरड कोसळणे

10)  ईमारत कोसळणे

11)  साथरोग

12)  अन्न विषबाधा

13)  आगीपासून संरक्षणासाठी

14)  आग

15)  बॉम्बस्फोट

16)  भूकंप

17)  दरड कोसळणे

18)  पूर

19)  गर्दीचे ठिकाण

20)  वीज पडणे

21)  वायूगळती

22)  रसायनांची गळती

23)  रस्ते अपघात






विभागाचे काम

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये खालीलप्रमाणे कामकाज केले जाते :

1) शहरात येणाऱ्या नैसर्गिक वा मानव निर्मित आपत्तीच्या वेळेस नागरीकांना सोई –  सुविधा पुरविणे.

2) अशा आपत्ती वा आपात्कालीन परीस्थितीमध्ये नागरीकांना सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे.

3) शहरामध्ये आपत्ती वा आपात्कालीन परीस्थितीमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करणे.

4) आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करून त्या अनुषंगाने कार्यवाही करणे.

5) मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.

6) आपत्ती बाबत नागरीकांच्या तक्रारी स्विकारून संबंधित विभागाकडून सदर बाबत कार्यवाही करणे.

7) मा.आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे कर्मचारी यांच्या कृती व कामकाजांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.

8) शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे.

9) अधिकारी तथा कर्मचारी यांचेकरीता प्रशिक्षणांचे आयोजन करणे.

10) बाधितांकरीता मदत, निवारा, खान-पान अथवा पुनर्वसनाची सोय करणे


जॉब चार्ट -2022-23

अधिकारी/कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये :-

अनु.क्र
पदनाम
कायदेशीर.तरतूद
जबाबदारी व कर्तव्ये
1)

उप-आयुक्त

(आपत्ती व्यवस्थापन)
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005

1.शहर आपत्ती धोके न्यूनीकरण कार्यक्रम अंतर्गत कामकाजावर नियंत्रण करणे.

2.महापालिका कार्यक्षेत्रातील होणाऱ्या घटनांच्या अनुसरुन मदत कार्याचे नियोजन करणे.

3.आपत्तीच्या वेळी आवश्यक साहित्य/ यंत्रसामग्री खरेदी करणेकरीता अर्थसंकल्पामध्ये आवश्यक निधी/ तरतूद करणे.

4.आपत्ती व्यवस्थापन विभाग व सुरक्षा विभागाचे कार्यालयिन कामकाजावज नियंत्रण ठेवणे.

5.नियंत्रण कक्ष सुसज्ज व अद्यावत ठेवणे.

6.आपत्तीच्या परिस्थितीत संबंधित विभागांशी समन्वय साधणे व त्यानुसार आदेश देऊन कार्यवाहीची पुर्तता करणे.

7.मा.जिल्हाधिकारी कार्यालय/ राज्य शासन यांचेकडून प्राप्त माहिती/ आदेश सर्व विभागांना कळवून दक्षतेचा इशारा देणे

8.माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अपिलिय अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
2)

आपत्ती व्यवस्थापन प्रमुख


1.आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 ची अंमलबजावणी करणे

2.शहर आपत्ती धोके न्यूनीकरण कार्यक्रम अंतर्गत कामकाज व अंमलबजावणी करणे.

3.आपत्ती बाबतची माहिती व अहवाल वरीष्ठांना कळविणे.

4.नियंत्रण कक्ष सुसज्ज व अद्यावत ठेवणे.

5.आपत्तीचे वेळेस अधिकारी/ कर्मचारी मदत कार्य पथके व उपलब्ध साधन सामुग्री यांचा समन्वय साधणे.

6.इतर सरकारी तसेच निमसरकारी संस्थाचा समन्वये साधणे/ मदत घेणे माहिती घेणे.

7.आपत्ती व्यवस्थापनकरीता आवश्यक कामांचे व सामुग्री खरेदी करणे निविदा व त्याबाबतची कार्यवाहीकरीता प्रस्ताव तयार करणे.

8.नियंत्रण कक्ष 24X7 असे वर्षाचे 365 दिवस सुस्थितीत व अद्यावत ठेवणे.

9.आपत्ती बाबतची माहिती व अहवाल मा. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्वरीत कळविणे.

10.आपत्ती व्यवस्थापन कक्षातील प्रशासकीय व तांत्रिक कामकाजा संबंधित नस्ती तपासून  प्रस्तावित करणे.

11.माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
3)

नियंत्रण कर्मचारी :- महानगरपालिकेने वेळोवेळी नेमणूक केलेले कर्मचारी

(3 पाळ्यांमध्ये)

1.आपत्तीच्या वेळेस नियंत्रण कक्षातून इतर विभागातील अधिकारी यांचेशी समन्वय साधणे.

2.पावसाळा कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील पावसाची नोंद घेणे.

3.नियंत्रण कक्षातील नागरीकांच्या तक्रारी दुरध्वनीवरून स्विकारणे व त्यांची नोंद घेणे व संबंधित विभागांना त्याबाबत कळविणे.

4.आपल्या जागी दुसरा कर्मचारी हजर झाल्याशिवाय आपत्ती नियंत्रण कक्ष न सोडणे.
इतर माहिती / दरपत्रक / सूचना / निविदा  :-


कोविद-१९ रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, मार्गदर्शक सूचना व आदेश