जनगणना 2021 साठी सिमा बदल आणि महसूली गावाची यादी, महसूल परिमंडळ निहाय विविरणपत्र अ ते इ विहित नमुन्यात
मुद्दा क्र.1 ते 14 सिमा बदल बाबत जोडपत्र 1 नुसार नमुद प्रशासकिय सिमा बदल बाबत कोणतेही बदल झालेले
ज्ञात नसल्याने दि.01/01/2020 ते दि.30/06/2021 या कालवधीतध्ये कोणताही बदल झालेला नसून संबंधित माहिती
निरंक आहे. तसेच वाढीव सिमामधील बदल मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक 2017 करिता नव्याने वॉर्ड रचना झाल्याचे ज्ञात आहे. माननिय
महारजिस्टार तथा जनगणना आयुक्त, भारत सरकार, नवी दिल्ली यांना संकलित करुन पाठविणे.
जनगणना अधिनियम 1948 व सुधारणा जनगणना नियम 1990 कायदेशिर तरतुदीच्या अधीन राहून भारतामध्ये दर 10 वर्षांनी एकदा जनगणना करण्यात येते. भारतीय जनगणनेच्या
इतिहारसातध्ये 2021 ची जनगणना ही जगातील सर्वांत
मोठी प्रशासकीय आणि सांख्यिाकीय स्तरावरचा अभ्यास असून, 1872 नंतरच्या अखंड शृंखलेतील सलग 16 वी व स्वातंत्रा नंतरची 8 वी जनगणना आहे. जनगणना ही भारतीय राज्य घटनेच्या सातव्या
परिशिष्टातील अनुक्रमांक 69 नुसार कलम 246 च्या अंतर्गत येते, जनगणनेसाठी जनगणना कायदा 1948 कायदेशीर आधार प्रदान करतो. भारतीय जनगणना ही 1872 पासून लोकसंख्याशास्त्र (लोकसंख्या वैशिष्टये) विषयी माहिती, आर्थिक प्रक्रिया, साक्षरता आणि शिक्षण, गृहनिर्माण आणि घराच्या सुविधा, शहरीकरण, प्रजनन क्षमता आणि मृत्यू, अनुसूचीन जाती आणि अनुसूचित जमाती, भाषा, धर्म, स्थलांतर, दिव्यांग आणि सामाजिक –
सांस्कृतिक माहिती याबाबत एक विश्वसनीय स्त्रोत आहे.
भारताच्या जनगणनेच्या
इतिहासामध्ये ही पहिलीच जनगणना अशी आहे ज्यामध्ये मोबाईल ॲप तसेच पत्रकांवर माहिती भरणे अशा दोन पध्दतीव्दारे घेण्यात येणार आहे. घरयादी व घरगणना करण्यासाठी सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकाव्दारे मोबाईल ॲप स्वीकारले जावे याकरिता अत्यंत सोपे, सोईस्कर व अनुकूल असे बनविलेले
आहे. हे ॲप अँड्रोइड 4.0 आणि त्यावरिल वर्जन आधारित
मोबाईलवर काम करते. मोबाईल ॲप वापरामुळे प्रत्येकवेळी प्रगणकास क्षेत्रीय कार्य करतेवेळी जड पुस्तके सोबत घेउुन फिरण्याची आवश्यकता नाही. यामुळे प्रगणकांना आपल्या कार्याक्षेत्रामध्ये सुविधाजनक फिरता येईल. ॲपमध्ये गणना घरासंबंधी आधीच भरलेला तपशील पुन्हा
प्राप्त करुन घेण्याची आणि संपादित करण्याची सुविधा आहे. मोबाईल ॲप वापरामुळे गोषवाराप्रत, सारांशप्रत आणि इतर संबंधित कामांच्या प्रती तयार करण्याचे
ओझे कमी होते.
मोबाईल ॲपच्या वापरामुळे संपुर्ण माहिती कोणत्याही अतिरिक्त लॉजिस्टीक किंवा आयसीआर प्रक्रिये शिवाय
संस्कारणासाठी उपलब्ध होईल, तसेच मोबाईल ॲपव्दारे डेटा संकलीत केल्याने आयसीआर प्रक्रियेवरील कार्याचा भार कमी करणे व पूर्ण सेन्सस डेटा संस्कारणासाठी लागणारा वेळ कमी करणे यासाठी मदत होईल व जनगणनेची माहिती अगदी वेळेवर प्रसिध्द करण्यास सोपे जाईल. |