1. नॅशनल म्युनिसिपल अकाऊट मॅन्युअल मध्ये विहित केलेल्या नमुना Form GEN-30 मध्ये स्थावर मालमत्ता रजिस्टर (REGISTER OF IMMOVABLE PROPERTY) From GEN-31 मध्ये अस्थायी मालमत्ता रजिस्टर (REGISTER OF MOVABLE PROPERTY) आणि Form GEN-32 मध्ये भुमी नोंदवही (REGISTER OF LAND) मध्ये मालमत्तांच्या अद्यायावत नोंदी ठेवणे. 2. मालमत्तांचा विनियोग करताना महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 79 (ड) नुसार जागेचे अधिमुल्य, भाडे किंवा अन्य मोबदला चालु बाजार किंमती नुसार (Ready Reckoner) दराप्रमाणे नगररचना विभागाकडुन भाडे निश्चित करून घेणेकरीता प्रस्ताव सादर करणे. 3. महापालिका मालमत्तांची नगररचना विभागामार्फत अधिमुल्य (Valuation) करुन घेणेबाबत प्रस्ताव सादर करणे. 4. महापालिका मालमत्तांचा विमा उतरविणे बाबत प्रस्ताव सादर करणे. 5. सिडको, एम.आय.डी.सी. कडुन हस्तांतरीत होणारे भुखंड करारनाम्यातील अटी-शर्ती प्रमाणे संरक्षित करणे त्यासाठी अभियांत्रीकी विभागामार्फत संरक्षण भिंत घालणे, नामफलक लावणे बाबतची कार्यवाही करणेकरीता प्रस्ताव सादर करणे. 6. महापालिका मालमत्तांसंदर्भात वेळोवेळी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय प्रस्तावित करणे. 7. कर्मचा-यांकडे आलेले टपाल पत्र जलद गतीने निपटारा होणेसाठी नियंत्रण ठेवणे तसेच अधिनिस्त कर्मचा-यांच्या कार्यविविरण नोंदीवहीवरून आठवडा,पंधरवडा, मासिक गोषवारा काढुन वरिष्ठांकडे सादर करणे. 8. कार्यालयीन कामकाजात प्रशासकीय गतीमानता आणणे व विभागाकडील कामे सुरळीत पार पाडणेसाठी प्रयत्न करणे. 9. विभागाचे अभिलेख 6 गठ्ठा पध्दतीप्रमाणे ठेवणेबाबतची कार्यवाही करणे, अधिनस्त कर्मचा-यांची दफतर तपासणी करणे. 10. विभागाकडील संपुर्ण विषयासंबंधी प्रशासनीक दुवा म्हणुन आणि इस्टेट मॅनेजर यांचे मार्गदर्शनाखालील जलद गतीने प्रकरणांचा निपटारा करणे. 11. वरिष्ठांच्या आदेशानुसार कामकाज सांभाळणे, कार्यवाही करणे. 12. मालमत्ता हस्तांतरण बाबत कार्यवाही व पाठपुरावा करणे. 13. जमिन भुईभाडे संदर्भात कार्यवाही करणे. 14. मालमत्तेसंबंधी न्यायलयीन प्रकरण हाताळणे व त्याबाबतची कार्यवाही प्रस्तावित करणे. 15. मालकी हक्क संबंधी अन्य विभागाकडुन आलेल्या प्रकरणांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तांत्रिक अहवालासह माहिती सादर करणे. 16. वरिष्ठांनी वेळोवेळी सोपलेली कामे. 17. आवक जावक नोंद वहया ठेवणे. 18. रचना व कार्यपध्दतीमधील नमुना क्र.03 (मध्यवर्ती नोंदणी शाखेतील आवक नोंदवही), नमुना क्र.07 (संचिका नोंद वही), नमुना क्र. 09 (अभिलेख कक्षाकडे पाठविलेल्या संचिकांची नोंदवही), नमुना क्र.11 (नियतकालीन विविरणपत्र-ब (PR-B) यांचे विवरण पत्र ठेवणे. 19. सर्व सभा, बैठका, तारांकित व अतारांकित प्रश्न, महासभा प्रश्नोत्तरे, मा. आयुक्तांकडील बैठका यांची उत्तरे देणे. 20. इतिवृत्त तयार करणे व जतन करणे. 21. रचना व कार्यपध्दतीप्रमाणे 6 गठ्ठे पध्दतीनुसार दप्तर अद्यावत ठेवणे. 22. ई-मेलद्वारे येणा-या तक्रारी (ई-ग्रिवेन्सेस) तपासणे व उत्तरे देणे. इत्यादी 23. स्विय सहाय्यकाशी संबंधीत सर्व कामे व वरिष्ठांनी वेळोवेळी सोपवलेली कामे. 24. मालमत्ता विभागाकडील आस्थापना/ प्रशासकीय कामकाज पार पाडणे. 25. कायम तसलमत विषयक कामकाज पाहणे. 26. गोपनीय अहवाल संकलित करून वरिष्ठांना सादर करणे. 27. विभागास लागणा-या आवश्यक वस्तुंची मागणी भांडार विभागाकडुन करणे. 28. डेडस्टॉक रजिस्टर अद्यावत ठेवणे. 29. अभिलेख संबंधित कामकाज पाहणे. 30. आयकर व मत्ता दायीत्व संबंधित कामकाज पाहणे. 31. रचना व कार्यपध्दतीमधील नमुना क्र.05 (कार्यविवरण नोंद वही) 06 (स्थायी आदेश संचिका), 07 (संचिका नोंदवही) व 08 (प्रलंबित प्रकरणाची नोंदवही) ची विवरण पत्रे ठेवणे. 32. सामाजिक सुविधा संबंधित सर्व स्थायी व अस्थायी मालमत्ता बाबतीची कामे उदा. समाज मंदिरे, बहूउद्देशीय इमारती, व्यायामशाळा, निवासस्थाने इत्यादी यामध्ये स्थायी व अस्थायी मालमत्तांचा संपादन, विनियोग थकबाकी वसूली व अनुषंगीक कार्यवाही या सर्व बाबींचा समावेश असेल. 33. समाज मंदिरे, बहूउद्देशीय इमारती, व्यायामशाळा, शालेय इमारती विनियोग महानगरपालिका निवासस्थाने नियंत्रण, भाडेकरार, वसुली, जाहिरात व त्याचे करारनामे करणेसंबंधीचे कामकाज पाहणे. 34. सामाजिक सुविधा संबंधित सर्व स्थायी व अस्थायी मालमत्ता बाबतीची कामे उदा. समाज मंदिरे, बहूउद्देशीय इमारती, व्यायामशाळा, निवासस्थाने इत्यादी यामध्ये स्थायी व अस्थायी मालमत्तांचा संपादन, विनियोग थकबाकी वसूली व अनुषंगीक कार्यवाही या सर्व बाबींचा समावेश असेल. 35. निवास्थान इमारतीची देखभाल देयके प्रस्तुत करणे. 36. नॅशनल म्युनिसीपल अकाऊंट कोडप्रमाणे, स्थायी मालमत्ता (Immovable) रजिस्टर अद्यावत ठेवणे. 37. रचना व कार्यपध्दतीमधील नमुना क्र.05 (कार्यविवरण नोंदवही) 06 (स्थायी आदेश संचिका), 07 (संचिका नोंदवही) व 08 (प्रलंबित प्रकरणाची नोंदवही) ची विवरण पत्रे ठेवणे. 38. व्यवसायीक प्रयोजन संबंधीत सर्व स्थायी व अस्थायी मालमत्ता बाबतीची कामे उदा. दुकान-गाळे, मार्केट गाळे, कार्यालये, ओटले-पिचेस, तलाव इत्यादी यामध्ये स्थायी व अस्थायी मालमत्ताचा संपादन विनियोग थकबाकी वसूली व अनुषंगीक कार्यवाही या सर्व बाबींचा समावेश असेल. 39. महापालिका इमारतीची देखभाल देयके प्रस्तुत करणे. 40. नॅशनल म्युनिसीपल अकाऊंट कोड प्रमाणे, स्थायी मालमत्ता (Immovable) रजिस्टर अद्यावत ठेवणे. 41. रचना व कार्यपध्दतीमधील नमुना क्र.05 (कार्यविवरण नोंद वही) 06 (स्थायी आदेश संचिका), 07 (संचिका नोंदवही) व 08 (प्रलंबित प्रकरणाची नोंदवही) ची विवरण पत्रे ठेवणे. 42. मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे निहित झालेल्या सर्व मालमत्तांच्या नोंदी ठेवणे. शासन, केंद्र शासन, सिडको व एम.आय.डी.सी. यांचेकडे भूखंड/जागा हस्तांतरण करणेबाबत पाठपुरावा करणे आणि सदर बाबतीत आवश्यकतेप्रमाणे वरिष्ठांना माहिती सादर करणे. 43. सिडको व एम.आय.डी.सी. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, जिल्हापरिषद ठाणे व शासन यांचेकडील आलेल्या विविध मिळकतीचे दस्ताऐवज उपलब्ध ठेवणे, आवश्यकतेप्रमाणे मागणी करणे, सर्व मालमत्तांच्या नोंदी ठेवणे, नोंदणी रजिस्टर अद्यायावत ठेवणे तसेच त्याचे करारनामा, मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक वसूलीबाबत अद्यायावत माहिती ठेवणे. 44. भूमी अभिलेख, मालमत्ता हस्तांतरण व जमिन याबाबत कार्यवाही करणे. 45. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे. |