मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारचे व्यवसाय / उद्योग धंदे चालू असून या आस्थापनांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनिमय १९४९ चे कलम ३१३,३७६,३८६ प्रमाणे महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना शुल्क वसुली कामी अभिकर्ता न नेमता महानगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत वसुली करावी.
परवाना शुल्काचे दर मा. महासभा ठराव क्र. ४८ दि.१०/१०/२००८ अन्वये निश्चित करुन मंजूर केलेले आहेत. इतर महानगरपालिकेच्या तुलनेत मिरा भाईंदर महानगरपालिकेचा परवाना दर जास्त असल्याने व्यवसायधारक परवाना घेण्यास टाळाटाळ करत असतात. त्याकरीता यापूर्वी पारीत झालेल्या दरामध्ये सुधारणा करुन खालीलप्रमाणे क्षेत्रफळानुसार दर निश्चित केलेले आहेत.
अ.क्र.
आस्थापनाचे क्षेत्रफळ
दर (रु.)
१
२५० चौ. फुटा पर्यंत
२५०/-
२
२५१-५०० चौ. फुटा पर्यंत
५००/-
३
५०१-१००० चौ. फुटा पर्यंत
१०००/-
४
१००१-२५०० चौ. फुटा पर्यंत
२०००/-
५
२५०१-५००० चौ. फुटा पर्यंत
४०००/-
६
५००१-१०००० चौ. फुटा पर्यंत
६०००/-
७
१००००१- चौ.फुट च्या पुढे
८०००/-
सुचना :
अ) मोकळया खाजगी जागेत जे व्यवसाय करतात त्यासाठी रु.१०००/- प्रति वर्ष याप्रमाणे परवाना फी आकारण्यात यावी. ब) निवासासह वाणिज्य वापर करत असल्यास वाणिज्य जागेच्या क्षेत्रफळानुसार परवाना फी आकारण्यात यावी. क) ज्या व्यवसाय धारकांचे व्यवसायासह इतर ठिकाणी महानगरपालिका हद्दीत गोडाऊन असेल अशा व्यवसाय धारकांनी सदर व्यवसायास परवाना घेतेवेळी अर्जात नमुद केलेल्या गोडाऊनला परवाना फी आकारु नये. ड) हयापूर्वी व्यवसायधारकांनी घेतलेल्या परवानाचे नुतनीकरण करताना वरील सुधारीत दराने थकित रक्कम वसुली करावी.
वरील प्रमाणे महसुली उत्पन्नाच्या दृष्टीने कमीत कमी कागदपत्रे करारनामा/भाडे करारनामा, टॅक्स पावती, जागेचा पुरावा यापैकी कोणतेही कागदपत्र घेण्यात यावेत. शहरातील विविध सर्व प्रकारच्या आस्थापना धारकांकडून नविन परवाना व परवाना नुतनीकरण एक वर्ष किंवा किमान तीन वर्षापर्यंत देण्यात यावा. वरील सुचनांसह परवाना शुल्क फेरबदल करुन घेण्याच्या धोरणात्मक निर्णयास ही सभा मंजुरी देत आहे.
सुचक :- श्री. भगवती शर्मा अनुमोदन :- श्री. ओमप्रकाश अग्रवाल