मिरा भाईंदर महानगरपालिका
परिवहन उपक्रम

 

विभाग प्रमुख श्री. संजय दोंदे        
परिवहन उपव्यवस्थापक         प्रकाश कुलकर्णी 
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक   ८४२२८११३०९  
ई- मेल mbmctransport@gmail.om  

मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमास केंद्र शासन पुरस्कृत JnNURM-II या योजनेअंतर्गत ९० बसेस मंजुर होऊन त्यातील ४७ बसेस चालविणेत येतात.

बस संख्या – ४७

परिवह्न विभागाची रचना कार्य कर्तव्य याचा तपशिल 

1 कार्यालयाचे नाव परिवहन विभाग,मिरा भाईदर महानगरपालिका
2 पत्ता स्व. इंदिरा गांधी भवन‚ पहिला मजला‚ छत्रपती शिवाजी महाराज मार्ग‚ भाईदर (प.)‚ जि. ठाणे ४०११०१.
3 कार्यालय प्रमुख परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त (मुख्यालय)
4 कार्यालयीन दुरध्वनी क्र. व वेळ विस्तार क्र. २७६‚ वेळ – सकाळी १०.०० ते संध्याकाळी -१७.४५ वा.
5 साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा रविवार व प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार
6 शासकिय विभागाचे नाव परिवहन विभाग
7 कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनिस्त नगरविकास विभाग
8 कार्यक्षेत्र भौगोलिक व कार्यानुरुप मिरा भाईदर शहर व शहरालगतची इतर शहरे
9 विशिष्ट कार्य
 1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, शासन आदेश, परिपत्रक तसेच मा. महासभा व मा. स्थायी समिती यांनी ठरविलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत तसेच बोरीवली व मंत्रालय ठाणे‚ कल्याण‚ भिवंडी सारख्या शहरात प्रवाशांना परिवहन सुविधा उपलब्ध करुन देणे.
 2. परिवहन सुविधा देणेसाठी बसेस चालविण्याचे धोरण ठरविणे.
 3. परिवहन सुविधा कार्यक्षम करणे
 4. नवनविन योजनांची / संकल्पनांची अंमलबजावणी करणे.
 5. शासनाच्या नवनविन योजना राबविणे.
 6. केंद्रशासन, राज्यशासन तसेच वित्तीय संस्था यांचेकडून परिवहन सुविधा कार्यक्षम करणेसाठी अनुदान प्राप्त करुन घेणे.
 7. बससेवेसाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीची निर्मिती करणे उदा. बस स्टॅाप, डेपॊ
 8. शासनाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करणे
 9. मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करणे.
10 विभागाचे ध्येय धोरण शहरवासियांना/प्रवाशांना सुखकर परिवहन सेवा प्रदान करणे.
11 सर्व संबंधीत अधिकारी / कर्मचारी
 1. परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त
 2. मुख्यलेखापरीक्षक
 3. मुख्यलेखाधिकारी
 4. परिवहन उप-व्यवस्थापक तथा सहा. आयुक्त
 5. लेखाधिकारी
 6. लिपीक
 7. शिपाई
 8. सफ़ाई कामगार
12 कार्य शहरातंर्गत व शहराबाहेरील मार्गावर शहरवासियांना/प्रवाशांना परिवहन सुविधा उपलब्ध करुन देणे.
13 कामाचे विस्तृत स्वरुप
 1. शहरातंर्गत व शहराबाहेरील मार्गावर दिलेल्या वेळेत व संख्येत बसेस पुरविणे
 2. महापालिका क्षेत्रात परिवहन संबंधी शासनाच्या योजना / अभियान राबविणे.
 3. शासकीय / निमशासकीय / खाजगी / लोकप्रतिनिधी / पदाधिकरी / नगरसेवक इ. पत्रव्यवहार करणे, आलेल्या पत्रांना व तक्रारींना उत्तर देऊन त्यांचे निराकरण करणे
14 मालमत्ता तपशिल इमारती व जागेचा तपशिल प्रशासकीय कामकाज हे महानगरपालिका मुख्यालय येथून व बस Operation हे डॅा. बाबासाहेब आंबेडकर भवन, भाईंदर (प.) येथून चालते. मौजे घाडबदर येथे सुसज्ज असे डेपोचे कामकाज चालू आहे. बसेस पार्किग ह्या प्लेझट पार्क मिरा रोड येथे पार्किग स्थळावर करणेत येतात.
15 उपलब्ध सेवा परिवहन सेवा
16 संस्थेच्या संरचनात्मक तक्ता आयुक्त

 

 

 

परिवहन व्यवस्थापक

 

 

 

मुख्यलेखापरीक्षक

 

 

 

मुख्यलेखाधिकारी

 

 

 

परिवहन उप-व्यवस्थापक

 

 

 

लेखाधिकारी

 

 

 

लिपिक

 

 

 

शिपाई

 

 

 

सफ़ाई कामगार

 

अधिकारी/कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये

अनु क्र. पदनाम कायदेशीर तरतूद जबाबदारी व कर्तव्ये
परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ४०, ४१ च्या कलम 341 ते 362

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ४०, ४१ प्रकरण 7, कलम 73, 74 व 75 नुसार

मोटार वाहन अधिनियम 1939
 1. शहरातील प्रवाशी जनतेला प्रवाशीभिमुख सुयोग्य व नियोजनबध्द, वक्तशीर परिवहन सेवा पुरवून वैयक्तिक व खाजगी वाहनांचा वापर कमी करणेसाठी परिवहन उपक्रम सक्षमपणे चालविणेकरिता प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे सादर करणे.
 2. बस आगार व टर्मिनससाठी जागा संपादन करणेसाठी आवश्यकतेनुसार बांधकाम करणेसाठी प्रस्तावित करणे.
 3. परिवहन उपक्रमाचे कामकाज काटकसरीने व कार्यक्षमरितीने करणे.
 4. उपक्रमाचे परिचालन व विकास करण्यासाठी आवश्यक असतील ती सर्व कामे करणे.
 5. पुर्वगामी तरतुदींच्या सर्वसाधारणतेला बाधा न येता मा.महासभेच्या / मा.स्थायी समितीच्या मंजूरीने अणि महानगरपालिका अधिनियमान्वये लादण्यात आलेल्या निर्बंधाच्या किंवा शर्तीच्या अधीन शहरात किंवा शहराबाहेर वाहतूक करण्यासाठी परिवहनची सोय करणे व उपक्रमाची रचना करणे.
 6. परिवहन उपक्रम चालविण्यासाठी त्याच्या विकासासाठी विस्तारासाठी आवश्यक किंवा इष्ट असतील अशा प्रत्येक प्रकारच्या इमारती आणि कार्यशाळा बांधणे.
 7. शासनाच्या वेळोवेळी अंमलात येणाऱ्या निर्णयानुसार, परिवहन उपक्रम चालविण्यासाठी ठरलेल्या धोरणानुसार विविध ठेकेदार (ऑपरेटर, तिकिट कलेक्शन एजन्सी, सल्लागार) नियुक्त करणेकामी निविदासंबधी कार्यवाही करणे, करारनामे करणे व कार्यादेश देण्यासंबंधी कार्यवाही करणे.
 8. मोटार वाहन अधिनियमानुसार कार्यवाही करणे.
 9. परिवहन सेवा देणेसाठी विविध टप्प्यां प्रमाणे भाडे निश्चित करण्यासाठी प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाच्या मंजूरीने एम.एम.आर.टि.ए. यांचेकडे अंतिम मंजूरीसाठी सादर करणे.
 10. परिवहन सेवांबद्दल भाडे व आकार वसुल करणेसाठी योग्य त्या एजन्सीची नियुक्ती करणेची कार्यवाही करणे.
 11. तात्पुरती पदे निर्माण करणेची कार्यवाही करणे.
 12. परिवहन निधी स्थापन करणे.
 13. परिवहन उपक्रमाच्या वार्षिक अर्थसंकल्प व प्रशासकीय अहवाल सादर करणे.
 14. मा.महासभेच्या / मा.स्थायी समितीने केलेले ठराव हे शासकीयदृष्टया योग्य असल्यास त्यांची अंमलबजावणी करणे तसेच ते ठराव शासकीयदृष्टया योग्य नसल्यास असे ठराव आयुक्तांच्या मंजूरीने व शासनाच्या अभिप्रायार्थ व निर्णयार्थ पाठविणे.
 15. परिवहन उपक्रमाच्या धारेणात्मक बाबी संबधी परिवहन उपव्यवस्थापकामार्फत अंतिम मंजूरीसाठी आलेले प्रस्ताव अभिप्रायासह आयुक्त यांच्या मान्यतेने अंतिम मंजूरीसाठी मा.महासभेस सादर करणे. तसेच ज्या प्रस्तावांना शासनाच्या मंजूरीची आवश्यकता आहे, असे प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी पाठविणे.
 16. परिवहन उपक्रमाच्या संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
 17. E.S.C.B.S. – GEF-5 (Efficient and Sustainable City Bus Services- Global Environment Facility 5) या अंतर्गत अनुदान मिळणेसाठी कार्यवाही करणे. तसेच त्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करणे.
 18. J.N.N.U.R.M-2 अंतर्गत मंजूर झालेल्या बसेस ताब्यात घेऊन त्या चालविण्या संदर्भात योग्य ते धोरण तयार करणेसाठी कार्यवाही करणे.
 19. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे.
मुख्यलेखापरीक्षक   परिवह्न विभागाच्या लेख्यांचे परीक्षण करणे
मुख्य लेखाधिकारी  
 1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमानुसार परिवहन लेख्यासंबंधीचे कामकाज करणे.
 2. महाराष्ट्र नगरपरिषद लेखासंहिता १९७१ मधील तरतूदीनुसार लेखे ठेवणे.
 3. परिवहन अंदाजपत्रक तयार करणे.
 4. देयकांचे प्रदान करण्याकरिता धनादेशावर स्वाक्षरी करणे.
 5. त्रैमासिक व वार्षिक लेखे तयार करुन सक्षम प्राधिकरणाकडे सादर करणे.
 6. रोखवह्या, गुंतवणूक नोंदवही, कर्ज परतफेड नोंदवही तपासणे.
 7. परिवहन निधींच्या शिल्लक रकमा मुदतठेवीत गुंतविणे.
 8. शासकीय अनुदानांचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात सादर करणे.
 9. मंजूर अंदाजपत्रकीय तरतूदींवर नियंत्रण ठेवणे.
 10. आयकर, कार्यकंत्राट कर, प्रवासी कर, बालपोषण अधिभार, वीज बिल विहित मुदतीत भरणा करणेच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवणे.
परिवहन उप-व्यवस्थापक तथा सहा. आयुक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 341 ते 362 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 प्रकरण 7 कलम 73, 74 व 75 नुसार मोटार वाहन अधिनियम 1939
 1. परिवहन उपक्रमाचे कामकाज काटकसरीने व कार्यक्षमरितीने करणे.
 2. पुर्वगामी तरतुदींच्या सर्वसाधारणतेला बाधा न येता मा.महासभेच्या / मा.स्थायी समितीच्या मंजूरीने अणि महानगरपालिका अधिनियमान्वये लादण्यात आलेल्या निर्बंधाच्या किंवा शर्तीच्या अधीन शहरात किंवा
 3. शहराबाहेर वाहतूक करण्यासाठी परिवहन सेवा उपलब्ध करणेसाठी व उपक्रमाची रचना करणेसाठी प्रस्ताव सादर करणे
 4. परिवहन उपक्रम चालविण्यासाठी त्याच्या विकासासाठी विस्तारासाठी आवश्यक किंवा इष्ट असतील अशा प्रत्येक प्रकारच्या इमारती आणि कार्यशाळा बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करणे.
 5. शासनाच्या वेळोवेळी अंमलात येणाऱ्या निर्णयानुसार, परिवहन उपक्रम चालविण्यासाठी ठरलेल्या धोरणानुसार विविध ठेकेदार (ऑपरेटर, तिकिट कलेक्शन एजन्सी, सल्लागार) नियुक्त करणेकामी निविदासंबधी कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव सादर करणे, करारनामे तयार करणे व कार्यादेश देण्यासंबंधी कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
 6. मोटार वाहन अधिनियमानुसार काम करणे .
 7. परिवहन सेवा देणेसाठी विविध टप्प्यां प्रमाणे भाडे निश्चित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे.
 8. परिवहन सेवांबद्दल भाडे व आकार वसुल करणेसाठी एजन्सीची नियुक्ती करणेबाबत प्रस्ताव सादर करणे .
 9. तात्पुरती पदे निर्माण करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
 10. परिवहन निधी स्थापन करणेबाबतची कार्यवाही करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
 11. परिवहन उपक्रमाचे वार्षिक अर्थसंकल्प व प्रशासकीय अहवाल सादर करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
 12. परिवहन उपक्रमाच्या धारेणात्मक बाबी संबधी प्रस्ताव तयार करुन अभिप्रायासाठी परिवहन व्यवस्थापकाकडे सादर करणे.
 13. परिवहन उपक्रमाच्या संपूर्ण कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.
 14. परिवहन उपक्रमातर्फे नियुक्त केलेल्या विविध ठेकेदार, सल्लागार यांच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.
 15. परिवहन व्यवस्थापकाचे काम नं.२० व २१ जसेच्या तसे कार्यवाही करणेसाठी सादर करणे.
 16. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज करणे.

लेखाधिकारी  
 1. १९७१ मधील नियमानुसार परिवहन विभागासंबंधी लेखा विषयक कामकाजावर पर्यवेक्षण करणे.
 2. अर्थसंकल्पीय तरतूद तपासून मुख्यलेखाधिकारी यांचेकडे सादर करणे.
 3. परिवहन अंदाजपत्रक तपासणे.
 4. त्रैमासिक व वार्षिक लेखे तपासून सादर करणे.
 5. अग्रिम रजिस्टर तपासून सादर करणे.
 6. ठेवी नोंदवही तपासून सादर करणे.
 7. आयकर, कार्यकंत्राट कर, प्रवासी कर, बालपोषण अधिभार, कामगार कल्याण निधी कर भरणेबाबतच्या कार्यवाहीचे पर्यवेक्षण करणे.
लिपिक (१)  
 1. प्रवाशाकडून आलेल्या तक्रारीचे निवारण करणे त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणे.
 2. परिवहन उपक्रमास लागू करावयाची नियमावली / विनियम तयार करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
 3. कामगार कल्याण निधी, प्रवासी कर, बालपोषण अधिभारच्या रकमा शासनाकडे जमा करणे.
 4. परिवहन उपक्रमास लागू असलेल्या कायद्या अतंर्गत परवाना काढणे व वेळोवेळी परवान्याचे नुतनीकरण करणे (उदा. शाप अॅण्ड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट कारखाना कायदा मोटार ट्रान्सपोर्ट वर्कर्स अॅक्ट एक्सप्लोजिव्हस अॅक्ट बसेसचा व्यवसाय कर . )
 5. परिवहन उपक्रमातर्फे नियुकत केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे पर्यवेक्षण करून त्याप्रमाणे अहवाल सादर करणे.
 6. परवाना कायदा मोटार ट्रान्सपोर्ट कायदा सांख्यिकी विवरणपत्र
 7. त्यादी बाबतची कार्यवाही करणेसाठी सादर करणे.
 8. मा.औद्योगिक तसेच कामगार न्यायालय येथे दाखल केलेल्या दाव्याबाबत विधी अधिकाऱ्यामार्फत रिटर्न स्टेटमेंट दाखल करणेसाठी कॅव्हेट दाखल करणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
 9. वार्षिक प्रशासकीय अहवाल परिवहन उप-व्यवस्थापक यांचेकडे सादर करणे.
 10. कार्यादेशाची व अंदाजपत्रकाची प्रत संकेतस्थळावर प्रसिध्द करणे तसेच पी.एफ. संबंधी कार्यवाही करणेसाठी पी.एफ. संकेत स्थळावर ठेकेदाराची नोंदणी करणे.
७  लिपिक (२)   तिकिट व रोख विभागाच्या कामावर देखरेख व नियंत्रण तसेच ताळमेळचे काम अद्यावत ठेवणे.
लिपिक (३)  
 1. वार्षिक उत्पन्न व खर्च यांचा ताळेबंद तयार करणे, सदर ताळेबंद मनपा लेखापरीक्षक यांचेकडून तपासून प्रमाणित करुन घेणे.
 2. वार्षिक प्रशासकीय, वित्तीय अहवाल तयार करणे व त्यास मा.महासभेच्या/ मा.स्थायी समितीची मंजूरी घेणेसाठी प्रस्ताव सादर करणे.
 3. परिवहन उपक्रमातर्फे निर्माण करण्यात आलेल्या विविध फंड्स (निधी) यांचे भविष्यात आवश्यकता लक्षात घेऊन अल्प मुदतीची व दिर्घ मुदतीच्या गुंतवणूकीचा प्रस्ताव सादर करणे.
 4. आयकर संबंधित दाखले देणे. (आयकर नियम १९६२ नियम ३५,७,३)
 5. कॅश बुकवरील मासिक लेजरवर सह्या करणे.
 6. कॅश बुक व इतर आर्थिक व्यवहारातील लेखनिक दुरुस्ती करणेबाबत मंजूरी घेणे.
 7. सर्व फंडाच्या रोख वह्या व गुंतवणूक रजिस्टरवर महिना अखेर व वर्ष अखेर सह्या करणे.
 8. जनरल कॅश बुक वर सह्या करणे.

अंदाजपत्रक सन २०१५-१६

 

ESCBS – Efficient and Sustainable City Bus Services अंतर्गत केंद्रशासनाकडुन अनुदान

  अनुदान खर्च
JNNURM I रु ४.९६ कोटी (प्राप्त) रु ४.९६ कोटी
JNNURM II - रु १८.०१ कोटी (प्राप्त) रु १७.७८ कोटी
GEF 5 (जागतिक बँक) रु १०.०० कोटी (मंजूर) -

ख) अर्थसंकल्प – परिवहन 

अंदाजपत्रकीय शिर्ष मंजुर रक्कम खर्च रक्कम
अस्थायी वेतन रु ६०,००,०००/- -
अधिका-यासाठी वाहन खर्च / प्रतिपूर्ती भत्ता रु ३,००,०००/- रु १३, ८००/-
इंधन वंगण स्पेअर पार्ट खर्च रु ३,२४,००,०००/- रु १,२७,६६,४०३/-
बसेस देखभाल दुरुस्ती (AMC) रु १,००,००,०००/- -
परिवहन समिती पदाधिकारी / अधिकारी / कर्मचारी प्रशिक्षण दौरा रु २,००,०००/- रु ५३,९९२/-
तांत्रिक सल्लागार फ़ी रु ५०,००,०००/- रु १४,००,४५९/-
वाहातूक विभाग अधिकारी वेतन / ठेक्यावरील कर्मचारी रु १,८०,००,०००/- रु १,४६,१९,२५२/-
छपाई खर्च रु २०,००,०००/- रु ३३,७०५/-
आकस्मिक / इतर खर्च रु ३,००,०००/- रु २,९१,९३१/-
फ़र्निचर खरेदी रु १५,००,०००/- -
आगार बांधकाम रु २,५०,००,००/- -
तात्पुरते पार्किंग विकसित करणे रु ३,५०,००,०००/- रु ८४,०३,४०५/-
अनुदान खर्च रु ५००,००,०००/- रु ५९,००,०००
सीएमपी. रु २५,००,०००/- रु १४,२१,४००/-
जीईएफ़५ डीपीआर. (प्रकल्प अहवाल) रु २७,००,०००/- रु २६,८२,२३६/-
नविन बसेस व साधन सामुग्री चारेदी रु ३१,००,००,०००/- रु १३,९७,७०,७५७/-
कार्य कंत्राट कर / बसेस रजिस्टे फ़ी रु ५००,००,०००/- रु २८,०००/-

परिवहन उपक्रम चालवित असलेल्या बस मार्ग

अ.क्र बस मार्ग क्रमांक मार्गाचे नाव बस संख्या राखीव
१. भाईंदर स्थानक प. ते चौक ०२
२. भाईंदर स्थानक प. ते उत्तन नाका
३. भाईंदर स्थानक प. ते एस्सेल वर्ल्ड पॅगोडा
४. भाईंदर स्थानक प. ते मॅक्सेस मॉल
५. उत्तन नाका ते मनोरी तर
६. १० भाईंदर स्थानक प. ते कोपरी ठाणे स्थानक पु.
७. १४ भाईंदर स्थानक पु. ते मागाठाणे बोरिवली
८. १५ मिरारोड स्थानक पु. ते रश्मी कोम्ल्पेक्स
९. २१ मिरारोड स्थानक पु. ते राम नगर
१० २२ मिरारोड स्थानक पु. ते शांती विद्यानगरी
११. २४ मिरारोड स्थानक पु. ते वेस्टर्न पार्क
१२. २९ मिरारोड स्थानक पु. ते कोपरी ठाणे स्थानक पु.
१३. ३१ भाईंदर स्थानक प. ते मुलुंड स्थानक पुर्व
एकुण ४५ ०२

परिवहन उपक्रम बस डेपो संख्या

मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमात मौजे घोडबंदर येथे बस डेपोचे काम चालू आहे.त्याचप्रमाणे प्राप्त बस ह्या सद्य:स्थितीत प्लेझंट पार्क, मिरा रोड (पू.) येथील पार्किंग स्थळी व्यवस्था करणेत आलेली आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे बस स्टॉप बस मार्गाप्रमाणे तपशिल खालीलप्रमाणे.

अ.क्र बस मार्गाचे नाव मार्गाचे अंतर कि.मि. बस स्टॉप संख्या
भाईंदर स्थानक प. ते चौक १४.२ ५३
भाईंदर स्थानक प. ते उत्तन नाका १०.३ ३८
भाईंदर स्थानक प. ते एस्सेल वर्ल्ड पॅगोडा १६.१ ४८
भाईंदर स्थानक प. ते मॅक्सेस मॉल ५.९ १५
उत्तन नाका ते मनोरी तर ११.६ ३४
भाईंदर स्थानक प. ते कोपरी ठाणे स्थानक पु. ३४.५ ६२
भाईंदर स्थानक पु. ते मागाठाणे बोरिवली १३.५ ४१
मिरारोड स्थानक पु. ते रश्मी कोम्ल्पेक्स ४.१ १६
मिरारोड स्थानक पु. ते राम नगर ३.१ ११
१० मिरारोड स्थानक पु. ते शांती विद्यानगरी ४.४ १७
११ मिरारोड स्थानक पु. ते वेस्टर्न पार्क ५.७ १९
१२ मिरारोड स्थानक पु. ते कोपरी ठाणे स्थानक पु. ३०.२ ४९
१३ भाईंदर स्थानक प. ते मुलुंड स्थानक पुर्व ४३.४ ९२

 


शेवटचा बदल : 12-12-2018