मिरा भाईंदर महानगरपालिका
नगररचना

विभाग प्रमुख श्री. दिलीप घेवारे 
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 8898499999,    022-28108165/28121455 
ई- मेल tp@mbmc.gov.in

मिरा भाईंदर शहराचे क्षेत्र ७९.४० चौ. कि.मी. असून १९ महसुली गावांचा समावेश आहे.मिरा भाईंदर शहराची विकास योजना (वगळलेला भाग सोडून) दि.१४/०५/१९९७ रोजी मंजूर झालेली असून दि.१५/०७/१९९७ पासून अंमलात आलेले आहे. वगळलेल्या भागाची विकास योजना दि.२५/०८/२००० रोजी मंजूर झालेली असून दि.१५/१०/२००० पासून अंमलात आलेली आहे. मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत शासन निर्णय क्र. टिपीएस-१२०८/१३४६/प्र.क्र.२६७/०८/नवि-१२, दि.२९/०८/२००९ अन्वये फेरबदल मंजूर झाले आहेत. 

नगररचना विभागामध्ये २३ कर्मचारी असून तांत्रिकपदे ०९ व अतांत्रिकपदे ०५ आहेत. सध्या कार्यरत नगररचनाकार - ०१, प्र. सहा. नगररचनाकार - ०१, कनिष्ठ अभियंता - ०४, मुख्य सर्व्हेअर , सर्व्हेअर , अनुरेखन प्रत्येकी ०१ व वरिष्ठ लिपिक / लिपिक - ०५ आहेत. 

4964.2020 सहा. आयुक्त

टिप : अधिक माहितीसाठी सोबत जोडण्यात आलेली फाईल डाऊनलोड करा.

 नगररचना विभाग

काम काजाचे स्वरूप 

 • नवीन / सुधारित/ पुर्न:विकास बांधकाम प्रस्ताव छाननी
 • जोत्याचा दाखला,
 • भोगवटा दाखला छाननी
 • विकास योजनेतील आरक्षणातील जागा विकास हक्क प्रमाणपत्र देऊन ताब्यात घेणे.
 • विकास योजनेतील आरक्षणाखाली जागा, भुसंपादन करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.
 • महानगरपालिका विभागातील जागेचा झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, जमीन मोजणी साठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, विकास योजनेबाबत अभिप्राय देणे.
 • महानगरपालिका क्षेत्रातील जुने गाळे / निवासी इमारत, औद्योगिक गाळे इत्यादी सुस्थितीत करणेसाठी दुरुस्ती परवानगी देणे.
 • जागेवर कुंपणभिंत लावणेसाठी परवानगी देणे.
 • निवासी इमारतीवर पावसाळा कालावधीसाठी वेदरशेड परवानगी देणे.
 • शासकीय जागा मागणी प्रस्ताव तयार करणे.
 • महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 नुसार करावयाची इतर विविध कामे.
 • मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार करावयाची विविध कामे.
 • महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत प्रभाग अधिकारी यांना बांधकामाची माहिती / तपशील देणे व मार्गदर्शन करणे.
 • न्यायालयीन प्रकरणात विधी विभागास माहिती पुरविणे व आवश्यक असलेल्या न्यायालयीन प्रकरणात पाठपुरावा करणे.
 • मा. स्थायी समिती, मा. महासभा, इत्यादी विषय निहाय गोषवारा तयार करणे व त्या अनुषंगाने पुढील कामे करणे.
 • माहिती अधिकार, अपिलीय अधिकारातील कामे.
 • महानगरपालिकेतील इतर विभागातील आलेल्या संदर्भावर अभिप्राय देणे.
 • मा. आयुक्त सो. यांनी निर्देशीत केलेले इतर कामे.

अनधिकृत रचना नियमितकरण

मान्यताप्राप्त बांधकाम

MBMC Town Planning - 2003 TO Dec 2020

1099.2020 - सिस्टीम मॅनेजर

MBMC-T.P. - 2003 TO Sept. 2020 - DRC

MBMC-T.P. - 2003 TO Sept. 2020 - Santion

MBMC-T.P. - 2003 TO MAY 2019

MBMC-T.P. - 2003 TO DECEMBER 2019

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण आरक्षणे

मिरा भाईंदर शहर च्या मंजुर विकास योजनेमध्ये फेरबदल करणेबाबत

MBMC विकास योजना

थकबाकीदार विकासकांची यादी

माहिती अधिकार अधिनियम

मीरा भाईंदर संकेतस्थळाबाबत

प्राथमिक परवानगी


शेवटचा बदल : 21-01-2021