मिरा भाईंदर महानगरपालिका
भांडार विभाग

2017-18 कलम ४(१)ब

2016-17 कलम ४(१)ब

2017-18 कलम ४(१)ब

विभाग प्रमुख श्री.जगदीश भोपतराव
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 8422811226
ई- मेल store@mbmc.gov.in

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागास स्टेशनरी साहित्य पुरवठा करणे, फॉर्म/रजिस्टर छपाई करुन पुरवठा करणे, बोर्ड/बॅनर बनवून पुरवठा करणेचे कामकाज भांडार विभागामार्फत करण्यात येते.

विभागाची कामे

अ.क्र. पदनाम जबाबदारी व कर्तव्ये
उपायुक्त भांडार १. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भांडार विभागाचे नियंत्रण अधिकारी म्हणून सर्व जबाबदा-या पार पाडणे.
२. भांडार विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
३. रक्कम रु.२ लाखा पेक्षा कमी रक्कमेच्या कामास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देणे व निविदा मागविणे, निविदा मंजुर करणे, मुदत वाढ देणे.
४. मंजुर निविदाधारकांसोबत करारनामा करणे, कार्यादेश देणे.
५. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये भांडार विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे.
भांडार अधिकारी १. महानगरपालिकेच्या विविध विभागास लागणारे स्टेशनरी साहित्य, विविध प्रकारचे नमुने, बोर्ड-बॅनर बनविणे, फ़र्निचर खरेदी करणे, कर्मचा-यांना दर २ वर्षांनी छ्त्र्या, रेनकोट, गणवेष पुरवठा करणे कामी निविदा प्रकिया करणेसाठी प्रस्ताव सादर करणे, मंजुर निविदाधारकांस मागणीनुसार कामाचे कार्यादेश देण्याची कार्यवाही करणे.
२. महापालिकेचे पदाधिकारी, जनसंपर्क विभाग, पत्रकार कक्ष, ज्येष्ठ 2. नागरीक विरंगुळा केंद्र येथे वृत्तपत्र पुरवठा करणे.
३. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये भांडार विभागाचे जनमाहिती अधिकरी म्हणून कामकाज करणे.
लिपीक १. निविदा प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही करणे.
२. कंत्राटदाराने पुरवठा केलेल्या साहित्यांची नोंद स्टॉक रजिस्टरला घेणे. व सदरचे साहित्य संबंधीत विभागास वितरीत करुन त्याची नोंद घेणे.
३. पुरवठा केलेल्या मालाचे देयक तयार करणे.
४. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये भांडार विभागाचे सहाय्यक जनमाहिती अधिकरी म्हणून कामकाज करणे.
५. कार्यादेशाची व अंदाजपत्रकाची प्रत संकेतस्थळावर प्रसिध्द करणे तसेच पी.एफ. संबंधी कार्यवाही करणेसाठी पी.एफ. संकेत स्थळावर ठेकेदाराची नोंदणी करणे.

माहिती अधिकार अधिनियम

१. श्री.बाबुराव वाघ, भांडार अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी

२. श्री.प्रविण पाटील, सहा.जनमाहिती अधिकारी

३. श्री.विजयकुमार म्हसाळ उपायुक्त (भांडार) तथा प्रथम अपिलीय अधिकारी

अनुक्रम

१. उपायुक्त (भांडार)

२. भांडार अधिकारी

३. लिपिक

४. शिपाई/मजूर

विभागातील सदस्यांची यादी

१. श्री.विजयकुमार म्हसाळ उपायुक्त (भांडार)

२. श्री.बाबुराव वाघ, भांडार अधिकारी

३. श्री.प्रविण पाटील,लिपिक

४. श्री.सुनिल रॉड्रीक्स, मजूर

५. श्री.राजूवेल मोटीयन, स.का.

६. श्री.सुनिल राठोड, रखवालदार

निविदा

भांडार विभागामार्फत विविध विभागास स्टेशनरी साहित्य पुरवठा करणेकामी, विविध प्रकारचे नमुने/रजिस्टर छपाई करुन पुरवठा करणे, विविध प्रकारचे बोर्ड बॅनर बनवून पुरवठा करणे कामी वार्षिक दराची निविदा मागवून ठेकेदार नियुक्त केला जातो. सदर ठेकेदारामार्फत विविध विभागांच्या मागणीनुसार साहित्यांचा पुरवठा केला जातो.

नेमणूक/बदली

श्री.बाबूराव वाघ यांची बदली दि.०३/१०/२०१६ रोजीच्या आदेशान्वये भांडार अधिकारी म्हणून करण्यात आलेली आहे. सदर आदेशाची प्रत सोबत जोडली आहे. सदर आदेशाची प्रत सोबत जोडली आहे.

कामाचे आदेश

१. महानगरपालिकेस विविध प्रकारचे स्टेशनरी साहित्य पुरवठा करणेकामी मे.एस.व्ही. इन्टरप्रायजेस, मे.नवकार युनिफॉर्म, मे.श्री ए.डी. इन्टरप्रायजेस, मे. वसंत ट्रेडर्स यांची वार्षिक दराची निविदा मा.आयुक्त यांनी दि.२७/०३/२०१५ रोजी मंजूर केली असून त्याचा कालावधी दि.२६/०३/२०१६ पर्यंत होता. मा.आयुक्त यांनी सदर कामी नव्याने ठेकेदार नियुक्त करेपर्यंत पूर्वीच्या कंत्राटास दि.२६/०२/२०१६ रोजी मुदतवाढ दिलेली आहे.

२. महानगरपालिकेस विविध प्रकारचे नमुने/ रजिस्टर छपाई करणेकामी मे.वसंत ट्रेडर्स यांची वार्षिक दराची निविदा मा.आयुक्त यांनी दि.२७/०३/२०१५ रोजी मंजूर केली असून त्याचा कालावधी दि.२६/०३/२०१६ पर्यंत होता. मा.आयुक्त यांनी सदर कामी नव्याने ठेकेदार नियुक्त करेपर्यंत पूर्वीच्या कंत्राटास दि.२६/०२/२०१६ रोजी मुदतवाढ दिलेली आहे.

३. महानगरपालिकेस विविध प्रकारचे बोर्ड/बॅनर बनवून देणेकामी मे.एम.एस.इन्टरप्रायजेस व मे.श्री ए.डी. इन्टरप्रायजेस यांची वार्षिक दराची निविदा मा.आयुक्त यांनी दि.२७/०३/२०१५ रोजी मंजूर केली असून त्याचा कालावधी दि.२६/०३/२०१६ पर्यंत होता. मा.आयुक्त यांनी सदर कामी नव्याने ठेकेदार नियुक्त करेपर्यंत पूर्वीच्या कंत्राटास दि.२६/०२/२०१६ रोजी मुदतवाढ दिलेली आहे.

 


शेवटचा बदल : 04-10-2019