मिरा भाईंदर महानगरपालिका
मालमत्ता कर विभाग

विभाग प्रमुख श्रीगोविंद परब
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 9004402402
ई- मेल propertytax@mbmc.gov.in

आकारणी रजिस्टर माहिती(०१/०४/२०१७ ते ३१/०३/२०१८ )

प्रेस नोट (कर) 12.12.17

Assessment register 2016-17

Property tax Coverage for year 2015-16

Property tax demand and Collection for year 2015-16

दि.19072019 कर निर्धारक व संकलक  


मिरा भाईंदर महानगरपालिकेचे मालमत्ता कर हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असून कर विभाग हा महानगरपालिकेचा कणा आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे एकुण क्षेत्रफळ हे ७९ चौ.की.मी एवढे असून महानगरपालिका हद्दीत एकुण ३८४७३ एवढया मालमत्ता असून २,८४,०८७ मालमत्ता कर खातेदार आहेत.मालमत्ता कर विभागाचे ४ प्रभाग कार्यालये व ७ विभागीय कार्यालये असून त्या अंतर्गत २१ वसूली वॉर्ड आहेत. मालमत्ता कर विभागाचे संपूर्णत: कामकाज हे संगणकीकृत करण्यांत आले असून मुख्य कार्यालयाशी ४ प्रभाग कार्यालये वॅन द्वारे मुख्य कार्यालयाशी जोडण्यांत आले आहेत.तसेच कर विभाग मुख्य कार्यालयामार्फत मुख्यत्वे मालमत्ता कर आकारणी व वसूली, बाजार लिलाव करणे, मोकळया जागेवर कर आकारणी करणे व वसूली करणे, तलाव लिलाव, भुईभाडे, करमणुक कर आदी कामे केली जातात.

१) मालमत्ता कर

नवीन मालमत्तांचा शोध घेउन त्यांना कर आकारणी करणे, केलेल्या कर आकारणी प्राप्त झालेल्या तक्रारी/हरकतींचा निपटारा करणे, मालमत्ता कराचे बिल मालमत्ता धारकांना देउन मालमत्ता कराची वसूलीची पूढील कार्यवाही करण्यात येते. सन २०१०-११ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची मागणी रु. १०९.६८ कोटी एवढी असून कर वसूली रु. ६८.९१ कोटी करण्यांत आली आहे. नविन तयार होणाऱ्या मालमत्ता, वापरात बदल झालेल्या मालमत्ता, चटई क्षेत्रफळात सुधारणा करणे, भाडेतत्वावर कर आकारणी करणे आदी प्रस्तावांना अंतिम मंजूरी देणे, कर विषयक कामाचा निपटारा करणे, कर वसूली विषयक धोरण निश्चित करणे.

२) बाजार लिलाव 

महानगरपालिका हद्दीत फेरीवाले, फळ-भाजी विक्रेते यांचे कडुन बाजार फी वसूली करण्यांत येते. त्या करीता एक वर्षाच्या कालावधीकरीता बोली पध्दतीने ठेका देण्यांत येतो. महानगरपालिकेच्या भाईंदर (पू.), भाईंदर (प.), मिरारोड ते चेणा व मुर्धा ते उत्तन या विभागातील फेरीवाल्यांकडुन बाजार फी वसूली करणे कामी लिलाव करुन सन २०११-१२ या एक वर्षाच्या कालावधीकरीता ४ विभागाकरीता एकुण रु. ४,७३,०६,८००/- एवढया रकमेकरीता बाजार ठेका देण्याचे प्रस्तावित करण्यांत आले आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे :-

अ.क्र. विभागाचे नाव बोली रक्कम
 १ भाईंदर (पूर्व) १,५३,३२,७७५/-
 २ भाईंदर (पश्चिम) १,५२,१३,३७५/-
 ३ मिरारोड ते चेणा १,६१,०९,०००/-
 ४ मुर्धा ते उत्तन ६,५१,६५०/-

३) मोकळया जागेवरील कर आकारणी 

मा. महासभा ठराव क्र. ८ दि. १०/०४/२००८ अन्वये शहरातील बांधकाम परवानगी घेतलेल्या मोकळया जागेवर कर आकारणी करणे करीता मंजूरी देण्यात आली असून त्या प्रमाणे शहरातील बांधकाम परवानगी घेण्यांत आलेल्या मोकळया जागेस त्या जागेचे बाजार मूल्य ठरविले जाते. तद्नंतर सदर बाजार मूल्या दरानुसार जागेस कर आकारणी करणेकामी त्या जागेचे करयोग्य मूल्य ठरवून त्यावर कर आकारणी करुन संबधितास बिले बजावण्यांत आली असून कर वसूलीची कार्यवाही करण्यांत येत आहे.

४) करमणुक कर 

सिनेमा, थिएटर, सर्कस, नाटक, तमाशा व इतर यावर प्रती खेळ रु. १५/- या प्रमाणे करमणुक कर वसूल करण्यात येत असून सन १०-११ या आर्थिक वर्षात रु. ३,७०,५००/- एवढी रक्कम वसूल करण्यांत आली आहे.

५) भुईभाडे/ सदनिका भाडे

महानगरपालिकेच्या मालकीच्या बाजार व व्यावसायीक गाळे धारकांकडुन कर विभागामार्फत भुई भाडे वसूल करण्यांत येते. तसेच भुईभाडे धारक यांचेकडुन रु. ६३,०६९/- एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच सदनिका भाडे यामधुन रु. ६६,१००/- एवढी रक्कम वसूल करण्यांत आली आहे.

६) तलाव लिलाव

महानगरपालिका क्षेत्रातील महानगरालिकेच्या मालकीचे ११ तलाव मासेमारी करण्याकरीता ३ वर्षाच्या कालावधीकरीता लिलाव करण्यांत येतात सदर लिलाव हे तलावातील मासेमारी करण्याकरीता देण्यांत येत असून सन २००८ ते सन २०११ या कालावधीकरीता एकुण रु. १०,२५,८५०/- एवढया रकमे करीता तलाव लिलाव करण्यांत आले होते त्याचा तपशिल खालीलप्रमाणे 

अ.क्र. तलावांचे नाव बोली रक्कम
 १ नाले तलाव-उत्तन ४१,८००/-
 २ गावदेवी तलाव-मुर्धे १,३८,०००/-
 ३ राम मंदीर तलाव-राई ६०,०००/-
 ४ नविन तलाव-मोर्वा ३०,०००/-
 ५ जुना तलाव-नवघर ४२,०००/-
 ६ गोडदेव तलाव ५३,३५०/-
 ७ नविन तलाव-नवघर २,७६,०००/-
 ८ सुकाला तलाव-पेणकरपाडा ३८,७००/-
 ९ भोयाल तलाव-उत्तन ३०,०००/-
 १० जरी मरी तलाव-काशी ५४,०००/-
 ११ राव तलाव-भाईंदर (प.) १,७०,०००/-

 

 

 


शेवटचा बदल : 03-10-2019