मिरा भाईंदर महानगरपालिका
इतिहास

पाच ग्रामपंचायतीच्या एकत्रीत समावेशासह दि. १२ जून १९८५ रोजी मिरा भाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली त्यानंतर २३ जानेवारी १९९० रोजी राईमुर्धे, डोंगरी, उत्तन व वर्सोवा या चार ग्रामपंचायतीचा समावेश झाला. या नगरपालिकेच्या सभोवताली दहिसर चेकनाक्यापासुन थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वनराई, घोडबंदर किल्ला, वसईची खाडी, उत्तन, गोराई बिच असा एकुण ७९.४० चौ.कि.मी. एवढ्या क्षेत्रफळात निसर्ग सो॑दर्याने संपन्न असलेले शहर म्हणजे मिरा भाईंदर शहर. या मिरा भाईंदर शहराची सन २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ५,२०,३८८ एवढी असुन दिवसेंदिवस जसजसा शहराचा विकास होत आहे त्याप्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढीनुसार दि. २८ फेब्रुवारी २००२ रोजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले, त्यावेळेपासुन ज्याप्रमाणात शहराचा विकास होत आहे त्याचे दुप्पट प्रमाणात शहराची लोकसंख्या जवळजवळ वाढत असल्याने महानगरपालिकेजवळ उपलब्ध असलेल्या नागरी सेवा सुविधांवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे काही वेळा नागरी सुविधा पुरविणे प्रशासनास अडचणीचे होत आहे.

दि. २८ फेब्रुवारी २००२ रोजी महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीं मधुन सर्वानुमते प्रथम महापो॑र म्हणुन सौ. मायरा गिल्बर्ट मेंडोसा व उपमहापो॑र श्री. मुझफ्फर हुसैन हे निवडून आले असुन त्यानंतर त्याच टर्म मधील दुसरया टप्यात महापो॑र सौ. निर्मला सावळे कांबळे या अनु. जातीसाठी राखीव महापो॑र कोट्यातून त्यांची निवड झाली होती तर उपमहापो॑र श्री. चंद्रकांत वैती हे होते. सद्यस्थितीत आगस्ट २००७ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीं मधुन महापो॑र म्हणुन श्री. नरेन्द्र मेहता व उपमहापो॑र श्री. स्टिवन मेंडोसा हे निवडून आले असुन स्थायी समिती श्री. मारस रौड्रीक्स हे आहेत.

तसेच महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासुन महानगरपालिकेचे पहिले आयुक्त श्री. शिवमुर्ती नाईक यांनी कामकाज पाहिले असुन त्यानंतर अनुक्रमे श्री. रा.द.शिंदे, श्री. सुदामराव च. गायकवाड व सद्यस्थितीत श्री. राजीव आर. जाधव हे आयुक्त आहेत.

या महानगरपालिकेत शहरातील नागरीकांना तातडीने सेवासुविधा उपलब्ध होण्याच्या द्रुष्टीने नागरी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले.जन्म म्रुत्यु, कर विभाग, पाणि पुरवठा विभाग यांचे कामकाज संपूर्ण संगणकावर होत असुन अन्य काही विभागीय कार्यालयेसुद्धा या संगणक प्रणालीला जोडून संपूर्ण संगणकियकरण करावयाचे आहे. त्याचप्रमाणे नागरीकांचा जाहिरनामा महानगरपालिकेने प्रसिद्ध केल्यामुळे प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख होवून नागरीकांना सेवा, सुविधा, सोई त्वरेने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

महानगरपालिकेने नागरीकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करुन देत असताना त्यात प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते याचा विकास करून दळणवळणाची सुद्धा उत्तम सोय ठेवण्यात आली आहे. तसेच रस्त्यांची नियमित देखभाल, दुरुस्ती व विकास करण्याबरोबरच शहरातील पावसाळी पाणी व सांडपाणी य़ांचा निचरा सुस्थितीत होण्याचे द्रुष्टी मोठे नाले, गटारे यांची साफसफाई ठेवून शहर विकासात त्यामुळे भर पडत आहे.

त्याचबरोबर शहरात ३१ बगीचे, १३ स्मशानभुमी विकसीत करण्यात आलेली असुन भाईंदर (पूर्व), (पश्चिम) व मिरारोड येथे अध्यावत वाचनालय सुद्धा नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असुन वाचनालयात विविध प्रकारची व माध्यमाची भाषा निहाय पुस्तके, मासिके, ग्रंथ इ. उपलब्ध असुन नागरीक त्याचा लाभ घेत आहेत. अशाप्रकारच्या नागरीकांना सेवा सवलती देण्यासाठी पैशांची आवश्यकता ही पर्यायाने येतेच, त्याकरीता उत्पन्नाचे प्रामुख्य स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर, जकात कर, पाणी पट्टी कर, बाजार, जाहिरात, पे आणि पार्क, विकास आकर याद्वारे मिळत असून यामध्ये मालमत्ता कर व जकात करात वाढ होत आहे.


शेवटचा बदल : 14-09-2016