मिरा भाईंदर महानगरपालिका
परवाना विभाग

विभाग प्रमुख श्री. प्रभाकर म्हात्रे
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 7777019516  
ई- मेल licence@mbmc.gov.in 
 

        मिरा भाईंदर महानगरपालिका दि.२८ फेब्रुवारी २००२ रोजी स्थापन झाली असून महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारचे व्यवसाय उद्योगधंदे सुरु आहेत. या आस्थापनांना मुबंई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे .....

कलम ३१३ – आयुक्तांच्या परवानगीशिवाय कारखाना इत्यादी नव्याने स्थापन करता कामा नये.
कलम ३७६ – लायसन्सशिवाय विवक्षीत गोष्टी न ठेवणे व विवक्षीत व्यवसाय व कामे करणे.
कलम ३८६ – लायसन्स व लेखी परवाने देणे, निलंबीत करणे, रद्द करणे आणि फी बसविणे.

        यानुसार महानगरपालिका क्षेत्रात व्यवसायाकरीता परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रातील विविध व्यवसाय उद्योगधंदे यांना अधिनियम व पारित ठरावानुसार परवाना वितरीत केला जातो. उपरोक्त परवान्यामुळे महानगरपालिकेस वार्षिक महसुल मिळतो. तसेच शहरातील आस्थपनांबाबत तपशिल उपलब्ध होऊन महानगरपालिकेस नविन धोरण राबविणेस मदत होते.

        परवाना देणेचे महानगरपालिकेचे धोरण सुलभ आहे. कमीत कमी आवश्यक कागदपत्रांच्या आधारे परवाने देण्यांत येतात. विशेषत: परवान्याचे दरही फार कमी आहेत. यामुळे परवाना घेणे हे फार जिकरीचे होत नाही. तसेच फार कमी वेळेत परवाना उपलब्ध करुन देण्यात येतो.

        परवाना प्राप्त केल्यामुळे आस्थापनाधारक परवानाधारक म्हणून गणला जातो. महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने या परवान्यास विशेष महत्त्व आहे. शासनाच्या अनेक परवानग्या या महानगरपालिकेच्या परवान्याशी निगडीत आहेत. अशाप्रकारे महानगरपालिकेचा परवानाधारक ही ओळख आस्थापनाधारकास फार मोठ्या प्रमाणात मदत करते. सबब प्रत्येक आस्थापनाधारक परवानाधारक करणेचे महानगरपालिकेचे ध्येय आहे.

विभागाची कामे

अनु क्र. अधिकारी / कर्मचा-यांचे नाव पदनाम सोपविण्यात आलेले काम
१. श्री. विजयकुमार म्हसाळ उप-आयुक्त (परवाना)
 1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३१३, ३७६, ३८६ नुसार परवाना / परवानगी विषयी कामकाज करणे.
 2. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार गटई स्टॉल / आरे सरीता / टेलिफोन बुथ धारकाना अर्जानुसार परवाना देणे.
 3. परवाना विभागास नेमून दिलेल्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे.
 4. परवाना विभागाच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
 5. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये परवाना विभागाचे प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज करणे.
 6. मा. आयुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे.
२. सौ. स्वाती देशपांडे सहा-आयुक्त (परवाना)
 1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३१३, ३७६, ३८६ नुसार परवाना / परवानगी विषयी कामकाज करणे.
 2. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार - गटई स्टॉल / आरे सरीता / टेलिफोन बुथ धारकाना अर्जानुसार परवाना देणे.
 3. शहरातील“बिगर निवासी” आस्थापनांनी महानगरपालिकेचा (कायद्यानुसार बंधनकारक असलेला) परवाना घेणे कामी प्रवृत्त करणे व त्याप्रमाणे कार्यवाही करणे.
 4. नागरिकांच्या माहितीचा अधिकार, जनता दरबार, लोकशाही दिनातील अर्जांना उत्तरे पाठविणे बाबतची कार्यवाही करणे.
 5. शहरातील विना परवाना आस्थापनांवर नोटीस बजावण्याची कार्यवाही करुन घेणे.
 6. विना परवाना आस्थापनांवर नोटीस बजावूनही त्यांनी परवाना घेतला नसल्यास त्यांच्यावर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४२७ नुसार कारवाई करणे.
 7. परवाना विभागाच्या कामकाजावर व कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे.
 8. मा. आयुक्त व मा. उप-आयुक्त यांचेकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या आदेश / सूचनांप्रमाणे कार्यवाही करुन घेणे.
 9. परवाना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा मंजूर करणेबाबत अभिप्राय देणे.
 10. परवाना विभागातील अधिकारी यांचे गोपनिय अहवालावर प्रतिवेदन करणे.
 11. परवाना विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाजाबाबत नियंत्रण ठेवणे.
३. सौ. वैशाली पाटील वरिष्ठ लिपिक
 1. शहरातील विना परवाना आस्थापनांना नोटीस तयार करणे, नागरिकांच्या परवाना मिळण्याकरीता व अन्य अर्जावर सहा-आयुक्त, परवाना विभाग यांचेकडून प्राप्त झालेल्या सुचना / आदेश नुसार कार्यवाही करणे.
 2. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील बिगर निवासी व्यवसायधारकांना नोटीसा बजावणे
 3. विभागाचे कार्यालयीन कामकाज पाहणे.
 4. नागरिकांच्या माहितीचा अधिकार, जनता दरबार, लोकशाही दिनातील अर्जांना उत्तरे पाठविणे बाबतची कार्यवाही करणे.
 5. मागणी रजिस्टर अद्ययावत करणे.
 6. परवाना विभागाचे सहा. जन माहिती अधिकारी म्हणून काम पाहणे.
 7. वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.
४. श्री. शाम इंगोले लिपिक
 1. विभागाचे कार्यालयीन दैनंदिन पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे.
 2. शहरातील विना परवाना आस्थापनांना नोटीस तयार करणे, नागरिकांच्या परवाना मिळण्याकरीता व अन्य अर्जावर सहा-आयुक्त, परवाना विभाग यांचेकडून प्राप्त झालेल्या सुचना / आदेश नुसार कार्यवाही करणे.
 3. गटई काम / आरे सरीता / टेलिफोन बुथच्या परवान्याकरीता प्राप्त झालेल्या अर्जानुसार स्टॅालच्या परवान्याबाबत कार्यवाही करणे.
 4. सहा-आयुक्त, परवाना विभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना / आदेश नुसार कार्यालयीन कामकाज करणे.
 5. प्राप्त झालेल्या अर्जाची छानणी करुन आवश्यक ती कागदपत्रे नसल्यास त्या अर्जदारास त्याप्रमाणे कळविणे.
 6. वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.
५. सौ. प्राची म. मुकणे लिपिक / बालवाडी शिक्षिका
 1. दैनंदिन नागरीकांच्या पत्रांची / अर्जांची आवक – जावक मध्ये नोंदी घेणे.
 2. किरकोळ पावत्या फाडणे व पोटकिर्द लिहीणे.
 3. वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.

६. श्री. जेम्स कोरिया शिपाई
 1. कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे.
 2. कार्यालयीन पत्रव्यवहार, नस्ती सुस्थितीत ठेवणे.
 3. वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे.

विभागातील सदस्यांची यादी

अनु क्र. अधिकारी / कर्मचा-यांचे नाव पदनाम संपर्क क्र.
१. श्री. विजयकुमार म्हसाळ उप-आयुक्त (परवाना) ८३८०८००८८८
२. सौ. स्वाती देशपांडे सहा-आयुक्त (परवाना) ८४२२८११५०९
३. सौ. वैशाली पाटील वरिष्ठ लिपिक ८३७८०४३५३१
४. श्री. शाम इंगोले लिपिक ८४२२८११३६१
५. सौ. प्राची म. मुकणे लिपिक / बालवाडी शिक्षिका ८४२४००२७५६
६. श्री. जेम्स कोरिया शिपाई ९८३३१७९३९६

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील परवाना विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयातील

अधिका-यांची यादी

अ.क्र. अधिकार पद अधिकारी नाव वर्ग नोकरीवर रुजु झाल्याचा दिनांक संपर्कासाठी दुरध्वनी क्र.
१. सहा-आयुक्त सौ. स्वाती देशपांडे १२/१२/२०१४ ८४२२८११५०९

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील परवाना विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयातील

कर्मचा-यांची यादी

अ.क्र. अधिकार पद अधिकारी नाव वर्ग नोकरीवर रुजु झाल्याचा दिनांक संपर्कासाठी दुरध्वनी क्र.
१. वरिष्ठ लिपिक श्रीम. वैशाली पाटील १५/१२/१९९० ८३७८०४३५३१

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील परवाना विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयातील

अधिका-यांची व कर्मचा-यांचे पगार व भत्ते

अ.क्र. नाव अधिकार पद मुळ पगार महागाई भत्ता घरभाडे पत्ता विशेष शहर भत्ता विशेष भत्ता, प्रवास भत्ता व प्रकल्प भत्ता एकूण रक्कम
१. सौ. स्वाती देशपांडे सहा-आयुक्त १७,७६०/- २०,०६९/- ५,३२८/- ३००/- ४००/- ३६,६३०/-

दरपत्रके

परवाना यादी

 


शेवटचा बदल : 04-10-2019