मिरा भाईंदर महानगरपालिका
जन संपर्क

विभाग प्रमुख श्री. स्वप्नील सावंत
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक 28042223 / 8422811401
ई- मेल pro@mbmc.gov.in

         मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर (प.) येथील मुख्य कार्यालयात, पहिल्या मजल्यावरजनसंपर्क विभाग कार्यरत आहे. सदरहु विभागामार्फत, महानगरपालिकेच्या प्रशासकीयकामकाजाच्या मुख्य कार्यासंबंधीची माहिती प्रेसनोट द्वारे वेळोवेळी प्रसिध्दकरण्यात येते. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्याविभागामार्फत प्राप्त होणाऱ्या विविधविकासकामाच्या जाहीर निविदा सुचनातसेच जाहीर निवेदन शासकीयनियमानुसार वृत्तपत्रात प्रसिध्दकेलेजाते.

कार्याचे स्वरुप

         महानगरपालिकेचे विविध विभागातील मुख्य कार्य संबंधीची प्रेस नोट प्रसिध्द करणे. तसेच महानगरपालिकेच्या निरनिराळया विभागातील कामांच्या निविदा सूचना तसेच जाहिर निवेदन वर्तमानपत्रात शासकीय नियमांनुसार प्रसिध्द करणे. त्याचप्रमाणे वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेल्या जाहिर निविदा सूचना अथवा जाहिर निवेदनांचे शासकीय नियमांनुसार देयके प्रदान करण्यांची कार्यवाही करणे.

        मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध कामांच्या जाहिर निविदा सूचना तसेच जाहिर निवेदन वर्तमानपत्रांत प्रसिध्द करणेचे कामकाज हे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 469,470 अन्वये तसेच, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. पी.यु.बी.1000/प्र.क्र. 73/2000/34 दि. 1 मे 2001 अन्वये करण्यांत येते.

प्लास्टिक पिशवी आणि थर्माकॉल मुक्त मीरा भाईंदर महानगरपालिका


शेवटचा बदल : 04-10-2019