मिरा भाईंदर महानगरपालिका
वैद्यकीय आरोग्य विभाग

विभाग प्रमुख डॉ प्रमोद  पडवळ                 
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक  ८४२२८११२३६ विस्तार क्र. 118
ई- मेल rch@mbmc.gov.in /moh@mbmc.gov.in / rntcp@mbmc.gov.in

बाहय लसीकरण सत्र नियोजन महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदेशीत करण्याबाबत

नियमित लसीकरण सत्र नियोजन Ideal park

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Bandarwadi

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Bhayandar (W)

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता ganeshedeval

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Kashigaon

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Mira road

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Navghar

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Penkar pada

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Uttan

नियमित लसीकरण सत्र-नियोजन तक्ता Vinayak Nagar

आरोग्य विभाग यादी

मिरा भाईदर महानगरपलिकेचे वैद्यकीय आरोग्य विभागाकडे महपलिका क्षेत्रातील नागरिकांसाठी वेगवेळया प्रकारच्या आरोग्य विषयक सुविधा देत आहे. यामध्ये सामाजिक व रोगप्रतिबंधक विषयक सुविधांचा समावेश आहे.

विभागाची कामे 

 • महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयाच्या माध्यमातुन आरोग्य सेवा पूरविल्या जातात.
 • बालकांचे नियमित लसीकरण (सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम)
 • राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मुलन कार्यक्रम
 • सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP)
 • राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
 • राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
 • सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम यशस्वीपणे राबविणे.
 • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करणे.
 • महाराष्ट्र शासनाचे माता व बाल प्रजनन (आरसीएच) कार्यक्रम राबविणे.
 • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) महानगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येत आहे.
 • महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत 9 आरोग्य केंद्रे, 2 उपकेंद्र व 2 रुग्णालयांमार्फत सामाजिक व आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जातात.
 • रुग्णालयाच्या प्रसुतिगृहांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच बालरोग तज्ज्ञांमार्फत स्वाभाविक व गरज पडल्यास शस्त्रक्रियेद्वारे प्रसुति केल्या जातात.
 • वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आरसीएच प्रकल्प टप्पा – 2 व पीसी – पीएनडीटी कार्यक्रमाद्वांरे माता व बाल संगोपन विषयक सेवा पुरविल्या जात आहेत. “मुलगी वाचचा देश वाचवा” हे ठळक वैशिष्ट.
 • 1 / 2 मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याऱ्या जोडप्यांच्या मुलींच्या नावे बचत प्रमाणपत्र देण्यात येत आहेत.

विभागातील सदस्यांची नावे

अ . क्रं अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पद संपर्क
 १ डॉ. प्रकाश जाधव वैद्यकीय आरोग्य अधिकारी 8422811483
 २ डॉ. प्रमोद पडवळ शहर क्षयरोग अधिकारी 8422811236
 ३ डॉ. अंजली पाटील आर.सी.एच. ऑफीसर 8422811235
 ४ डॉ. चंद्रशेखर कांबळे नोडल ऑफीसर (साथरोग) 8422811239
 ५ डॉ. अदविंद काकडे नोडल ऑफीसर (PCPNDT) 8422811232

उपक्रम / योजना

 • बाह्यरूग्ण सेवा :- सकाळी 09:00 ते 01:00, केस पेपर शुल्क रू. 5/-. बाह्यरुग्ण – 1,76,693
 • जेष्ठ नागरिकांना सर्व औषधोपचार मोफत देण्यात येतात.
 • श्वानदंशावरील इंजेक्शन शुल्क रू. 50/- प्रति इंजेक्शन
 • नियमित लसीकरण :- या कार्यक्रमात गरोदर माता, 0 ते 16 वयोगटातील लाभार्थी यांना आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य संस्थेत तसेच कार्यक्षेत्रात प्रसविकांमार्फत मोफत लसीकरण करण्यात येते.
 • जननी सुरक्षा योजना :- या योजने अंतर्गत दारिद्रय रेषेखालील तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील गरोदर स्त्रीयांना संस्थेत (दवाखान्यात) प्रसुति झाल्यानंतर रु. 600/- अनुदान देण्यात येते. घरी प्रसुती होणाऱ्या मातांना रु. 500/- अनुदान देण्यात येते. तसेच खाजगी नामांकीत रूग्णालयात सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यास रु. 1500/- अनुदान देण्यात येते.
 • जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम :- मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय येथे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येतो. सदर योजनेमध्ये स्त्री गरोदर राहिल्यापासून तिची प्रसुति होईपर्यंत प्रसुतिच्या निगडीत सर्व तपासण्या व उपचार मोफत दिले जातात. प्रसुति मोफत केली जाते. सिझेरियन शस्त्रक्रिया ही मोफत केली जाते. तसेच महानगरपालिकेच्या दवाखान्यातून गरोदर मातेस इतर रुग्णालयात संदर्भित करण्याकरिता वाहन व्यवस्था केली जाते. जन्मापासुन ते 1 वर्षा पर्यंत नवजात शिशूलाही मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात येतो. तसेच गंभीर आजारी बालकांना संदर्भित करण्याकरिता वाहन व्यवस्था करण्यात येते. तसेच प्रसतीनंतर मातेला रुग्णालयात असे पर्यंत मोफत आहार पुरविण्याबाबतची सोय लवकरच उपलब्ध केली जाईल.
 • युरीन प्रेग्नन्सी टेस्ट मोफत
 • मलेरिया रक्ततपासणी व औषधोपचार
 • पल्स पोलिओ मोहिम :- पल्स पोलिओ मोहिमेत 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओची लस पाजण्यात येते. सदर कार्यक्रम एकुण 6 दिवस राबविण्यात येतो. शासनाने नेमून दिलेल्या तारखांना सदर कार्यक्रम राबविण्यात येतो.
 • मनपा शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम (RBSK)
 • जंतनाशक औषधी व जीवनसत्व ‘अ’ वाटप मोहिम :- या कार्यक्रमा अंतर्गत कार्यक्षेत्रातील 1 ते 6 वयोगटातील बालकांना पहिल्या महिन्यात जंतनाशक औषधी व दुसऱ्या महिन्यात जीवनसत्व ‘अ’ औषधी पाजण्यात येते. सदर मोहीम शासनाच्या आदेशानुसार राबविण्यात येते.
 • कुटुंब कल्याण कार्यक्रम :- या कार्यक्रमात आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत जननक्षम जोडप्यांना कुटुंब नियोजनाच्या तात्पुरत्या व कायमच्या पध्दतींबाबत माहिती देऊन त्या वापरण्यासाठी प्रवृत्त करण्यात येते. महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.
 • सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना :- सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना ही दि. 01 एप्रिल 2007 पासून फक्त दारिद्ररेषेखाली असलेल्या कुटुंबातील लाभार्थ्यांना देय असून, एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीस रु. 2,000/- रोख व मुलीच्या नावाने रु. 8,000/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या रुपात देण्यात येतात. तसेच दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्यास शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीस रु. 2,000/- रोख व प्रत्येक मुलीच्या नावे रु. 4,000/- या प्रमाणे रु. 8,000/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या रुपात देण्यात येतात.
 • दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांच्या मुलींना आर्थिक मदत देण्याची योजना :-

  महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व दोन मुलींवर अथवा एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या जोडप्यांच्या मुलींना आर्थिक मदत दिली जाते. त्या अंतर्गत एक मुलगी असल्यास तिच्या नावे रु. 20,000/- 18 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात बँकेत ठेवले जातात. दोन मुली असल्यास प्रत्येकीच्या नावे रु. 10,000/- ठेवले जातात.

  सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील कागदपत्रे व महापालिकेच्या विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. विहीत नमुना अर्ज सर्व आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहे. अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे :

  1. शिधापत्रिका
  2. पॅन कार्ड (दोघांचेही)
  3. मुलींचे जन्म प्रमाणपत्र
  4. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबाबतचा वैद्यकीय दाखला व रुग्णालयीन कागदपत्रे
  5. रु. 100 च्या स्टँप पेपरवर विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (ऍफीडेव्हीट)
  6. मुलीचे व पालकाचे Joint Account (State Bank of India)

   

 • सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (संपूर्ण औषधोपचार) :- मोफत
 • राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
 • एचआयव्ही रक्तपासणी व समुपदेशन

वैद्यकीय आरोग्य विभात नागरीकाकरीता तीन स्तरामध्ये आरोग्य सेवा पुरवितात.

माता बाल संगोपन केंद्र (भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय)

»  पहिला स्तर

     9 आरोग्य केंद्र, 2 उपकेंद्र

»  दुसरा स्तर

      माता बाल संगोपन केंद्र
(भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय)

»  तिसरा स्तर

      सर्व साधारण रुग्णालय
(भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुगणालय)

सर्व साधारण रुग्णालय (भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुगणालय)

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम

 • आरसीएच कार्यक्रम
 • माता आरोग्य कार्यक्रम
 • जननी सुरक्षा योजना
 • जननी शिशू सूरक्षा कार्यक्रम
 • प्रसुतीपूर्व सेवा (ANC)
 • प्रसूतीपश्चात सेवा (PNC)
 • कुंटूब नियोजन कार्यक्रम
 • माता मृत्यु अन्वेषन
 • पीसीपीएनडीटी
 • प्रधान मंत्री सुधारीत मातृत्व अभियान (PMSMA)
 • बालआरोग्य लसीकरण कार्यक्रम नवजात बालके काळजी आर.सी.एच पोर्टल (RCH) राष्ट्रीय बाल सूरक्षा कार्यक्रम (RBSK) कीशोरवयीन मूले, प्रजनन व लैंगीक आरोग्य
 • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान
 • सूधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) क्षयरोग रूग्ण शोधणे निक्षय डेटा ऐन्ट्री
 • राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम (NLEP)
 • राष्ट्रीय जनजन्य व किटकजन्य नियंत्रण कार्यक्रम (NV BDCP)
 • सर्व्हेक्षण ऍक्टीव्ह सर्व्हेक्षण
 • प्रयोगशाळा – तपासणी
 • पर्यवेक्षण व पडताळणी
 • प्रशिक्षण
 • राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम
 • एड्स नियंत्रण कार्यक्रम
 • गर्भपात केंद्र नोंदणी
 • जन्म आणि मृत्यु नोंदणी
 • खाजगी रुग्णालये, दवाखाने नोंदणी,( Bombay Nursing Home Act 1949)
 • आरोग्य शिक्षण व प्रसिधा (IEC Activity)

 

Pradhan Mantri Maatru Vandana Yojana

उतरंड

 


शेवटचा बदल : 22-06-2020