मिरा भाईंदर महानगरपालिका
उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग

विभाग प्रमुख श्रीमहेश  वरुडकर   
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक  ८०९७९६२००० 
प्रभाग समिती क्र. १,२,३ व ४
उद्यान अधिक्षक श्री. नागेश विरकर 
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक -०२२-२८१८४५५३ / ८४२२८११४२२ 
ई- मेल garden@mbmc.gov.in
प्रभाग समिती क्र. ५ व ६
उद्यान अधिक्षक श्री. हंसराज मेश्राम
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक -०२२-२८१०३४०९ / ८४२२८११३०५
ई- मेल garden@mbmc.gov.in

 

  1. मिरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना २८/२/२००२ रोजी झाली व महानगरपालिकेची वृक्षप्राधिकरण समिती दि. १९/६/२००३ पासुन अस्तिवात असुन या समितीचे अध्यक्ष मा. आयुक्त सो. असतात. महानगरपालिकेच्या संपुर्ण क्षेत्रात (या शहरात) वृक्षारोपण जोमात करुन मिरा-भाईंदर हरित करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असुन मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड केलेली आहे. शहरात लागवड केलेले मागील वृक्ष पाहता एकुण सुमारे २ लाख इतकी वृक्ष संख्या होती. नविन विकसीत केलेले रस्ते यांच्यावर लागवड करण्यात येते व खाजगी गृह निर्माण संस्था / महिला मंडळे / शाळांच्या आवारात नविन विकसीत केलेली स्मशाने / स्वयंसेवी संस्था यांनी या विभागातुन माफक दरात निरनिराळी वृक्ष घेऊन वृक्ष लागवड करुन संपुर्ण शहर हरीत बनविण्यास मदत केली आहे.
  2. मिरा भाईंदर महानगरपालिका प्रतीवर्षी ५ जुन ’जागतीक पर्यावरण दिन’ व १६ जुन ’वटवृक्ष दिन’ साजरा करतात. आज भारतात एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त असणे आवश्यक आहे. पण सद्य स्थितीत आज फक्त २० टक्के जंगलव्याप्त क्षेत्र आहे. तसेच ज्याला जंगल असे बोलले जाते ते क्षेत्र फक्त १५ टक्के आहे. आज जागतीक पातळीवर पर्यावरणाच्या अनुषंगाने अत्यंत गांभिर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण जागतीक तापमान वाढ, विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती या जागतीक पातळीवर पर्यावरणाचा समतोल ढासळ्ण्याचा परिपाक आहे. जागतीक पातळीचा ५ जुन हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचा समतोल साधण्याचा अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोस्टर स्पर्धा, वृक्षदिंडी, वृक्षारोपण इ. उपक्र्म राबविण्यात येत आहेत. जगामध्ये प्रदुषणामुळे होणार्‍या अनेक समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे पर्यावरणातील जास्तीत जास्त वृक्ष लागवड होतील या दृष्टीने उद्यान विभाग मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे.
  3. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे विकसीत व विकासाभिमुख क्षेत्र सुमारे २५ टक्के आहे. त्या व्यतिरिक्त डोंगर, दर्‍या व ना विकास पट्टा शेतीवाडीचा फार मोठा भाग महानगरपालिकेसाठी उपलब्ध आहे. म्ह्णून हरीत भाईंदर ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न उद्यान व वृक्षप्राधिकर विभागामार्फत केला जात आहे. दि. १९/०३/२००३ रोजी महानगरपालिकेची पहिली वृक्षप्राधिकरण समिती गठीत करण्यात आली आहे.
  4. पुनमसागर मिरारोड पुर्व येथे मनपाची स्वतःची नर्सरी तयार करण्यात आली असुन त्यात विविध जातीतील वृक्षांच्या बियाणांपासुन रोपे तयार केलेली आहेत व सदरची रोपटी शहरातील नागरीकांना, संस्थांना त्यांचे मागणीनुसार पावसाळ्यामध्ये प्रती रोप रु. ५/- या दराने दिले जाते. विशेष म्हणजे पवित्र तुळशीची रोपटी तयार करुन महानगरपालीकेच्या सर्व शाळांतील मुला-मुलींना तुळशीचे महत्व पटवून देऊन प्रत्येकांचे घरी तुळशी लागवड करणेसाठी मोफत वाटप केलेले असुन त्यास शहरातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. अशा महिला मंडळाना त्यांच्या मागणीनुसार तुळशीचे रोपे पुरवठा केल्याने महिलांनी या विभागाची प्रशंसा केली आहे.
  5. प्रदुषणमुक्त शहर ठेवण्याच्या दृष्टीकोनातून तसेच पर्यावरण वाढ होऊन शहर प्रदुषणमुक्त होणेसाठी वृक्षतोडीवर कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण जतन अधिनियम १९७५ चे प्रकरण ८ कलम २१ (१) अन्वये फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ अन्वये २४ गुन्हे (एफ.आय.आर.) या विभागाकडून गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण नगण्य आहेत.                                                                        आपले मिरा – भाईंदर हे शहर हरित व सुंदर रहावे याकरिता या विभागाकडून सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या, स्मशाने व दुभाजक सुशोभिकरण केलेले असुन (पान-फुलांनी नटवलेली आहेत) त्यांची योग्य ती निगा औषध फवारणी, साफ-सफाई, पाणी मारणे, झाडांची कटींग करणे अशा प्रकारची कामे या विभागाकडून वेळीच व्हावी. म्हणून सकाळी ७.३० ते ३.३० वाजता व दुपारी ३.३० ते १०.३० या वेळेत कर्मचार्‍यांची नेमणूक केलेली आहे.                                            मिरा भाईंदर महानगरपालिका वृक्षप्राधिकरण विभागामार्फत वृक्षलागवडी बरोबरच कोणत्याही परिस्थितीत वृक्ष तोड होऊ नये याकडे जातीने लक्ष पुरविले जात आहे. या शहरात एकुण ३३ उद्याने, ०६ स्मशाने, ०६ मैदाने व अंदाजित २२ किमीचे दुभाजकाचे सुशोभिकरण करुन मैदानाचा उपयोग प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, इत्यादीच्या शालेय स्पर्धा, क्लब, शहराबाहेरील व शहरांतील क्रिकेटक्लब व क्रिकेटर घेत आहेत. या कामी या विभागामार्फत नित्यांने/नियमित/चोख अशी देखभाल, निगा राखण्यासाठी योग्य उपोययोजना महानगरपालिकेने ठेवलेली आहे.
  6. नागरीकांच्या मनोरंजनाकरिता सायं ४.०० ते ८.०० या वेळेत खुली ठेवण्यात येतात.
  7. मॉर्निंग वॉककरिता सकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत खुली ठेवण्यात येतात.
  8. उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याकरिता आत्याधुनिक खेळणी बसविण्यात आलेली आहेत.
  9. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात फुले, फळे, औषधी वनस्पती यांचे भव्य  प्रदर्शन भरविण्यात येते.

विभागातील अधिकारी/कर्मचा-यांची यादी( प्रभाग समिती क्र. १,२,३ व ४ ) 

अ.क्र. नाव पद संपर्क
श्री. दिपक खांबित कार्यकारी अभियंता ८४२२८११३४०
श्री. नागेश विरकर उद्यान अधिक्षक ८४२२८११४२२
श्री. गणेश गोडगे लिपीक ९९६७७०७०२७

विभागातील अधिकारी/कर्मचा-यांची यादी( प्रभाग समिती क्र. ५ व ६ ) 

अ.क्र. नाव पद संपर्क
श्री. दिपक खांबित कार्यकारी अभियंता ८४२२८११३४०
श्री. हंसराज मेश्राम उद्यान अधिक्षक ८४२२८११३०५
श्री. लहु चौधरी वरीष्ठ लिपीक ९९३०५०५००८
श्री. रणजित भामरे लिपीक ७२०८०३५४३८
श्री. योगेश म्हात्रे लिपीक ९८३३७१२३३४

 पब्लिक नोटीस

01

Press Note (7)

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड


शेवटचा बदल : 04-06-2020