मिरा भाईंदर महानगरपालिका
सामान्य प्रशासन व आस्थापना विभाग

सामान्य प्रशासन विभाग

विभाग प्रमुख श्रीनरेंद्र पाटील
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ८४२२८११३५५
ई- मेल gad@mbmc.gov.in

महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग हा शासन आणि प्रशासन मधील दुवा आहे. शासनाकडून विविध GR पारीत होऊन महानगरपालिकेकडे कार्यवाहीकरिता पाठविले जातात. सदर सर्व GR परिपत्रकांची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी संबधित विभागात आदेशित करुन कार्यवाही करुन घेतली जाते. शासनाकडील महत्वाच्या राष्ट्रीय कामामध्ये आर्थिक गणना कार्यवाही प्रभावीपणे होणेकरिता (सा.प्र.) विभागाकडून कार्यवाही प्रस्थापित केली जाते. तसेच मा. आयुक्त, उपआयुक्त (मु.) यांचेकडील आदेशांची अमंलबजावणी संबधित विभागाकडून करण्याबाबतची कार्यवाही केली जाते. लोकशाही दिनी नागरिकांच्या प्राप्त तक्रारीवर प्रभावीपणे कार्यवाही करणे करिता संबधित विभागाकडून कार्यपूर्तीचा अहवाल प्राप्त केला जातो. राष्ट्रीय सण साजरा करण्याचा सदरची कार्यवाही सा प्र विभागाकडून केली जाते. माहिती अधिकारातील व्दितीय अपिले याबाबतची कार्यवाही संबधित विभागांना पत्रे देऊन केली जाते. कर्मचाऱ्यांच्या मेडीक्लेम बाबतची कार्यवाही सामान्य प्रशासनतर्फे केली जाते.

विभागाची कामे :

प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षण करणे. अधिकारी कर्मचारी यांचे आस्थापना विषयक सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे. कोकण विभागीय आयुक्त यांचेकडील लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे.

माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्राप्त झालेल्या अर्जावर विहित मुदतीत कार्यवाही करणे. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांना विहित मुदतीत उत्तर देणे. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांबाबत सर्व विभागाचा आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुख यांना कार्यवाही बाबत पत्र व्यवहार करणे. माहितीच्या अधिकारासंदर्भात जिल्हा लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय ग्रुप विमा योजनेबाबतची कार्यवाही करणे. सामान्य प्रशासन विभागाकडील निविदाबाबतची कार्यवाही करणे. सामान्य प्रशासन विभागाकडील अर्थसंकल्पाबाबत कार्यवाही करणे व लेखापरिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. विभागानूसार जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करणे वार्षिक प्रशासन अहवाल बाबत कार्यवाही करणे. आर्थिक गणनेचे काम पाहणे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या राष्ट्रीय सणांचे ध्वजरोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे व अधिकारी / कर्मचाऱ्यांना सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या बाबत मा. उपायुक्त (मु.) यांच्या मंजूरीने आदेश देणे. सहा. आयुक्त यांच्याकडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे. मा. उपायुक्त, (मु.), सहा. आयुक्त (सा.प्र.) यांनी वेळोवेळी सोपवलेली कामे करणे आर्थिक गणनेचे काम पाहणे.

महानगरपालिका लोकशाही दिनी प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी देऊन कार्यवाही बाबतची गोषवारा तयार करणे व लोकशाही दिनी मा. आयुक्त सो. / उपायुक्त (मु.) यांना सादर करणे. माहितीच्या अधिकारासंदर्भात प्रत्येक महिन्याच्या जिल्हा लोकशाही दिनाच्या आढावा बैठकीकरिता सर्व विभागाची नमुना प्र-पत्रामध्ये माहिती संकलीत करून बैठकी करिता गोषवारा तयार करणे. माहितीच्या अधिकारातील प्र-पत्राबाबत वार्षिक अहवाल शासनास पाठविणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. लेखापरिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे. सहा. आयुक्त, (सा.प्र.) यांचे कडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

दैनंदिन पत्रव्यवहार आवक नोंदीनूसार संबंधित विभागास देणे. आवक-जावक रजिस्टर अद्यावत ठेवणे. माहिती अधिकार खालील प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागास कार्यवाहीसाठी देणे. माहितीच्या अधिकाराचे नोंदणी आवक रजिस्टर अद्यावत ठेवणे. कार्यालयीन आदेश / परिपत्रक, शासन निर्णयची नस्ती अद्यावत ठेवणे. सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित शासकिय, महापौर, नगरसेवक, नागरीक यांच्या पत्रांना उत्तरे देणे. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

विभागीय कार्यालयांना नवीन दुरध्वनी देणे बाबत कार्यवाही करणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. पदाधिकारी / अधिकारी / कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या सीम बाबत कार्यवाही करणे. महानगर टोलिफोन निगम लि. यांचे देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.

विभागातील सदस्यांची यादी :

अ. क्रं. नाव पद
1 श्रीम.मृदुला लक्ष्मीकांत अंडे सहा. आयुक्त (सा.प्र.)
2 श्री.प्रकाश कुलकर्णी विभाग प्रमुख (सा.प्र.)
3 श्री. दशरथ हंडोरे व. लिपीक (सा.प्र.)
4 श्रीम. संध्या डुचे लिपीक (सा.प्र.)
5 श्री. किशोर गावडे लिपीक (सा.प्र.)
6 श्री. परशुराम सिंगाराम शिपाई (सा.प्र.)
7 श्री. संजय पाटील शिपाई (सा.प्र.)
8 कु. अक्षय म्हात्रे शिपाई (सा.प्र.)

आस्थापना विभाग

विभाग प्रमुख श्री.प्रकाश कुलकर्णी ( आस्थापना विभाग प्रमुख )
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ८४२२८११४५१
ई- मेल mbmcestablishment@gamil.com 

मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवर कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे, स्थायी/अस्थायी अधिकारी/कर्मचा-यांचे वेतन तयार करणे, सेवा विषयक प्रकरणे हाताळणे, शासनाच्या प्रचलित शासन निर्णय/परिपत्रके/अधिसूचना याची अंमलबजावणी करणे.

विभागाची कामे :

 1. म.ना.से. (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम १९८१ अन्वये सरळसेवा भरतीची कार्यवाही, पदांना शासन मान्यता मिळणेबाबत कार्यवाही, सेवा प्रवेश नियम तयार करणे. सेवापुस्तकामध्ये प्रथम नियुक्तीच्या नोंदी घेणे.
 2. शा.नि बीसीसी१०९७/प्र.क्र.६३/९७/१६ब, दि.१८/१०/१९९७ व शा.नि.बीसीसी-२०१५/प्र.क्र.१०२-ए/१५/१६ब, दि.१९/०१/ २०१६ अन्वये बिंदुनामावली अद्यावत ठेवणे.
 3. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम –क्लम ५१ (४) नुसार आकृतीबंध तयार करणे व त्यास शासन मान्यता घेणे.
 4. महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ अन्वये बदल्यांबाबतची कार्यवाही करणे.
 5. शासन परिपत्रक क्र. एसाअरव्ही-२१५/प्र.क्र.५६६/का-१२, दि.०८/०१/२०१६ अन्वये पदोन्न्तीबाबतची कार्यावाही करणे.
 6. म.ना.से.(पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतुन काढुन टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ अन्वये शिस्तभंग व विभागीय करणे. प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबतची कार्यवाही.
 7. म.ना.से.(शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ नुसार विभागीय चौकशीची कार्यवाही व नियम १० नुसार किरकोळ शिक्षेचे अधिकाराबाबत.
 8. म.ना.से.(रजा) नियम १९८१ अन्वये रजा मंजुरी.
 9. म.ना.से.(वेतन) नियम १९८१ अन्वये मा.आयुक्त/प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचा-यांचे स्वग्राम व रजाप्रवास सवलत देयके वेतननिश्चिती करणे.
 10. वेतनवाढ/प्रथम वेतनवाढ वेतनबन्ड्चा अंतिम ट्प्पा पारबाबत कार्यवाही वेतन संरक्षित करणे.
 11. म.ना.से.(निवृत्ती वेतन) १९८२ अन्वये सेवानिवृत/स्वेच्छा निवृत्त/कुंटुंब निवृत्ती/उपदान/अर्जित रजा रोखीकरण अंतिमीकरण व त्यासंबंधी प्रकरणे.
 12. राजीनामा दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या अर्जित रजा रोखीकरण प्रकरणे. 
 13. म.ना.से.(निवृत्तीवेतन अंशराशीकरण) नियम १९८४ अन्वये निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरणबाबत कार्यवाही करणे.
 14. महराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ५३ (३) अन्वये करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात नेमणुकीबाबतची कार्यवाही.
 15. केंद्र शासनाचा माहिती अधिकारी अधिनियम – २००५ अन्वये प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे.
 16. शासन निर्णय क्र.बी.जी.टी-१०००/प्र.क्र.५६/२०००/वित्तीय सुधारणा, दि.१०/०९/२००१ अन्वये अधिपत्याखालील अधिकारी/कर्मचारी यांचेकडुन अभिलेखांचे वर्गीकरण, जतन, नाशन व सहा गठ्ठे पध्दतीप्रमाणे अंमलबजावणी करणे.
 17. म.ना.से.(ज्येष्ठ्तेचे विनिमय) नियमावली १९८२ अन्वये सेवा ज्येष्ठता अंतिम यादी प्रसिध्द करणे.
 18. सा.प्र.वि.शा.नि.सी.एफ.आर१२१०/प्र.क्र.४७/२०१०/तेरा, दि.०१/११/२०११ गोपनीय अहवाल जतन करणे.
 19. वित्त विभाग, वेतन -११९९/प्र.क्र.२/९९/सेवा-३, दि.२०/०७/२०१३.
 20. वि.वि.वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि.०१/०४/२०१० अन्वये आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत. सा.प्र.वि.एसआरव्ही- १०९५/प्र.क्र.१/९१-१२, दि.०८/०६/१९९५.
 21. सा.प्र.वि.शा.नि.वशिअ/१२१४/प्र.क्र.५१(२)/११, दि.१७/११/२०१४ अन्वये मत्ता व दायित्व विषयक विवरणपत्रे जतन करणे.
 22. शासन निर्णय क्र.सकानि-२००७/प्र.क्र.१७६/२००७/नवि-६, दि.२२/१०/२००८ नुसार डॉ. बाबासाहेब आंबेड्कर, श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत ज्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्षे किंवा त्याहुन अधिक झाली आहे. अशा सफ़ाई कामगारांना सेवा निवृत्तीनंतर किंवा सफ़ाई कामगाराचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास अशा सफ़ाई कामगारांच्या निधनानंतर त्यांच्या पात्र वारसास मालकी तत्वावर मोफत सदनिका देण्याची कार्यवाही करणे.

सचिन संगित साळंके-वर्ग4 च्या कर्मचाऱ्यांबाबत.

माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती मिळवण्याच्या अर्जाचा नमुना.

माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार बजेट आणि कोणत्या कामासाठी खर्च केला त्याचा तपशील.

माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार बजेट आणि कोणत्या कामासाठी खर्च केला त्याचा तपशील (२०१८-१९)

KIRAN A.K.

सुरक्षा रक्षक तसेच वार्डेन ची माहिती बाबत 1

सुरक्षा रक्षक तसेच वार्डेन ची माहिती बाबत

माहिती अधिकार अधिनियम (RTI) :

 श्रीम. अन्नपुर्णा आवडेकर ( जन माहिती अधिकारी तथा आस्थापना अधीक्षक  ) -  भ्रमणध्वनी क्रमांक - ८४२२८११४५१

 श्री. अरुण धर्माधिकारी , ( सहाय्यक जन माहिती अधिकारी तथा वरिष्ठ लिपीक )

विभागातील सदस्यांची यादी :

अ. क्रं. नाव पद
1 श्री.प्रकाश कुलकर्णी आस्थापना अधीक्षक
2 श्री. सुर्यकांत दातीर  मुख्य लिपीक
3 श्री. अरुण धर्माधिकारी   वरिष्ठ लिपीक
4 श्रीम. माधुरी घेगडमल  वरिष्ठ लिपीक
5 श्रीम. अन्सेल्मा चिंचक   वरिष्ठ लिपीक
6 श्री. शरद जिरंगे  लिपीक
7 श्री. हेलन घोन्सालविस  लिपीक
8 श्री. सागर खामकर   लिपीक
9 श्री. रविन्द्र दरोडा  लिपीक
10 श्री. कल्पेश पाटील  लिपीक
11 श्री. मयुर पाटील  लिपीक
12 श्री. प्रकाश चौधरी  लिपीक
13 श्री. प्रविण तांडेल  लिपीक
14 श्री. विश्वनाथ डोके लिपीक
15 श्री. दिपक जाधव   लिपीक
16 श्रीम. दिपाली तेलगोटे  लिपीक
17 श्री. योगेश चौधरी  शिपाई
18 श्री. राजेंद्र देसले सफाई कामगार
19 श्री. सुब्रमण्यम तंगाबाबु   सफाई कामगार
20 श्रीम. आरती म्हात्रे  सफाई कामगार
21 श्री.मारुती सारंग  सफाई कामगार
22 श्री. मुत्तुपांडे पेरुमल   सफाई कामगार
23 श्री. हर्षद सोलंकी  शिपाई

परिपत्रक 2018

सेवा जेष्ठता यादी २०१८

वर्ग-1

वर्ग-2

वर्ग-3

वर्ग-4

दि.26-12-2018 रोजी सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे

परिपत्रक

 1. कर्मचाऱ्यांची बदली करण्या बाबद.
 2. कार्यालयीन आदेश २५/११/२०१६
 3. दि १४ एप्रिल २०१८ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्या बाबद.
 4. कार्यालयीन आदेश २५/११/२०१६
 5. कर्मचाऱ्यांची बदली 10/04/2018
 6. कर्मचाऱ्यांची बदली 10/04/2018
 7. मा.आयुक्त (कर) यांची दि.३१/०३/२०१८ रोजीची मान्यता
 8. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत कार्यशाळा आयोजित केलेबाबत
 9. कार्यालयीन आदेश
 10. सुरक्षा रक्षक व ट्राफीक वॉर्डन लेटर्स
 11. सुरक्षा रक्षक व ट्राफीक वॉर्डन लिस्ट
  सेवा रेकॉर्ड आणि सेवा ज्येष्ठता

निविदा (Tenders) :  

 1. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध मालमत्तेच्या संरक्षणार्थ ठेका पध्दतीने सुरक्षा रक्षक पुरवठा करणेबाबत .
 2. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागासाठी ठेका पध्दतीने संगणक चालक तथा लिपीक पुरवठा करणेबाबत.

केंद्र शासन माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (ॲक्ट नं.एलआयएक्स ऑफ 1949) नुसार कलम 72 सी (2) अन्वये प्रभाग अधिकारी, अभियंते, अतिक्रमण विभागप्रमुख, मा.आयुक्त, फायर ऑफिसर, चिफ फायर ऑफिसर यांच्या कर्तव्याबाबत

"बायोमेट्रिक पंचिंग मशीन नुसार कर्मचाऱ्यांचे  वेतन अदा करण्यात येईल.

"कार्यालयीन आदेश (Budget Control Register बाबद)

प्रशासकीय दृष्टिकोनातून कामकाजामध्ये सुसूत्रता येण्याच्या अनुषंगाने खालील नमुन्यात दर्शविल्या प्रमाणे कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येत आहे.

बडतर्फ कर्मचाऱ्यांची जाहिरात "वेब साईटवर " प्रसिद्ध करण्याबाबत

सतत गैरहजर कर्मचाऱ्यांबाबत जाहिरात "वेब साईटवर" प्रसिद्ध करण्याबाबत

सुट्टी यादी - 2016

वर्ग -०४ कर्मचा-यांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी (१० वी पास)

अर्ज पत्रक

शुध्दीपत्रक

वैद्यकिय आरोग्य सेवा व प्रशासकिय सेवा या संवर्गातील पदांवर मागासवर्गिय अनुशेष अंतर्गत उमेदवारांची निवड करण्यासाठी

आस्थापनेवर अग्निशमन विभागात खालील संवर्गातील पदांवर मागासवर्गिय अनुशेष अंतर्गत उमेदवारांची निवड करण्यासाठी

सेवानिवृत्त लेखाधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी सेवाकरार पद्धतीने उपलब्ध करून घेणेबाबत.

 निवडणूक कामकाज केलेले वर्ग -०१ व वर्ग-०२ संवर्गातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची ठोक मानधन तत्वावर सेवा उपलब्ध करून देणेबाबत

 निवडयादी ०८-१२-२०१६

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत ठोक मानधनावरील पदभरती

       भाग - १

       भाग - २

मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी /कर्मचाऱ्यांची विभागीय परीक्षा घेणेबाबत

४५ वर्ष पूर्ण न झालेले अधिकारी

दि.01-01-2018 रोजीच्या प्रारुप सेवा जेष्ठता यादीवर प्राप्त सुचना-हरकती

vaidyakiy vima yojanebabat


शेवटचा बदल : 17-01-2020