मिरा भाईंदर महानगरपालिका
शिक्षण विभाग
विभाग प्रमुख श्रीम.उर्मिला पारधे
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ०२२ - २८१४९०४२ / 8291001301
ई- मेल eduboard@mbmc.gov.in
कार्यालयाची वेळ सकाळी १०:०० ते ५:४५
साप्ताहिक सुट्टी आणि विशेष सेवांचा कालावधी दुसरा, चौथा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी

दि. २२-२-१९९४ रोजी जिल्हा परिषदेकडुन मिरा-भाईंदर नगरपालिकेकडे विविध माध्यमाच्या २८ शाळा (मराठी, हिंदी, उर्दु व गुजराती) इमारती व २०२ शिक्षकांसह हस्तांतरण झाल्या आहेत. त्यानंतर दि. २८-०२-२००२ साली मिरा माईंदर महानगरपालिकेचे रूपांतर झाले असुन दि. २१-०४-२००६ मध्ये शासन राजपत्रात शिक्षण मंडळ सदस्यांची नावे प्रसिध्द झाली व महानगरपालिकेचे प्रथम मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ अत्त्वित आले. आजमितीस मनपा च्या ३५ शाळा (मराठी – २१, हिंदी – ४, उर्दु – ५, गुजराती – ५) असुन त्यात ८१८७ विद्यार्थी शिक्षण घेतात व २०२ शिक्षक कार्यरत आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी शिक्षणापासुन वंचति राहू नये हा शिक्षण मंडळाचे मुख्य उद्देश असुन त्यादृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात व शिक्षण मंडळात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोबईल टिचरांमार्फत सर्वेक्षण केले जाते.

मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे तळागाळातील गोरगरीब व गरजु समाजातील जीवन जगणाऱ्या पालकांची असल्याने त्यांचा शैक्षणिक व गुणात्मक विकास होणे करीता शिक्षण मंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात व सर्व सुविधा (गणवेश, बुट, वहया, पुस्तके, संगणक प्रशिक्षण) मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच शासनाच्या शालेय पोषण आहारा अंतर्गत विद्यार्थ्यांना दैनंदिन अन्न शिजवुन खिचडी देण्यात येते.

सन २०१०-११ या वर्षात मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळाने मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना सी.आर.सी. स्तरावर अद्यावत साहित्यांनी परिपुर्ण अशा विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असुन या वर्षात त्यांना मुर्त स्वरूप प्राप्त करून देण्याकरीता अंदाजपत्रकात प्रयोगशाळा उभारण्याकरीता रू. २५ लाखाची तरतुद करण्यात आलेली आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ हे मिरा-भाईंदर कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांवर नियंत्रण व देखरेखीचे काम करते. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत अपंग (अंध, मतीमंद, मुकबधिर इत्यादी.) मुलांचे सर्वेक्षण करून जे विद्यार्थी शाळेत जावु शकत नाही अशा विद्यार्थ्यांना घरोघरी जावुन मोबईल टिचारांमार्फत शिक्षण दिले जाते. तसेच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे (अपंग) शिबीर लावुन शिबीरात वैद्यकिय तपासणी करून त्यांच्या अपंगत्वताच्या गरजेप्रमाणे त्यांना आवश्यक साहित्य साधने (चष्मे, कॅलिपर, व्हिलचेअर इत्यादी) मोफत उपलब्ध करून देण्यात येतात.

अशा प्रकारे मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित राहणार नाही याची दक्षता शिक्षण मंडळामार्फत घेतली जाते.

विशेष शिक्षण

मिरा- भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ मनपा शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व हालकीच्या परीस्थितीतुन शिक्षण घेण्यासाठी आलेली मुले असतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष पुवावे लागते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी शासन तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ उपक्रम राबित असतात. सदर मुले दुसुऱ्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत कुठेही कमी पडु नये म्हणुन त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व त्यासाठी लागणारे शैक्षणक साहित्य मोफत पुरविले जाते. आधुनिक तंत्रज्ञाच्या दुनियेत मागे पडु नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण ही मोफत पुरविले जाते. तसेच मिरा-भाईंदर क्षेत्रातील सर्वच शाळा आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष ल्क्ष देतात व त्यांचा शैक्षणिक तसेच गुणात्मक विकास करतात. त्यामुळे मुलांना शिक्षणची आवड निर्माण होत असुन आज मिरा-भाईंदर शहरात जवळजवळ एकही विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित नाही.

भारत सरकारने देशात मिशन पध्दतीने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सर्व शिक्षा अभियान ही व्यापक व एकात्मिक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाने व स्थानिक स्वराज्या संस्थांच्या सहभागाने सुरू केलेली सर्व शिक्षा अभियान ही एक चांगली योजना असुन त्यामध्ये ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना उपयुक्त व पर्याप्त शिक्षण देणे, मुलांना दर्जेदार शिक्षण देणे, मुलांची उपस्थिती वाढविणे व मुलांची १००% पटसंख्या टिकवून ठेवणे हा मुख्या उद्दश आहे. या योजने अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असुन त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक प्रशिक्षण, मुलींसाठी NPEGEL विशेष गरज असणाऱ्या मुलांसाठी (अपंग) अपंग समावेशित शिक्षण हे महत्वाचे उपक्रम राबविले जातात.

शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील सामान्य विद्यार्थ्यांना व विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना (अपंग विद्यार्थी) कोणत्याही नजीकच्या समकक्ष वयानुसार शाळेत प्रवेश देणे व वर्गात शिक्षणाचा हक्क व संधी मिळवून दिली जाते. मिरा-भाईंदर शहरातील सर्व अपंग विद्यार्थ्यांना अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमाखाली शाळेत आणून किंवा विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जावुन त्यांना विशेष शिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेगवेळे उपक्रम राबविले जात असुन यासाठी विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मतिमंद, बहुविलांग, सेरेबगम पालसी, अस्थिव्यंग, व शस्त्रक्रिया झालेल्या मुलांमध्ये स्नायू व सांध्यांतर्गत दोष आढळून येतात. सदर विद्यार्थ्यांवर हॉस्पीटलमध्ये योग्यते उपचार केले जातात.

शैक्षणिक दृष्टीकोनातुन मानसशास्त्रीय मूलभूत मूल्यमापन व प्रमाणीकरण, त्यांच्या क्षमताप्रमाणे शैक्षणिक पर्याय व शैक्षणिक पर्यायानुसार नियमित शाळेत शिक्षण, स्कूल रेडिनेस आणि गृहमार्गदर्शनातुन टप्प्याटप्याने शाळेत आणणे, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार पाठयपुस्तकावर आधारित परिवर्तन व सुलभ अभ्यासक्रमाची तयारी, अभ्यासक्रमानुरूप शैक्षणिक साहित्य निर्मिती, शैक्षणिक साहित्याचा उपयोग व तंत्र पध्दतीने कालानुरूप होणारे बदल, त्यानुसार अध्ययन अध्यापन कार्यातील सुधारणा तसेच क्षमताधिष्ठित मुल्यांकनाच्या दृष्टीने अभ्यासक्रम आधारित मौखिक व लेखी प्रश्नांचे नमुने आणि प्रश्नवालीची मुल्यांकन पध्दती इत्यादीसाठी सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरेपीस्टि, ऑक्यूपेश्नल थेरेपीस्ट व स्पीच थेरेपीस्ट योची नेमणूक करण्यात आली आहे.

ज्या विशेष गरजा असणाऱ्या मुलांना फिजिओथेरेपी, ऑक्युपेश्नल थेरेपी व स्पीच थेरेपीची गरज आहे, अशा मुलांना थेरेपी देण्याचे काम मनपा शाळा क्र. १३, नवघर मराठी, भाईंदर (पूर्व) येथे चालु करण्यात आले आहे. थेरेपीची गरज असलेल्या मुलांना थेरेपी देण्यासाठी मनपा शाळा क्र. १३, नवघर मराठी या शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शाळेत टिकविणे व गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळवुन देण्यासाठी मुलांच्या गरजेनुरूप मिळणाऱ्या शैक्षणिक सहाय्यभूत सेवांचे माहिती प्रपत्र व सेवांची मागणी करण्यासाठीचे मागणीपत्र प्रसिध्द करण्यात आलेले आहे. तरी आपण आपल्या अवतीभवती किंवा परिसरात विशेष गरज असणारी मुले (अपंग) आढळून आल्यास त्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असणाऱ्या सेवा-सुविधा मिळण्यासाठी व अधिक माहितीसाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगर भवन), तिसरा मजला, भाईंदर (प.), दुरध्वनी क्र. २८१९ ०२२३ येथे संपर्क साधावा.

विद्यार्थी व पालक समर्थन

मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना चांगले व अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून देते. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण ही विनामुल्य उपलब्ध करून देते. आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने पालक वर्ग तोच शहरातील लोकप्रतिनिधी समाधानी असुन त्यांचेही अमूल्य असे सहकार्य शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षण मंडळास देत असतात. यापुढे ही त्यांना सोबत घेवून शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नविन व आजच्या अत्याधुनिक जगातील उपयोगी अशा वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत. मिरा-भाईंदर शहरातील रहिवाशी शाळांबाबत किवा शिक्षणा विषयी इतर कोणत्याही तक्रारी असल्यास ते शिक्षण मंडळ कार्यालयात येवुन तक्रार करता. तक्रार असलेल्या शाळेच्या संस्थाचालकांना, मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना समोर बालावुन प्रशासन अधिकारी यांच्यासह शिक्षण मंडळ सदस्य तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण करतात.

शाळांसाठी आर्थिक योजना

मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमाच्या एकूण 35 प्राथमिक शाळा आहेत. तसेच 19 खाजगी अनुदानित व 9 विना अनुदानित शाळा आहेत. सदर शाळेतील विद्यार्थ्यासाठी शासनामार्फत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सदर योजनेत विद्यार्थ्यांना अन्न शिजवुन खिचडीचा पुरवठा केला जातो. त्याच बरोबर केळी, बिस्किटे, अंडी असा सकस आहार ही दिला जातो. तसेच खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळांतील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नियमानुसार गणवेश भत्ता व प्रोत्साहन भत्ता ही दिला जातो.

मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमाच्या एकूण 35 प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व हालीकीच्या परिस्थितीतुन आलेली असतात. मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ त्यांच्यासाठी बरेच उपक्रम राबवित असते. सदर विद्यार्थ्यांना गणवेश, बंट मोजे, वहया, पाठयपुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करते. तसेच वेगवेगळया ठिकाणी शैक्षणिक सहली आयोजित करण्यात येतात. हया मुळे मनपा शाळेतील विद्यार्थी इतर शाळांच्या तुलनेत कुठेही कमी पडत नुसन त्यांच्या शैक्षणि व गुणात्मक विकास होतो.

शाळा प्रवेश - अटी आणि नियम

मिरा-भाईंदर महानगरपाकिा शिक्षण मंडळ संचलित मनपा शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम 1949 अन्वये शालेयस्तरावर पालकांकडुन विनामुल्य प्रवेश अर्ज भरून घेतला जातो. ज्या पालकांकउे विद्यार्थ्यांचा जन्मदाखला आहे किवा शाळा सोडल्याचा दाखला आहे त्यानुसार त्यांना त्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. तसेच शासनाचा बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत जर एखादा शाळाबाहय विद्यार्थ्याला त्याच्या वयानुरूप किवा त्याची परीक्षा घेवुन योग्य त्या वर्गात प्रवेश देवुन त्यास शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता विनामुल्य प्रवेश दिला जातो.

तसेच मध्येच दुसऱ्या राज्यातुन किवा जिल्हयातुन आलेल्या एखादा विद्यार्थ्यास प्रवेश हवा असेल तर रितसर त्याचा शाळा सोडल्याचा दाखला तपासुन त्यावर सदर जिल्हयातील शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी असल्यास प्रशासन अधिकारी यांच्या मूंजरीने सदर विद्यार्थ्यास मिरा-भाईंर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यक्षेत्रातील शाळेत प्रवेश देण्यात येतो. कायम विना अनुदानित शाळेत प्रवेश देताना पहिला शाळा प्रवेशाचा अर्ज दिला जातो. नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

प्रत्येक  मुलं  महत्वाचे आहे

मिरा- भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यक्षेत्रात मनपाच्या एकूण ३५ शाळा, खाजगी अनुदानित २० शाळा व खाजगी विना अनुदानित एकूण ९ शाळा आहेत. मनपा शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व हालाकीच्या परीस्थितीतुन शिक्षण घेण्यासाठी आलेली मुले असतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष पुवावे लागते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी शासन तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ उपक्रम राबित असतात. सदर मुले खाजगी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत कुठेही कमी पडु नये म्हणुन त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व त्यासाठी लागणारे साहित्य मोफत पुरविले जाते. या तंत्रज्ञाच्या दुनियत मागे पडु नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण ही मोफत पुरविले जाते. तसेच मिरा-भाईंदर क्षेत्रातील सर्वच शाळा आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देवुन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करून त्यांचा शैक्षणिक तसेच गुणत्मक विकास करतात. त्यामुळे मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होत असुन आज मिरा-भाईंदर शहरात जवळजवळ एकही विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित नाही.

मिरा-भाईंदर शहरातील सर्व अपंग विद्यार्थ्यांना अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमाखाली विशेष गरज असणाऱ्या १७९५ विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जावुन त्यांना विशेष शिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेगवेळे उपक्रम राबविले जात असुन यासाठी १८ विशेष शिक्षकांची व ४ थेरीपिस्टची नेमणूक करण्यात आलेली आहे. मतिमंद, बहुविलांग, सेरेबगम पालसी, अस्थिव्यंग, व शस्त्रक्रिया झालेल्या मुलांमध्ये स्नायू व सांध्यांतर्गत दोष आढळून येतात. सदर विद्यार्थ्यांवर योग्यते उपचार केले जातात.

शैक्षणिक दृष्टीकोनातुन मानसशास्त्रीय मूलभूत मूल्यमापन व प्रमाणीकरण, त्यांचया क्षमताप्रमाणे शैक्षणिक पर्याय व शैक्षणिक पर्यायानुसार नियमित शाळेत शिक्षण, स्कूल रेडिनेस आणि गृहमार्गदर्शनातुन टप्प्याटप्याने शाळेत आणणे, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार पाठयपुस्तकावर आधारित परिवर्तन व सुलभ अभ्यासक्रमाची तयारी, अभ्यासक्रमानुरूप शैक्षणिक साहित्य निर्मिती, शैक्षणिक साहित्याचा उपयोग व तंत्र पध्दतीने कालानुरूप होणारे बदल, त्यानुसार अध्ययन अध्यापन कार्यातील सुधारणा तसेच क्षमताधिष्ठित मुल्यांकनाच्या दृष्टीने अभ्यासक्रम आधारित मौखिक व लेखी प्रशनांचे नमुने आणि प्रश्नवालीची मुल्यांकन पध्दती इत्यादीसाठी सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरेपीस्टि, ऑक्यूपेश्नल थेरेपीस्ट व स्पीच थेरेपीस्ट योची नेमणू करण्यात आली आहे.

शिक्षण विभाग

RTE २५ टक्के अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता जाहिर आवाहन

आरटीई 25 टक्के अंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जाहिर आवाहन

२५% प्रवेश बाबद जाहीर आवाहन संकेत स्थळावर देणे बाबद.2019-20

 २५% प्रवेश बाबद जाहीर आवाहन संकेत स्थळावर देणे बाबद.

शिक्षक दिन साजरा करणेबाबत निमंत्रणपत्रिका.

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रवेश देणे सुरु आहे.जाहिरात प्रसिद्ध करणे बाबद.

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रवेश देणे सुरु आहे.

आर.टी.ई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील २५ % प्रवेश प्रक्रिया


शेवटचा बदल : 21-02-2020