विभाग प्रमुख | दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ई- मेल |
वासुदेव शिरवलकर(नगरसचिव) |
Extn.123.28184924 |
nagarsachiv@mbmc.gov.in |
इतिहास :- दि. १२ जून १९८५ रोजी भाईंदर, नवघर, मिरा, काशी व घोडबंदर या पाच ग्रामपंचायतीच्या एकत्रीत समावेशासह मिरा भाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर २३ जानेवारी १९९० रोजी राई-मुर्धे, डोंगरी, उत्तन व वर्सोवा या चार ग्रामपंचायतींचा नगरपालिकेत समावेश करण्यात आला. या नगरपालिकेच्या सभोवताली दहिसर चेकनाक्यापासुन थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वनराई, घोडबंदर किल्ला, धारावी जंजिरे किल्ला, आई धारावी मातेचे पुरातन मंदिर, चौक येथे चिमाची अप्पा स्मारक, वसईची खाडी, उत्तन, गोराई बिच असा एकुण ७९.४० चौ.कि.मी. एवढ्या क्षेत्रफळात निसर्ग सो॑दर्याने संपन्न असलेले शहर म्हणजे मिरा भाईंदर शहर. लोकसंख्या वाढीनुसार दि. २८ फेब्रुवारी २००२ रोजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले, मिरा भाईंदर शहराची सन २०११ च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या ८,०९,३७८ एवढी असुन दिवसेंदिवस जसजसा शहराचा विकास होत आहे त्याप्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. ज्याप्रमाणात शहराचा विकास होत आहे त्याचे दुप्पट प्रमाणात शहराची लोकसंख्या जवळजवळ वाढत असल्याने महानगरपालिकेजवळ उपलब्ध असलेल्या नागरी सेवा सुविधांवर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे काही वेळा नागरी सुविधा पुरविणे प्रशासनास अडचणीचे होत असले तरी महानगरपालिका नागरीकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. दि. २८ फेब्रुवारी २००२ रोजी महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीं मधुन प्रथम महापो॑र म्हणुन सौ. मायरा गिल्बर्ट मेंडोसा व उपमहापो॑र श्री. मुझफ्फर हुसैन हे निवडून आले तद्नंतर सन २००७, २०१२ व २०१७ मध्ये महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडलेल्या आहेत. सद्यस्थितीत महानगरपालिकेची मुदत दि. २७ ऑगस्ट २०२२ संपुष्टात आलेली असून, शासनामार्फत महानगरपालिकेचे आयुक्त यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासुन महानगरपालिकेचे पहिले आयुक्त श्री. शिवमुर्ती नाईक यांनी कामकाज पाहिले असुन सद्यस्थितीत श्री. संजय काटकर (भा.प्र.से.) आयुक्त आहेत. |
प्रस्तावना :-
मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सचिव विभाग हा प्रशासन व लोकप्रतिनीधी यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुक 2017 नुसार एकुण 24 प्रभाग सद्यस्थितीत आहेत.
महानगरपालिकेने एकुण 6 प्रभाग समित्या स्थापन केलेल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण ४ नियम ४८ अन्वये नगरसचिव हा महानगरपालिका व स्थायी समितीच्या अखत्यारीत कार्यरत आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेची मुदत
दि. २७ ऑगस्ट २०२२ संपुष्टात आलेली असून, शासनामार्फत मा. संजय श्रीपतराव काटकर, आयुक्त तथा प्रशासक (भा.प्र.से) महानगरपालिकेचे आयुक्त यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
|
विभागाची कामे :- · मा. महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक घेणे तसेच स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या निवडणुका घेऊन समित्या स्थापन करणे व सभापती पदाची निवडणुक घेणे. · मा. महासभा व मा. स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या सभांचे नियमानुसार आयोजन करणे. · मा. महासभा व मा. स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांत, गोषवारे, विषयपत्रिका व ठराव सुस्थितित जतन करुन ठेवणे. · विभागात प्राप्त तक्रार अर्जांवर कार्यवाही करणे.
कर्तव्य :-
१. नगरसचिवांची कार्ये :- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील प्रकरण ४ कलम ४८ अन्वये नगरसचिव हा महानगरपालिकेचा व स्थायी समितिचाही सचिव असेल व त्याने पुढील कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. · या अधिनियमान्वये किंवा तदनुसार पार पाडण्याविषयी त्यास निर्देश देण्यात येईल अशी कर्तव्ये आणि महानगरपालिका व स्थायी समितिकडुन त्या फर्मविण्यात येईल अशी अन्य कर्तव्ये पार पाडणे. · (एक) महानगरपालिकेच्या कलम ३० किंवा ३१ अन्वये महानगरपालिकेने नेमलेल्या कोण्त्याही समितिच्या (दोन) स्थायी समितिच्या व तिच्या कोणत्याही उपसमितिच्या कामकाजा संबंधिची सर्व कागदपत्रे व दस्ताएवज अभिरक्षेत ठेवणे. · स्थायी समिति वेळोवेळी जे निर्देश देईल त्यांच्या अधीन, प्रत्यक्ष त्यांच्या हाताखाली काम करणा~या अधिका~यांची व कर्मचा~यांची कर्तव्ये विहित करणे आणि · स्थायी समितीच्या आदेशांच्या अधीन, उक्त अधिका~यांच्या व कर्मचा~यांच्या कृतींवर व कामांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे आणि विनियमांच्या अधीन, उक्त अधिका~यांची सेवा, पारिश्रमिक व विशेषाधिकार या संबंधीचा सर्व प्रश्नांचा निकाल करणे. तसेच मा. आयुक्त वेळोवेळी आदेश देतील त्यानुसार कामे करणे. अपिलीय अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त अपिलांचा निपटारा करणे
२.उपसचिवांची कार्य :- > मा. आयुक्त व मा. नगरसचिव यांचे अधिपत्याखाली कामकाज पहाणे तसेच जनमाहिती अधिकारी म्हणुन नगरसचिव कार्यालयात प्राप्त माहिती अधिकारातील अर्जांना माहिती उपलब्ध करुन देणे. > मा. महासभा व मा. स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांताचा अंतिम मसुदात पासुन घेणे.
3 लिपिक कर्मचा-यांची कार्ये :- · नगरसचिव कार्यालयामध्ये प्राप्त माहिती अधिकार पत्र, शासकिय पत्र, नागरीकांची पत्र, लोकशाही दिन पत्र या सर्व पत्रांची कार्यविवरन नोंद वहीमध्ये घेऊन मा. सचिव व उपसचिव यांचे निर्देशानुसार माहिती उपलब्ध करुन देणे व अर्जांचा निपटारा करणे. · मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या सभांच्या इतिवृत्तांतामध्ये दुरुस्ती करुन अंतिम इतिवृत्तांत मा. उपसचिवांकडे सादर करणे. · मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या ठरावांचे मा. सचिव व मा. उपसचिव यांच्या मार्गदर्शनानुसार ठराव नोंद रजिस्टर मध्ये ठरावांची नोंद घेणे.
|
माहिती अधिकारी :-
|
आयुक्त
↓
नगरसचिव
↓
उपसचिव
↓
लिपीक
↓
संगणक चालक
↓
मजूर/स.का
नगरसचिव विभागात कार्यरत असलेले अधिकारी/कर्मचारी यांची माहिती :-
|
स्थायी समिती सभा विषयपत्रिका व गोषवारे | ||
---|---|---|
सन 2009-10 | सन 2010-11 | सन 2011-12 |
सन 2012-13 | सन 2013-14 | सन 2014-15 |
सन 2015-16 | सन 2016-17 | सन 2017-18 |
सन 2018-19 | सन 2019-20 | सन 2020-21 |
सन 2021-22 | सन 2022-23 | |
महासभा इतिवृत्तांत | ||
---|---|---|
2002-03 | 2003-04 | 2004-05 |
2005-06 | 2006-07 | 2007-08 |
2008-09 | 2009-10 | 2010-11 |
2011-12 | 2012-13 | 2013-14 |
2014-15 | 2015-16 | 2016-17 |
2017-18 | 2018-19 | 2019-20 |
2020-21 | 2021-22 | 2022-23 |
महासभा विषयपत्रिका व गोषवारे | ||
---|---|---|
सर्वसाधारण सभा 1998-2001 | सन 2009-10 | सन 2012-13 |
सन 2013-14 | सन 2014-15 | सन 2015-16 |
सन 2016-17 | सन 2017-18 | सन 2018-19 |
सन 2019-20 | सन 2020-21 | सन 2021-22 |
सन 2022-23 | ||
सार्वत्रिक निवडणूक उमेदवार यादी
|
सार्वत्रिक निवडणूक उमेदवारांस प्राप्त मते
|
|||
>> महासभेकरिता करण्यात आलेली पूरक घोषणा | |||
>> महासभेकरिता आलेले प्रश्न व त्यांना दिलेली उत्तरे | |||
>> पदाधिकारी व समिति सदस्य यादी | |||
स्थायी समिती सभा इतिवृत्तांत :-