अधिकारी/कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये
अनु क्र.
| पदनाम
| कायदेशीर तरतूद
| जबाबदारी व कर्तव्ये
|
1)
| उपायुक्त
| महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 1949
| - विधी विभागाच्या कामकाजावर संनियंत्रण करणे.
- अपिलीय अधिकारी म्हणून काम करणे.
|
2)
| विधी अधिकारी
|
| - महानगरपालिका/ आयुक्त/ अधिकारी कर्मचारी यांच्याविरुदध दाखल न्यायालयीन वादाचा बचाव करणे.
- विधी विभागाच्या दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षण ठेवणे.
- महानगरपालिकेविरुदध दाखल दाव्यांचे समन्स न्यायालयातून विधी विभागास प्राप्त झाल्यास संबंधित विभागास त्याची माहिती देउन दाव्यातील मुद्देनिहाय माहिती मागविणे.
- प्राप्त झालेली माहिती मनपा अभियोक्ते यांना पाठविणे.
- मनपा अभियोक्ते यांनी तयार करुन दिलेले लेखी कथन/शपथपत्र तपासुन संबंधित विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित विभागाने सुचविलेले बदलानुसार त्यात आवश्यक ती दुरुस्ती व फेरबदल करुन सबंधीत विभागास अंतीम करणेस व स्वाक्षरीस पाठविणे.
- दाव्यासबंधी मनपा अभियोक्ते यांचेशी समन्वय साधून लेखी कथन दाखल करणे तसेच न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा घेणे.
- मा. न्यायालयाने दाव्यांमध्ये पारीत केलेले आदेश कारवाईस्तव संबंधित विभागास कळविणे.
- महानगरपालिकेच्या विविध विभागांनी मागणी केल्यास अभिप्राय देणे तसेच विविध विभागांनी विशेष प्रकरणांमध्ये आयुक्तांच्या मंजूरीने आदेशाचा मसुदा तयार करून देणे.
- विविध विभागातील विकासकामांबाबतचे करारनामे तयार करून देणे.
- महत्वाच्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये मा. न्यायालयांत उपस्थित राहणे तसेच मनपा अभियोक्ते/सिनियर कौन्सिल यांस Briefing करणे.
- पी. सी. पी. एन. डी. टी. कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मनपा समितीचे सल्लागार सदस्य म्हणून कामकाज पाहणे व बैठकीस उपस्थित राहणे.
- महानगरपालिकेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला लैंगिक तक्रार निवारण समिती चे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणे.
- भ्रष्टाचार तक्रार निर्मुलन समिती अंतर्गत सदस्य म्हणुन कार्य करणे.
- निलंबन आढावा समितीचे सदस्य म्हणून काम पाहणे.
- उपविधीचे मसुदे तयार करणे तसेच त्यासंदर्भात संबधीत विभागांस त्याचप्रमाणे शासनास पत्रव्यवहार करणे.
- महानगरपालिका किंवा आयुक्त/ अधिकारी/ पदाधिकारी/कर्मचारी यांच्याविरुध्द दाखल होणाऱ्या न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये बचाव करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम 481 (1) (ग) अन्वये अभियोक्त्यांची मनपा पॅनेलवर नियुक्ती करण्याबाबतचा व कलम 481 (1) (ज) अन्वये नियुक्त अभियोक्त्यांचे देयक निश्चित करणेबाबतचा प्रस्ताव उपायुक्तांच्या मान्यतेने आयुक्तांस सादर करणे व त्यानुसार त्यांचे देयक अदा करणे.
- विधी विभागाकरीता विकसित करण्यात आलेली संगणकिय आज्ञाप्रणालीमध्ये महानगरपालिकेच्या विरुध्द /महानगरपालिकेमार्फत दाखल दाव्यांची माहिती अद्यावत करणे.
- महानगरपालिकेविरुध्द पारित आदेशांविरुध्द अपील दाखल करणे.
- नोटिस व आदेशाचे नमुने उपायुक्त यांच्या मंजूरीअन्वये अंतिम करणे.
- प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यास महानगरपालिकेच्या वतीने जैसे-थे आदेश vacate करणेकरीता पाठपुरावा करणे, तसेच जैसे थे आदेश vacate झाल्यास त्याची माहिती विभाग प्रमुख, अतिक्रमण विभाग/प्रभाग अधिकारी यांस पुढील कारवाईस्तव कळविणे.
- संबंधीत विभागाने नोटिस बजावल्याबाबतची माहिती विधी विभागास कळविल्यास संबंधितांनी मा. न्यायालयात जाऊन स्थगिती आदेश प्राप्त करुन घेऊ नये म्हणुन कॅव्हेट दाखल करणे.
- संबंधित विभागाने कळविल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अन्वये खाजगी तक्रार दाखल करणे.
- नियमितपणे न्यायालयीन प्रकरणांचा पाठ्पुरावा घेणे व लवकरात लवकर प्रकरण निकाली काढणे.
- माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती अधिकारी म्हणून काम करणे
|