Skip to main content
logo
logo

सार्वजनिक आरोग्य विभाग


Department head
Contact no.
E-mail
 डॉ. प्रमोद पडवळ 
7028067273

public.health@mbmc.gov.in

moh@mbmc.gov.in


-: प्रस्तावना :-


मिरा भाईदर महानगरपलिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग, महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी वेगवेगळया प्रकारच्या आरोग्य विषयक सुविधा देत आहे. यामध्ये सामाजिक व रोगप्रतिबंधक विषयक सुविधांचा समावेश आहे.


-: विभागाची कामे :-

·         महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयाच्या माध्यमातुन आरोग्य सेवा पूरविल्या जातात.

·         बालकांचे नियमित लसीकरण (सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम)

·         राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मुलन कार्यक्रम

·         सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP)

·         राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम

·         राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम

·         सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम यशस्वीपणे राबविणे.

·         हत्तीरोग कार्यक्रम राबविणे

·         कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे.

·         महाराष्ट्र शासनाचे माता व बाल प्रजनन (आरसीएच) कार्यक्रम राबविणे.

·         राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) महानगरपालिका क्षेत्रात राबविणे.

·         महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत 10 आरोग्य केंद्रे, 2 उपकेंद्र व रुग्णालयांमार्फत सामाजिक व आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जातात.

·         रुग्णालयाच्या प्रसुतिगृहांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच बालरोग तज्ज्ञांमार्फत स्वाभाविक व गरज पडल्यास शस्त्रक्रियेद्वारे प्रसुति केल्या जातात.

·         वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आरसीएच प्रकल्प टप्पा – कार्यक्रमाद्वांरे माता व बाल संगोपन विषयक सेवा पुरविल्या जात आहेत.

·         मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालये  नर्सिंग होम यांची महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 अन्वये नोंदणी करण्यात येते.

·         1 / 2 मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याऱ्या जोडप्यांच्या मुलींच्या नावे रक्कम रु. 20,000/- बचत प्रमाणपत्र 18 वर्षाकरीता देण्यात येत आहेत.




मिरा भाईंदर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग
महिला व बाल उपक्रम / योजना : -
  • बाह्यरूग्ण सेवा :-  सकाळी 09:00 ते 01:00, केस पेपर शुल्क रू. 5/-.
  • जेष्ठ नागरिकांना सर्व औषधोपचार मोफत देण्यात येतात.
  • श्वानदंशावरील इंजेक्शन निशुल्क
  • युरीन प्रेग्नन्सी टेस्ट मोफत
  • मलेरिया रक्त तपासणी व औषधोपचार मोफत देण्यात येतो.

 

  • नियमित लसीकरण :-  या कार्यक्रमात गरोदर माता, 0 ते 16 वयोगटातील लाभार्थी यांना आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य संस्थेत तसेच कार्यक्षेत्रात प्रसविकांमार्फत राष्ट्रीय लसीकरण वेळापत्राकानुसार लसीकरण करण्यात येते.
  • जननी सुरक्षा योजना :- या योजने अंतर्गत दारिद्रय रेषेखालील तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील गरोदर स्त्रीयांना संस्थेत (दवाखान्यात) प्रसुति झाल्यानंतर रु. 600/- अनुदान देण्यात येते. घरी प्रसुती होणाऱ्या मातांना रु. 500/- अनुदान देण्यात येते. तसेच खाजगी मानांकीत  रूग्णालयात सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यास रु. 1500/-  अनुदान देण्यात येते. सदर अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. याकरिता संबंधित लाभार्थ्यांचे बँक खाते असणे बंधनकारक आहे.
  • जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम :- मिरा  भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय येथे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येतो. सदर योजनेमध्ये स्त्री गरोदर राहिल्यापासून तिची प्रसूति होईपर्यंत  प्रसूतिच्या निगडीत सर्व तपासण्या व उपचार मोफत दिले जातात. प्रसूति मोफत केली जाते. सिझेरियन शस्त्रक्रिया ही

 मोफत केली जाते. तसेच महानगरपालिकेच्या दवाखान्यातून गरोदर मातेस इतर रुग्णालयात संदर्भित करण्याकरिता वाहन व्यवस्था केली जाते. जन्मापासून ते 1 वर्षा पर्यंत नवजात शिशूलाही मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात येतो.  तसेच गंभीर आजारी बालकांना संदर्भित करण्याकरिता वाहन व्यवस्था करण्यात येते. तसेच प्रसूतीनंतर मातेला 

रुग्णालयात असे पर्यंत मोफत आहार पुरविला जातो.

  • पल्स पोलिओ मोहीम :- पल्स पोलिओ मोहिमेत 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओची लस पाजण्यात येते. सदर कार्यक्रम एकूण 6 दिवस राबविण्यात येतो. शासनाने नेमून दिलेल्या तारखांना सदर कार्यक्रम राबविण्यात येतो.
  • मनपा शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम (RBSK)
  •  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक पथकामार्फत (RBSK) वर्षातून दोन वेळा 1. मनपा शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम 2. शहरी व ग्रामीण अंगणवाडी तपासणी 3. मनपा बालवाडी तपासणी
  • जंतनाशक औषधी वाटप मोहीम:-  
  • शासनाच्या आदेशानुसार  मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 1 ते 6 वयोगटातील बालकांना जंतनाशक औषध वाटप करण्यात येते. 
  • कुटुंब कल्याण कार्यक्रम :-या कार्यक्रमात आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत जननक्षम जोडप्यांना कुटुंब नियोजनाच्या तात्पुरत्या व कायमच्या पध्दतींबाबत माहिती देऊन त्या वापरण्यासाठी प्रवृत्त करण्यात येते. महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुविधा मोफत पुरविली जाते.
  • स्त्री नसबंदी शासन मोबदला
  • दारिद्रय रेषेखालील         600/- 
  • दारिद्रय रेषेवरील250/- 
  • प्रवर्तक                        150/-
प्रधानमंत्री मातृवंदना योजना –

या योजने अंतर्गत गरोदर मातेला गरोदरपणाच्या  पहिल्या वेळेस रु.5000 इतके मानधन देण्यात येते

  • पहिला टप्पा – गरोदरपणात 150 दिवसांच्या आत नोंदणी झाल्यावर रु.1000/- अनुदान देण्यात येते.
  • दुसरा टप्पा – सहा महिन्यानंतर परत किमान गरोदरपणात एक तपासणी झाल्यानंतर रु. 2000/- अनुदान देण्यात येते
  • तिसरा टप्पा – बाळाची जन्मनोंद प्रमाणपत्र तसेच बाळाला 14 आठवड्यापर्यंतचे प्राथमिक लसीकरण पुर्ण झाल्याचा दाखला मिळाल्यानंतर रु.2000/- मानधन देण्यात येते
  • लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी :-
  1. लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड (आधारकार्ड व लाभार्थीचे लग्नानंतर नाव असणे आवश्यक आहे.)
  2. लाभार्थीचे आधार संलग्न बॅंक खाते
  3. गरोदरपणाची 150 दिवसाच्या आत शासकीय, खाजगी दवाखान्यात नोंदणी
  4. शासकीय / खाजगी दवाखान्यात गरोदरपणाचा दरम्यान तपासणी.
  5. बाळाची जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण
दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांच्या मुलींना आर्थिक मदत देण्याची योजना :-
महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व दोन मुलींवर अथवा एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या जोडप्यांच्या मुलींना आर्थिक मदत दिली जाते. त्या अंतर्गत एक मुलगी असल्यास तिच्या नावे   20.000/रु.18 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात बँकेत ठेवले जातात.   दोन मुली असल्यास प्रत्येकीच्या नावे रु. 10,000/- ठेवले जातात. लाभार्थी मिरा भाईंदर महाहगरपालिका क्षेत्राचा रहिवासी असावा सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील कागदपत्रे व महापालिकेच्या विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. विहीत नमुना अर्ज सर्व आरोग्य केंद्रांवर उपलब्ध आहे अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे :
  1. शिधापत्रिका
  2. पॅन कार्ड (दोघांचेही)
  3. मुलींचे जन्म प्रमाणपत्र
  4. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबाबतचा वैद्यकीय दाखला व रुग्णालयीन कागदपत्रे
  5. रु. 100 च्या स्टँप पेपरवर विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (ऍफीडेव्हीट)
  6. मुलीचे व पालकाचे Joint Account (State Bank of India)
  • सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (संपूर्ण औषधोपचार) :- मोफत
  •  राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
  • एचआयव्ही रक्ततपासणी व समुपदेशन 
वैद्यकीय आरोग्य विभात नागरीकाकरीता तीन स्तरामध्ये आरोग्य सेवा पुरवितात.

माता बाल संगोपन केंद्र (भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय)

सामान्य रुग्णालय (भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय)
  • आरसीएच कार्यक्रम
  • माता आरोग्य कार्यक्रम
  • जननी सुरक्षा योजना
  • जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम
  • प्रसुतीपूर्व सेवा (ANC)
  • प्रसूतीपश्चात सेवा (PNC)
  • कुंटुब नियोजन कार्यक्रम
  • माता मृत्यू अन्वेषन समिती
  • बालमृत्यू अन्वेषण समिती
  • पीसीपीएनडीटी
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY)
  • प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA)
  • नियमित लसीकरण कार्यक्रम
  • आर.सी.एच पोर्टल (RCH)
  • प्रयोगशाळा – तपासणी

No.

आरोग्य केंद्र  रुग्णालयाचे नावे

Address

1

उत्तन आरोग्य केंद्र

 उत्तन नाका, मोठा गाव, चिखल खाडी, भाईंदर (प.)

2

भाईंदर (प.) आरोग्य केंद्र

पोलीस स्टेशन जवळ, भाईंदर (प.)

3

विनायक नगर आरोग्य केंद्र

महाराणा प्रताप रोड, विनायक नगर समाज मंदिर, भाईंदर (प.)

4

गणेश देवल नगर आरोग्य केंद्र

शिवसेना गल्ली, भाईंदर (प.)

5

बंदरवाडी आरोग्य केंद्र

बस डेपो जवळ, बंदरवाडी मराठी- गुजराती शाळा, भाईंदर (पूर्व)

6

नवघर आरोग्य केंद्र

हनुमान मंदिराजवळ, नवघर मनपा शाळा, भाईंदर (प.)

7

मिरारोड आरोग्य केंद्र

साई आशिर्वाद हॉस्पीटल समोर, वोकार्ड हॉस्पीटलच्या बाजूला, भारती पार्क, मिरारोड (पूर्व)

8

पेणकरपाडा आरोग्य केंद्र

शंकर मंदिराजवळ, पेणकरपाडा मनपा शाळा, पेणकरपाडा, मिरारोड (पूर्व)

9

काशिगांव आरोग्य केंद्र

काशिगांव ऊर्दू व मराठी शाळा, काशिगांव

10

भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय

पूनम सागर, मिरारोड (पूर्व)

11

फिरता दवाखाना

वेळापत्रक

रक्तपेढी :-

भारतरत्न राजीव गांधी रक्तपेढी :- मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरारोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रूग्णालयाच्या इमारतीत तळ मजल्यावर बाह्यसेवातत्वावर (outsourced) रक्तपेढी सुरू करण्यात आलेली आहे. मे. नवजीवन मेडिकल रिलीफ ऍण्ड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेमार्फत सदर रक्तपेढी चालविण्यात येत आहे. थॅलेसेमिया, रक्ताचा कर्करोग व बीपीएल दाखला असणाऱ्यांना सदर रक्तपेढीमधून मोफत रक्त पुरवढा करण्यात येतो. इतर रुग्णांना सवलतीच्या दरात रक्तपुरवठा करण्यात येतो.

रुग्णवाहिका व शववाहिनी :-

No.

वाहन क्रमांक

वाहनाचा प्राकर

दुरध्वनी क्रमांक

प्रभागाचे नाव

  1

MH 04 EY 1072

रुग्णवाहिका

 

प्रभाग क्र.01 भारतरत्न पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय

2

MH 04 EP 0512

रुग्णवाहिका

 

3

MH 04 EP 710

रुग्णवाहिका

 

4

MH 04 H 702

शववाहिनी

 

5

MH 04 EP 0710

कार्डियाक रुग्णवाहिका

 

6

MH 04 EY 9067

रुग्णवाहिका

 

प्रभाग क्र. 02 व 03,  खारीगाव व तलाव रोड

7

MH 04 H 620

शववाहिनी

 

8

MH 04 EC 2285

रुग्णवाहिका

 

प्रभाग क्र.04,  जहांगीर कॉ. कनकीया नगर

9

MH 04 EL 2287

रुग्णवाहिका

 

प्रभाग क्र. 05,  इंदिरा गांधी रुग्णालय,  पुनम सागर, मिरारोड

10

MH 04 EP 159

रुग्णवाहिका

 

11

MH 04 H 710

शववाहिनी

 

    ART सेंटर मिरा रोड येथे सीडी फोर मशीन साठी साधनसामग्री खरेदी साठीचे जाहीर कोटेशन नोटीस प्रसिद्ध करणे बाबत_003

    ए.आर.टी सेंटर मिरा रोड येथे पीएलएचआयव्ही रुग्णांचे सीडी-4 तपासणी साठी सीडी -4 मशीनसाठी साधन सामुग्री मागविणे बाबत जाहीर कोटेशन सूचना_003   

    मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागा करिता आवश्यक असणारी औषधे ,सर्जिकल मटेरियल व लॅब मटेरियल पुरविणे बाबत जाहीर निविदा सूचना_732

    मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील महाराष्ट्र भूषण पद्दविभूषण लोकशाहीर बाबासाहेब पुरंदरे भवन ,पेणकरपाडा येथे डायलिसीस सेंटर सुविधा विकसित करून चालविणे बाबत अभिव्यक्ती स्वारस्य सूचना_709

    सार्वजनिक आरोग्य विभागा विषयी  जाहीर कोटेशन नोटीस बाबत_78

    राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत NGO PPस्कीम राबविण्यासाठी प्रायव्हेट डायग्नोस्टिक सेंटर व स्वयंसेवीसंस्था यांची निवड करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट चा नमुना व जाहिरात बाबत

    15 व्या वित्त आयोगांतर्गतठोक मानधवरील कंत्राटी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी BAMS ह्या पदाची पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा बाबत 

    15 व्या वित्त आयोगांतर्गतठोक मानधवरील कंत्राटी स्वरुपात परिचारिका(GNM) व बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) ह्या पदाची पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा बाबत 

    मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत प्रिंटिंग मटेरियल चे जाहीर कोटेशन नोटीस बाबत

    मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत लॅब मटेरियलचे जाहीर कोटेशन बाबत
    सार्वजनिक आरोग्य विभागा  विषयी जाहीर कोटेशन सूचना 
    अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविणे बाबत 
    15 व्या वित्त आयोगांतर्गत पॉलिक्लीनीक करीता विशेषज्ञांची अंतिम निवड यादी प्रसिध्द करणेबाबत
    संरक्षक (Custodian) नियुक्ती आदेश
    राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची प्रसनोट
    मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकरीता दोन (02) शववाहीन्या खरेदी करणे
    म‍िरा भाईंदर महानगरपाल‍िकेचे 5 वर्षाखालील बालकांना पोल‍िओ डोस पाजण्याचे आवाहन
    15 व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता परिचारिका (GNM) व बहुउद्देशीय कर्मचारी (पु.) (MPW) कंत्राटी पदांची पात्र/अपात्र हरकत यादी प्रसिध्द करणेबाबत.
    15 व्या वित्त आयोगांतर्गत पॅलिक्लिनीककरीता विशेषतज्ञ पदांची पात्र / अपात्र हरकत यादी प्रसिध्द करणेबाबत.
    15 व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) पदांची पात्र अपात्र हरकत यादी.  

    राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत कंत्राटी स्वरूपात क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता ह्या पदाची पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी

    प्रेसनोट - राष्ट्रीय जंतनाशक दिवस

    15 व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांकरीता वैद्यकीय अधिकारी पदभरती करणेकरीता प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीचे मुदतवाढीसह शुद्धीपत्रक 

    भाईंदर प. आरक्षण क्र. १०० येथील ग्रंथालय इमारतीची Non - Destrctive Test करणे

    १५ व्या वित्त आयोगांतर्गत ठोक मानाधानावरील रिक्त पदे भरणे बाबत

    आयुष्मान आरोग्य मंदिर  आरोग्यं परमं धनम या शीर्षकाचे व ०६ लोगोचे पेन्टद्वारे मसुदा रंगविणे कामी दरपत्रक  

    क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता ह्या पदासाठी पात्र अपात्र अर्जानुसार गुणांकन यादी 

    राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पदभरती जाहिरात सूचना - अंतिम  निवड यादी 

    १५ व्या वित्त आयोगांतर्गत पॉलीक्लीनीक करीता विशेषतज्ञांची रिक्त पदे भरणे बाबत

    बायो मेडिकल इंजिनियर पदाची पात्र व अपात्र यादी

    क्षयरोग दूरीकरण जाहीर कोटेशन नोटीस 

    मिरा भाईंदर महानगरपालिका संकेतस्थळावर जाहिर सूचना- क्षयरोग दूरीकरण कंत्राटी पदभरती करीता ऑनलाईन अर्ज 

    मिरा भाईंदर महानगरलिकेंतर्गत 15 व्यावित्त आयोगांतर्गतपुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाची निवड यादी

      Pressnote-12.12.2023(मिरा भाईंदर महानगरपिालका कार्यक्षेत्रात कुष्ठरुग्णशोध व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमे अंतर्गत प्रत्यक्ष घरोघरी तपासणीव्दारेकुष्ठरोगाचे 4 व क्षयरोगाचे 45 रुग्णाचे निदान)


      राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याबाबतची जाहिरात


      प्रिकॉशन डोसची जनजागृती करणेबाबत.


      15 व्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र / आपला दवाखाना करीता ठोक मानाधानावरील रिक्त पदे भरणे बाबत 


      पदभरती बाबत


      क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता या पदाची पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बाबत


      क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता ह्या पदाची पात्र अपात्र गुणांकन यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बाबत


      मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 करीता कंत्राटी शहर समन्वयक पदाकरीता जाहिरात


      राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेची पदभरतीची जाहिरात


      कुष्ठरोग शोध मोहीम व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम दिनांक 13/ 9 /2022 ते 16 /9 /2022 व दिनांक 26/09/2022 ते 7/ 10 /2022 पर्यंत राबविण्यात येणार असून त्यानिमित्त जनजागृती करण्यासाठी स्टीकर वेबसाईटवर प्रदर्शित करणे बाबत


      राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य केंद्र स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या रुग्ण कल्याण समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक करणे बाबत


      राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतगत आरोग्य केंद्र स्तरावर स्थापण करण्यात आलेल्या रूग्ण कल्याण समिती वर अशासकीय नेमणुक करणेबाबतनिवड व प्रतीक्षा यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बाबत


      राष्ट्रिय शहरी आरोग्य अभियान (nuhm) अंतर्गत आरोग्य केंद्र स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या रुग्ण कल्याण समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक करणेबाबत ..


      रुग्ण कल्याण समिती नियामक व कार्यकारी समिती सदस्यांचे तक्ते


      खाजगी नोंदणीकृत क्लिनिकची यादी


      खाजगी नोंदणीकृत हॉस्पीटलची यादी


      स्वाईनफ्ल्यू प्रेसनोट 29.07.22 sign


      स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्याबाबत


      राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतगत आरोग्य केंद्र स्तरावर स्थापण करण्यात आलेल्या रूग्ण कल्याण समिती वर अशासकीय नेमणुक करणेबाबत


      मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाकरिता आवश्यक इल्न्फ्ल्युएंझा ए एच1 एन1 तपासणी किट्स 300 किट्स खरेदी करणेकरीता जाहिर कोटेशन मागविण्यात येत आहे.


      मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयाकरीता ऑक्सिजन सिलेंडर नियमित वर्षभर आवश्यकतेनुसार रिफिल करणेकरीता जाहिर कोटेशन मागविण्यात येत आहे. (Regarding publication of open quotation notice:- Open quotation is invited for refilling of oxygen cylinders regularly as per requirement for Bharat Ratna Indira Gandhi Hospital of Mira Bhayander Municipal Corporation.)


      राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेकरीता लॅब टेक्निशिअन (LT) पदाची निवड यादी प्रसिध्द करणेबाबत.


      सेवाजेष्ठाता यादी 

      मिरा भाईंदर महानगरपालिका ,सार्वजनिक आरोग्य विभाग ,राष्टीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत अधिकारी /कर्मचारी यांची शासन सूचना नुसार अंतिम सेवा ज्येष्ठता यादी बाबत_858

      सेवा जेष्ठता यादी _NUHM, NTEP & 15 FC_706