मिरा भाईंदर महानगरपालिका
नगर सचिव

विभाग प्रमुख
श्री. वासुदेव शिरवलकर ( नगर सचिव )
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ८४२२८११४४४
ई- मेल nagarsachiv_mbmc@yahoo.com

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील नगरसचिव विभाग हा प्रशासन व लोकप्रतिनीधी यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुक 2012 नुसार एकुण 47 प्रभाग आहे निवडणूकीद्वारे निवडुन द्यावयाची सदस्य संख्या 95 व नामनिर्देशित सदस्य संख्या 5 असे एकूण 100 सदस्य आहेत. पैकी सद्यस्थितीत निवडुन आलेले 93 व 5 नामनिर्देशित सदस्य मिळुन एकुण 98 नगरसेवक असून 2 जागा रिक्त आहेत.

महानगरपालिकेने एकुण 6 प्रभाग समित्या स्थापन केलेल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण ४ नियम ४८ अन्वये नगरसचिव हा महानगरपालिका व स्थायी समितीच्या अखत्यारीत कार्यरत असुन मा. महापौर व सभापती स्थायी समिती यांच्या निर्देशानुसार सभा आयोजनाबाबत कार्यवाही केली जाते.

विभागाची कामे

 • मा. महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक घेणे तसेच स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या निवडणुका घेऊन समित्या स्थापन करणे व सभापती पदाची निवडणुक घेणे.
 • मा. महासभा व मा. स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या सभांचे नियमानुसार आयोजन करणे.
 • मा. महासभा व मा. स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांत, गोषवारे, विषयपत्रिका व ठराव सुस्थितित जतन करुन ठेवणे.
 • विभागात प्राप्त तक्रार अर्जांवर कार्यवाही करणे.

कर्तव्य

१. नगरसचिवांचीकार्ये

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील प्रकरण ४ कलम ४८ अन्वये नगरसचिव हा महानगरपालिकेचा व स्थायी समितिचाही सचिव असेल व त्याने पुढील कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.

 • या अधिनियमान्वये किंवा तदनुसार पार पाडण्याविषयी त्यास निर्देश देण्यात येईल अशी कर्तव्ये आणि महानगरपालिका व स्थायी समितिकडुन त्या फर्मविण्यात येईल अशी अन्य कर्तव्ये पार पाडणे.
 • (एक) महानगरपालिकेच्या कलम ३० किंवा ३१ अन्वये महानगरपालिकेने नेमलेल्या कोण्त्याही समितिच्या (दोन) स्थायी समितिच्या व तिच्या कोणत्याही उपसमितिच्या कामकाजा संबंधिची सर्व कागदपत्रे व दस्ताएवज अभिरक्षेत ठेवणे.
 • स्थायी समिति वेळोवेळी जे निर्देश देईल त्यांच्या अधीन, प्रत्यक्ष त्यांच्या हाताखाली काम करणा~या अधिका~यांची व कर्मचा~यांची कर्तव्ये विहित करणे आणि
 • स्थायी समितीच्या आदेशांच्या अधीन, उक्त अधिका~यांच्या व कर्मचा~यांच्या कृतींवर व कामांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे आणि विनियमांच्या अधीन, उक्त अधिका~यांची सेवा, पारिश्रमिक व विशेषाधिकार या संबंधीचा सर्व प्रश्नांचा निकाल करणे. तसेच मा. आयुक्त वेळोवेळी आदेश देतील त्यानुसार कामे करणे. अपिलीय अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त अपिलांचा निपटारा करणे.

.उपसचिवांचीकार्ये

 • मा. आयुक्त व मा. नगरसचिव यांचे अधिपत्याखाली कामकाज पहाणे तसेच जनमाहिती अधिकारी म्हणुन नगरसचिव कार्यालयात प्राप्त माहिति अधिकारातील अर्जांना माहिती उपलब्ध करुन देणे.
 • मा. महासभा व मा. स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांताचा अंतिम मसुदात पासुन घेणे.

.लिपिककर्मचा~यांचीकार्ये

 • नगरसचिव कार्यालयामध्ये प्राप्त माहिती अधिकार पत्र, शासकिय पत्र, नागरीकांची पत्र, लोकशाही दिन पत्र या सर्व पत्रांची कार्यविवरन नोंद वहीमध्ये घेऊन मा. सचिव व उपसचिव यांचे निर्देशानुसार माहिती उपलब्ध करुन देणे व अर्जांचा निपटारा करणे.
 • मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या सभांच्या इतिवृत्तांतामध्ये दुरुस्ती करुन अंतिम इतिवृत्तांत मा. उपसचिवांकडे सादर करणे.
 • मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या ठरावांचे मा. सचिव व मा. उपसचिव यांच्या मार्गदर्शनानुसार ठराव नोंद रजिस्टर मध्ये ठरावांची नोंद घेणे.

नगरसचिव विभागातील अधिकारी / कर्मचारी यादी

अ. क्र. अधिकारी/कर्मचारी नांव पदनाम कामाचे स्वरुप संपर्क क्र
1 श्री. वासुदेव शिरवळकर

 

प्र. नगरसचिव

सर्व समित्यांचे आयोजन करणे, सर्व समित्यांच्या निवडणूकांचे आयोजन करून त्या पार पाडणे.

8422811444

2 सद्यस्थितीत रिक्त

पद

उपसचिव

मा. सचिव यांना सभेच्या वेळी सहकार्य करणे. सचिव विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करून त्याची अंमलबजावणी करून घेणे.

 

3 श्री. प्रदिप पाटील

 

लिपीक

मा. महासभा व मा.स्थायी समितीचे इतिवृत्त तयार करणे.

9930431943

4 श्री. कैलास म्हात्रे

 

लिपीक

सरकारी / जनरल व नगरसेवक दैनदिन पत्रव्यवहार सांभाळणे व सभेच्या आयोजनाबाबत प्राप्त गोषवाऱ्यानुसार विषयपत्रिका तयार करणे. सहा. जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकारा संबंधी काम पाहणे.

9820333711

5

श्री. कैलास शेवंते (निवडणूक विभाग)

लिपीक

निवडणूक विभागाचे कामकाज पाहणे.

 

6 श्री. मधुकर भोईर

 

सफाई कामगार

सभांचे इतिवृत्त व विषयपत्रिकांचे वाटप करणे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.

9930008502

7 श्री. हेमंत किणी

 

सफाई कामगार

सभांचे इतिवृत्त व विषयपत्रिकांचे वाटप करणे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.

9987948880

8 श्री. नेत्रेश्वर पाटील

 

सफाई कामगार

सभांचे इतिवृत्त व विषयपत्रिकांचे वाटप करणे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.

9833631521

9 श्री. राजकिरण इंगोले

 

मजुर - अपंग

सभांचे इतिवृत्त व विषयपत्रिकांचे वाटप करणे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.

9594970011

10 श्री. संदेश पाटील

 

मजुर - अपंग

सभांचे इतिवृत्त व विषयपत्रिकांचे वाटप करणे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.

9970735056

11

श्री. तानाजी इंगोले (निवडणूक विभाग)

सफाई कामगार वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे.

 

9819139075


शेवटचा बदल : 12-05-2017